९०च्या दशकात बॉलीवूड चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाने लोकांना जिंकून घेतले होते. आपला ठसा या चित्रपट इंडस्ट्रीमध्ये उमटविला होता. सुपरस्टार गोविंदा आणि प्रसिद्ध अभिनेत्री काजोल हे त्यातील असे दोन कलाकार आहेत.
९०च्या दशकात काजोल आणि गोविंदा या दोघांनी बॉलिवूडमध्ये अनेक उत्तम व हिट फिल्म्स दिली आहेत. गोविंदा आणि काजोल या दोघांनी त्यांच्या कारकिर्दीत प्रत्येक नामवंत कलाकाराबरोबर काम केले आहे.
पण त्यांच्या चाहत्यांनी त्या दोघांना मात्र एकत्र कधीही चित्रपटात पाहिले नाही. ९० च्या दशकाच्या प्रत्येक नावाजलेल्या अभिनेत्रीबरोबर गोविंदाने काम केले आहे आणि काजोलने या दशकातील प्रत्येक प्रसिद्ध अभिनेत्याबरोबर काम केले आहे.
पण काजोल आणि गोविंदा मात्र आजपर्यंत एकमेकांबरोबर काम करताना दिसले नाहीत. काजोलने आपल्या दमदार अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत एक स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर गोविंदाला ओळखत नाही असे कोणी नाही, त्याला वेगळ्या कोणत्याही ओळखीची गरजच नाही.
आज जरी दोघेपण चित्रपटामध्ये मुख्य कलाकार म्हणून भूमिका करीत नाहीत. तरी या दोघांची लोकप्रियता अजून कमी झालेली नाही. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत काजोलने खुलासा केला आहे की गोविंदा आणि ती कधीही चित्रपटात एकत्र का काम करू शकत नाहीत.
तिच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री काजोल म्हणाली की आम्ही “जंगल” नावाचा चित्रपट सुरू केला होता. तो चित्रपट दिग्दर्शक राहुल रावल बनवणार होता. या चित्रपटासाठी एक फोटोशूटही करण्यात आले होते. परंतु चित्रपट सुरू होण्यापूर्वीच बंद झाला.
काजोलने पुढे सांगितले, की आम्ही फोटोशूट वगळता चित्रपटाचे कोणतेही चित्रीकरण केले नाही पण गोविंदा एक उत्तम अभिनेता आहे, असे मला म्हणायचे आहे. मी नेहमीच म्हटले आहे की लोकांना हसविणे हे खूप कठीण काम आहे आणि गोविंदा हे काम चांगल्या प्रकारे करू शकतात.
मुलाखतीदरम्यान अभिनेत्री काजोल यांना पुढे विचारले गेले की भविष्यात तुम्ही गोविंदासोबत काम करणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना काजोल म्हणाली, की भविष्यात माहित नाही पण गोविंदा एक उत्तम अभिनेता आहे. जर काहीतरी चांगले घडले तर आम्ही नक्कीच एकत्र काम करू.
अजय, शाहरुख आणि सलमानसोबत काजोलची हिट जोडी:- अभिनेता शाहरुखबरोबर काजोलची जोडी चांगलीच हिट झाली होती. या जोडीने बर्या च सुपरहिट फिल्म्स दिल्या आहेत. त्याचवेळी सलमान खान आणि अजय देवगण बरोबर काजोलची जोडी चाहत्यांनाही खूप आवडली आहे. वास्तविक जीवनातही अजय आणि काजोलची जोडी खूप आदर्श जोडी मानली जाते. विशेष म्हणजे या दोघांचे १९९९ साली लग्न झाले होते.
गोविंदा, करिश्मा कपूर आणि रवीना टंडन हिट :- त्याच वेळी गोविंदाने हिंदीच्या दोन मोठ्या प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर आणि रवीना टंडनसह बरेच सुपरहिट चित्रपट दिले आहेत. या दोन्ही अभिनेत्रींसोबत गोविंदाला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली आहे.
त्यापैकी गोविंदा आणि करिश्मा यांच्या जोडीला तर लोकांनी खूपच पसंत केले. आजही प्रेक्षक या जोडीचे जुने चित्रपट मोठ्या उत्साहाने पाहतात.