अभिनेत्री करिना कपूर खान जी पुन्हा एकदा आई होणार आहे त्यासोबत ती तिच्या पुढचा चित्रपट लालसिंग चड्ढाच्या शू-टिंगमध्ये देखील खूप व्यस्त आहे.
या सर्वांसह आणखी एक कारण आहे ज्यामुळे करीना खूप चर्चेत आली आहे. अलीकडेच करीनाने एक मुलाखत दिली आहे जी सोशल मीडियावर खूप वेगवान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती सैफच्या पहिली पत्नी अमृताबद्दल बोलत आहे.
या मुलाखतीत करीनाने अमृता सिंगचे खूप कौतुक केले आहे. जेव्हा करीना करण जोहरच्या कॉफी विथ करण ह्या शोमध्ये आली होती तेव्हा करनने बोलता बोलता करीनाला तिच्या आणि अमृताच्या नात्याबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली की सैफशी लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत मी अमृता सिंगला भेटली नाही परंतु मी तिचा खूप आदर करते.
करिना सांगते की ती कभी खुशी कभी गम दरम्यान तिला भेटली होती आणि त्या दरम्यान अमृताने तिची मुलगी सारासोबत तिची ओळख करून दिली होती.
आपणास कळू द्या की करीना आणि सारचे आपापसात खूप चांगले जमते. एवढेच नाही तर साराने करिनाला तिची आयडॉल आहे म्हणून सांगितले आहे आणि दोघांचे एकत्रित फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
करिनाच्या म्हणण्यानुसार जेव्हा ती सैफला भेटली होती त्याच्या आधीच सैफ आणि अमृता वेगळे झाले होते. परंतु सैफला भेटल्यानंतर ती कधीही अमृताला भेटली नव्हती. करीना सांगते की सैफ आणि अमृताच्या मुलांचे सर्व काळजी अमृता घायची आणि त्यांना लहाणापासून मोठे करण्यात अमृताचा खूप मोठा वाटा आहे.
पण सैफलाही सारा आणि इब्राहिम खूप लाडके आहेत. मुलांविषयी बोलताना ती सांगते की सैफने मला सांगितले की माझी दोन्ही मुलं माझ्या आयुष्याचा एक भाग आहेत ते दोघेही माझ्या खूप जवळचे आहेत.
करीना कपूर दुसऱ्यांना आई होणार आहे. याबद्दल स्वतः सैफ व करीनाने याबद्दलची माहिती दिली. आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आमच्या कुटुंबात आणखी एक चिमुकला पाहुणा येणार आहे. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांसाठी आणि प्रेमासाठी खूप धन्यवाद असे सैफ व करीनाने सोशल मिडिया पोस्ट मध्ये म्हणले आहे.
काही महिन्यांपूर्वीच करीनाचा गुड न्यूज हा चित्रपट रिलीज झाला होता. त्यावेळी तिला दुसऱ्यांदा आई होण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा दुसऱ्या मुलासंदर्भातील आनंदाची बातमी सध्या आमच्याकडून नाही.
आम्ही तैमुरबरोबर खूप आनंदात आहोत. आम्ही सध्या आमचे काम आणि तैमुरला अधिक वेळ देण्याच्या प्रयत्नात आहोत असं करिनाने म्हटलं होते. मात्र आता करीनाने खरोखरंच कुटुंबीयांना व चाहत्यांना खरी गुड न्यूज दिली आहे.
ऑक्टोबर २०१२ मध्ये सैफ-करीनाने लग्न केले होते. त्यानंतर २०१६ मध्ये करीनाने तैमुरला जन्म दिला. तैमुर सध्या चार वर्षांचा असून सोशल मीडियावर त्याचे बरेच फोटो व व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर करीना व सैफ अली खानवर शुभेच्छांचा जोरदार वर्षाव होत आहे.