पुदीन्याचा वापर हा फक्त स्वयंपाकातच नाहीतर पचन सुधारण्यासाठी, वजन कमी
होतो. पुदिन्याच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत हे सिद्ध झाले
आहे. मिनथॉल, प्रथिने, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन-ए, राइबोफ्लेविन, लोह
इत्यादी तत्वे यामध्ये असतात. पुदिना ही स्वस्त व सहज उपलब्ध होणारी औषधी
वनस्पती आहे. पुदिन्याचा वापर आपण आपल्या स्वयंपाकघरात चव वाढविण्यासाठी
करतोच, पण त्याचबरोबर आपल्या शरीरातील अनेक रोग व आजार कमी करण्यासाठी
याचा खूप उपयोग होतो. त्यामुळे आपण नियमित पुदिन्याचे एक पान खाल्ले तर
आपले आरोग्य चांगले राहील.
पोटाच्या तक्रारी दूर करतो: पुदिना खाल्ल्याने पोटाच्या सर्व समस्या दूर
होतात. आजकालच्या धावपळीच्या जिवनशैलीमध्ये बाहेरचे जंक फूड खाणे ही एक
गरज बनली आहे. पण या बाहेरच्या खाण्यामुळे पचनाची समस्या निर्माण होऊन,
अनेकांना पोटाचे आजार होतात. एक कप पुदिन्याचा रस एक कप कोमट पाणी आणि एक
चमचा मध मिसळून त्याचे सेवन केल्यास आपल्याला पोटाच्या आजारांपासून सुटका
मिळते. पोटाच्या आजारांसाठी पुदिना हा रामबाण उपाय आहे.
उलटी, मळमळ यापासून आराम: उलटी, मळमळ होत असेल तर पुदिनाच्या पानांचा रस
मधामध्ये मिक्स करून त्यात थोडा आल्याचा रस टाकून सेवन केल्यास उलट्या
होत नाहीत. उलटीची भावना नाहीशी होते.
तापामध्ये गुणकारी: पुदिन्याच्या पानांचा चहा घेतल्यास ताप ही बरा होतो.
पुदिन्याची पाने गरम पाण्यात टाकून त्यात साखर घालून त्याचा चहा करून गरम
गरम प्यायल्यामुळे ताप बरा होतो. बऱ्याच वेळा ताप येऊन गेल्यावर जो
अशक्तपणा येतो, हा अशक्तपणा घालवण्यासाठी पुदिन्यांच्या पानांचा चहा आपण
पिऊ शकता. सर्दी, पडसे, खोकला आणि तापात आराम मिळावा यासाठी पुदीन्याच्या
पानांचा रस, मिरपूड आणि काळे मीठ मिसळून ते उकळून चहा सारखे प्यावे.
अतिसार: तुम्हाला जर वारंवार अतिसाराचा त्रास होत असेल म्हणजे सारखी
सारखी शौचाची भावना होऊन थोडे थोडे शौचास होणे, तर पुदिन्याची पाने बारीक
वाटून त्यात मध टाकून दिवसातून तीन वेळा सेवन केले तर त्याचा नक्कीच
तुम्हाला फायदा होतो. त्यामुळे अतिसाराचा त्रास बरा होईल.
उष्णतेचा त्रास: उष्णतेचा त्रास असेल तर पुदिना खा. यामुळे तुमची उष्णता
कमी होईल. पुदिना हा प्रकृतीने थंड असतो. त्यामुळे अंगातील उष्णता कमी
करण्यासाठी पुदिन्याचा उपयोग होतो. उष्णतेपासून सुटका पाहिजे असेल तर
नियमित पुदिन्याचा रस अथवा आल्याचा चहा प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातील
उष्णता निघून जाते. पायांची उष्णता देखील या उपायाने कमी होईल. पुदीना
ताक, दही, कच्च्या आंब्याचा रसात मिसळून प्यायल्यास पोटातील जळजळीवर आराम
मिळतो आणि गरम वारा आणि उष्माघातापासून संरक्षण होते. जे लोक दिवसभर
कामासाठी बाहेर असतात त्यांच्या पायाचे तळवे जळजळ करु लागतात. अशा
परिस्थितीत त्यांनी फ्रीजमध्ये ठेवलेली पुदीन्यांची पाने वाटून पायाच्या
तळव्यांवर लावावी. त्यांना आराम वाटेल.
तोंडाची दुर्गंधी:
तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी आणि हिरड्या मजबूत बनवण्यासाठी पुदीना
पाने वाळवून त्याची पावडर तयार करावी. ही पावडर नियमित वापरल्याने हा
त्रास दूर होतो.
पुदीन्याच्या पानांनी त्वचेचे अनेक प्रकारचे आजार दूर करता येतात.
जखमेच्या उपचारांसाठी देखील ही पाने उपयोगी आहेत. जर तुम्हाला सतत उचकीचा
त्रास होत असेल तर पुदीन्यामध्ये साखर घाला आणि हळू हळू चावत राहा. काही
तुमची उचकी थांबेल. पुदीन्याच्या पानांची पेस्ट कपाळावर लावल्यास
डोकेदुखीमध्ये आराम मिळतो. पुदिन्यांच्या पानांचे सेवन वजन कमी करण्यास
मदत करते.
![]() | ReplyReply allForward |