बॉलिवूड सेलिब्रिटी आपल्या मुलामुलींचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशा पोस्टनंतर सेलिब्रिटी आणि स्टार कि़ड्सची मोठ्या प्रमाणात चर्चा देखील होते. लोक त्यांचे कपडे दिसणे चालणे- बोलणे स्टाइल अगदी निरखून पाहतात.
बॉलिवूड सेलिब्रिटी कपडे घालण्याच्या पद्धतीपासून ते आपल्या मुलांचे नाव काय ठेवायचे याबाबत अधिक पुढे जावून विचार करत असतात.बॉलीवूड मध्ये बिग बी या नावाने ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या राय हिने जेव्हा आपल्या मुलीचा म्हणजे आराध्या बच्चनचा एक फोटो शेअर केला तेव्हा तिला चांगलेच ट्रोल केले गेले.
बॉलिवूड सेलिब्रिटी आणि स्टार किडच्या चर्चेमध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन या बी टाउनमधील प्रसिद्ध आई मुलीची जोडी यादीमध्ये नेहमी वरच्या स्थानी असते.
मिडियाच्या बातमीनुसार बच्चन कुटुंब आराध्याचा 8 वा वाढदिवस साजरा करत होते. यानंतर जेव्हा ऐश्वर्याने आराध्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला तेव्हा ट्रोलरने ऐश्वर्याला या फोटोवरून खुप ट्रो ल केले.
मिळालेल्या माहितीनुसार वाढदिवसाच्या दिवशी आराध्याचा मेकअप करण्यात आला होता. त्यानंतर तिचा चेहरा जास्तच चमकू लागला होता. अश्या भरपूर मेकअप मध्ये असलेल्या आराध्याचा आणि ऐश्वर्याचा फोटो पाहून खूप लोकांनी ऐश्वर्याला यामुळे सुनावले. एका युजरने म्हणले तू जरा मर्यादा ठेव इतक्या लहान वयात मुलीचा असा कोण मेकअप करतात का.
तसेच इतर युजर्सनी असे म्हटले की अशा लहान मुलीसाठी काय आवश्यक आहे हे ऐश्वर्याला माहिती नाही. एकाने तर असे लिहिले ऐश्वर्या तू खूप बेजबाबदार आई आहेस. ऐश्वर्या ट्रो ल होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही ती बर्याचदा ट्रो ल झाली आहे.
आराध्या बच्चन आपली आई ऐश्वर्या राय -बच्चनच्या सर्वात जास्त जवळची आहे हे आपल्या सोशल मीडियावरील पोस्टवरून समजतेच. ऐश्वर्याही आराध्याला कधीही कुठेही एकटे सोडत नाही. ती कायम तिच्यासोबतच असते. यावरून तिला बऱ्याचदा ट्रो लही केले जाते.
आराध्यालाही आपल्या आईसोबतच वेळ घालवणं अधिक पसंत आहे. आतापासूनच ऐश्वर्या आराध्याच्या फॅशन स्टाइलची काळजी घेत आहे. आराध्या तिच्या प्रमाणेच स्टायलिश दिसावी, यासाठी ती ऐश्वर्या प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेते आहे.
या फोटोंमध्ये ऐश्वर्या आणि आराध्याने एक सारखेच कपडे परिधान केल्याचे दिसत आहे. दोघींच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट आणि लाइकचा पाऊस पाडला आहे. पण काही लोकांनी ऐश्वर्याला खूप काही सुनावले आहे. असो लोकांचे देखील बरोबरच आहे म्हणा इतक्या छोट्या वयाच्या मुलीला अशा मेकअपची अजिबात गरज नाही. हे ऐश्वर्याला समजले पाहिजे होते.
ऐश्वर्या राय बच्चनला फॅशन क्वीन म्हणले तर ते चुकीचे ठरणार नाही. तिच्या रेड कार्पेट लुकमुळे ती नेहमीच चर्चेत असते. तिचे प्रत्येक आउटफिट अतिशय स्टायलिश असतात.
कान्स फिल्म फेस्टिव्हल २०१९ मध्ये ऐश्वर्या राय बच्चनने जलपरी लुक केला होता. यादरम्यान आराध्याचा ड्रेस देखील आपल्या आईसारखाच असल्याचे पाहायला मिळाले आहे. आराध्याने आईच्याच आउटफिटशी मिळताजुळता असा फ्रॉक परिधान केला होता.
मागे काही दिवसामागे पती अभिषेक बच्चनची कबड्डी टीम पिंक प्यानथर्स ला सपोर्ट करण्यासाठी ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्या होत्या त्यावेळी सुद्धा दोघींनी एकसारखे गुलाबी रंगाचे हुडी परिधान केले होते.