कोरोना महामारीचा सामना करायचा तर रोगप्रतिकारशक्ती वाढवा- हे घरगुती उपाय करून पहा

Uncategorized

कोविड१९ महामारी सध्या अनेक देशांमध्ये पसरत असतांना, संपूर्ण जग या विषाणूच्या फैलावाला  रोखण्यासाठी झगडते आहे. ज्यांची रोगप्रतिकारशक्ति चांगली आहे ते लोक या कोरोना विषाणूंचा सामना चांगल्या प्रकारे करण्यासाठी सज्ज आणि अधिक समर्थ असतील या गोष्टीवर डॉक्टरांचे देखील एकमत आहे. आपली रोगप्रतिकार शक्ती नैसर्गिक रीतीने कशी वाढवता येईल ते आपण पाहूया.

 

कोरोना विषाणूमुळे आलेल्या या आव्हानात्मक परिस्थितीत आपली रोगप्रतिकारशक्ति हीच सर्वाधिक महत्वाची आहे. आपल्याला आपली रोगप्रतिकारशक्ति नैसर्गिक रीतीने वाढवण्यासाठी काही सहज व सोपे उपाय आम्ही या लेखात देत आहोत.

 

१.     कडूलिंब आणि हळद –आपल्याकडे कडूलिंब अनेक भागात सापडतो आणि हळद तर  सगळीकडेच उपलब्ध असते. तुम्ही कडूलिंबाची आठ-दहा पाने आणि थोडीशी हळद कोमट     पाण्यातून घेणे हा एक साधा व सहज नैसर्गिक उपाय करू शकता. तुम्ही सकाळी रिकाम्या     पोटी हे मिश्रण प्यायले तर तुमची बाहेरच्या विषाणूंचा सामना करण्याची क्षमता अनेक पटीने    वाढेल. ह्यासाठी साधारण तीन ते सहा आठवडे तुम्ही हा प्रयोग केला पाहिजे. ह्याचा तुम्हाला       खूप फायदा होईल.

 

२.     बेलाची (महाविल्व) पाने – बेलाची पाने आपण महादेवाला वाहाण्यासाठी कायम घरात पूजेसाठी आणतो. तुम्ही रोज सकाळी तीन ते पाच पाने खाल्ली तर त्यानेसुद्धा तुमची रोगप्रतिकारशक्ती बर्‍याच मोठ्या प्रमाणात सुधारेल.

 

३.     ब्लैक टी आणि ग्रीन टी- रोगप्रतिकारशक्ति वाढविण्याचा हा उत्तम उपाय आहे. दररोज यांचे  १ ते २ कप सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारशक्ति चांगली राहाते. पण याचे अतिरिक्त सेवन    नुकसान करणारे आहे.

 

४.     शरीरास जंतुसंसर्गापासून वाचवण्यासाठी विटामिन सी हे अत्यंत फायदेशीर असते. लिंबू आणि  आवळा हे दोन्ही विटामिन “सी” चे उत्तम स्त्रोत आहेत. त्यामुळे यांचा नियमित वापर  आपल्या आहारात करा.

 

५.     शरीराची रोग प्रतिकारकशक्ति वाढवण्यासाठी कच्चीलसूण औषधाचे काम करते. लसणीमध्ये     विटामिन ए, सल्फर आणि जिंक असते जे तुमची प्रतिकारशक्ति वाढविण्यास मदत करते.

 

६.     यामध्ये आयुर्वेदिक उपाय म्हणजे शतावरी, अश्वगंधा, शिलाजित, तुळस आणि हळद इत्यादीचा  रोजच्या आहारात समावेश करणे हे पण आवश्यक आहे.

 

७.     बदाम- यामध्ये विटामिन ए जास्त असते. दररोज ८ ते १० बदाम खाण्याने रोग प्रतिकारशक्ति   वाढते.दही सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ति वाढते. तसेच पचन शक्ती व्यवस्थित   करण्यासाठी देखील उपयोगी ठरते.

 

८.     फळांमध्ये आंबट फळे, अननस आणि संत्री यामध्ये विटामिन सी असतात जे शरीरातील चांगले   कोलेस्ट्रोल वाढवते आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करते.त्यामुळे मौसमी फळे  नियमित खावीत.  रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मशरूम खाणे देखील फायदेशीर ठरते.

 

९.     रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या ह्या सर्वोत्तम मानल्या जातात. पालकामध्ये फोलिक एसिड असते जे शरीरात नवीन सेल्स बनवण्यासाठी आणि जुने सेल्स    चांगले करण्यासाठी उपयोगी आहे. पालकामध्ये फाइबर, आयरन एंटी-ऑक्सीडेंट आणि   विटामिन सी पण असते जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते.ब्रोकली मध्ये विटामिन सी  आणि ए असते ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ति वाढते. सोबतच शरीराला प्रोटीन आणि कैल्शियम मिळते.

Gayatri Dheringe

MBA , Management Gayatri is Content Writers she Have experience more than 2 year + in Content Writing

http://hrkmedia.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *