सोशल मीडिया नेहमीच प्रत्येकाला मदतीचा हात देत असते. आता कालचीच गोष्ट, आम्हाला रक्ताची गरज होती म्हणून आम्ही सोशल मीडियावर पोस्ट केले आणि सोशल मीडियाच्या मदतीने आम्हाला रक्त देणाऱ्या व्यक्तिने त्वरित संपर्क केला. पण काही वेळेस सोशल मीडियाचा पण गैरवापर केला जातो. दुबईत राहाणार्यास एका महिलेनेही असेच काहीसे केले आहे.
रस्त्यावर भीक मागून हजारो रुपये मिळविणार्याा भिकाऱ्याबद्दल तुम्ही सगळ्यांनीच बरेच वेळा ऐकले असेलच. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका महिलेची ओळख करुन देणार आहोत जी खऱ्या आयुष्यात भिकारी नाही. परंतु तरीही तिने ऑनलाइन असलेल्या लोकांकडून भीक मागून फक्त १७ दिवसांत ३५ लाख इतकी मोठी रक्कम उभी केली आहे.
तुमच्या माहितीसाठी सांगतो की तिने सोशल मीडियावर चक्क लोकांची अशी फसवणूक केली आहे की त्या लोकांना अजून पर्यंत लक्षात येत नाहीये की हे कसे काय घडले असेल. १७ दिवसांत महिलेने असे एक काम केले की त्यामुळे तिने ३५ लाख रुपये कमावले आहेत. जेव्हा याबद्दल तिच्या पतीला समजले, तेव्हा त्याने आपल्या पत्नीला चक्क तुरूंगात पाठवले आहे.
महिला लोकांकडून मदत मागत असे:- या महिलेने सोशल मीडियावर अकाउंट तयार केले व लोकांकडून मदत मागायला सुरवात केली आणि काही कनवाळू लोकांनी तिला मदतही केली आणि हळू हळू तिने १७ दिवसांत सुमारे ३५ लाख रुपये जमा केले.
त्यानंतर, मात्र तिने ऑनलाइन पोस्ट करणे थांबविले आणि या सर्व गोष्टींची माहिती तिच्या नवऱ्याला कळताच त्याने पत्नीला तुरूंगात पाठविले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेवू.
महिला मुलाचे नाव पुढे करून भीक मागत होती:- दुबईमध्ये ऑनलाईन भीक मागणे हा गुन्हा आहे आणि या गुन्ह्यास ६ महिन्यांपर्यंत शिक्षा होऊ शकते, परंतु या महिलेने ती मर्यादा ओलांडली आहे. आपल्या मुलांचा फोटो ती पोस्ट करत असे आणि लोकांना सांगत असे की तिने घटस्फोट घेतला आहे, व आपल्या मुलांचे ती एकटी संगोपन करीत आहे.
पण जेव्हा तिच्या नवऱ्याला हे सगळे अचानक कळले तेव्हा त्याने सांगितले की त्याचा त्या स्त्रीबरोबर खूप पूर्वीच घटस्फोट झाला आहे आणि तो आपल्या स्वत:च्या मुलाचे संगोपन करत आहे. या स्त्री जवळ कोणतेही मूल नाही. अशा परिस्थितीत त्याने पोलिसात तक्रार नोंदविली आणि पोलिसांनी या महिलेवर कारवाई सुरू केली आहे.
नातेवाईक तसेच मित्रांनी महिलेबद्दल सांगितले :- या महिलेचा पूर्वीचा पती म्हणतो की या महिलेने असे सोशल मिडियावर भिक मागून सुमारे ३५ लाख जमा केले होते. मला हे सर्व माझ्या नातेवाईक आणि मित्रांकडून कळले होते.
मग मी लगेच पोलिसांना कळविले आणि पोलिसांनी सांगितले की ती ऑनलाइन भीक मागत आहे. ती सगळ्यांना आपल्या मुलांचे संगोपन करण्याविषयी सांगते आहे. परंतु प्रत्यक्षात त्या महिलेकडे एकही मुल नाही, तिच्या दोन्ही मुलांचा सांभाळ तिचा पतीच करतो आहे. पण या महिलेने मुलांच्या फोटोजचा गैरवापर करून आपले ऑनलाइन भिक मागणे सुरु ठेवले. आता पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे.
https://live36daily.com/wp-admin/post.php?post=3261&action=edit