Breaking News

खोकल्याचे सर्वात प्रभावी औषध- कितीही भयंकर कफ मिनिटात बाहेर फेका. 

नमस्कार.आज आपण असा एक उपाय पहाणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला जर कोरडा खोकला येत असेल किंवा कफयुक्त खोकला येत असेल, तर तो पुर्णपणे बरा होणार आहे. तसेच श्वसनाच्या सर्व समस्यांवर हे रामबाण औषध आहे. या औषधामुळे तुमची ऑक्सीजन लेवल नेहमी १०० टक्के राहील आणि तुम्हाला कधीही ऑक्सीजनची कमतरता भासणार नाही. याशिवाय, घसा खवखवणे, घसा दुखणे, छातीत कफ साचणे, या सर्व समस्यांवर हा उपाय म्हणजेच रामबाण औषध आहे. चला तर मग हा उपाय कसा करायचा ते आपण पाहूया. पण याआधी माझी आपणास विनंती आहे की या माझ्या माहितीला तुम्ही शेअर करा व लाइक करायला विसरू नका.

 

हा उपाय करण्यासाठी पहिला घटक आपण घेणार आहोत ते म्हणजे हळद. तुम्हाला माहीतच आहे, हळदीमध्ये करक्युमिन हा औषधी गुणधर्म असतो पण त्याचबरोबर हळद ही अटी-इन्फ्लमेटरी, अॅंटी-ओकसिडेंट आणि टी-एलर्जीक, इम्युनो मॉड्युलेशन ह्या गुणांनी परिपूर्ण असते. हळद ही आयुर्वेदामधील अॅंटी-बिओटीक म्हणून ओळखली जाते. त्यामुळे घशामध्ये जर जंतु-संसर्ग झाला, तर त्या जंतुना नष्ट करण्याचे काम हळद करते. तर अशी ही हळद पाव चमचा आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर दूसरा घटक आहे सुंठीचे चूर्ण. आपल्या पूर्वजांनी म्हटल्याप्रमाणे “सुंठीवाचून खोकला जात नाही” सुंठीमध्ये अॅंटी-ओकसिडेंट, अॅंटी-इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे घशाला आलेली सूज सुंठीमुळे कमी होते. तर अशी ही सुंठ १/२ चमचा आपल्याला ह्या हळदीमध्ये मिक्स करायची आहे. यानंतर तिसरा घटक आपण घेणार आहोत, काळ्या मिरीचे चूर्ण. काळ्या मिरी मध्ये अॅंटी-बॅक्टीरियल गुणधर्म असतात त्यामुळे घशामधील जंतूंचा नायनाट होते. त्याचबरोबर, काळी मिरी ही कफनाशक आहे. अशी ही काळी मिरी मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यायची आहे. जेणेकरून काळ्या मिरीची एकदम बारीक पाऊडर तयार होईल. तर असे हे काळ्या मिरीचे एक चिमुट चूर्ण आपल्याला ह्यामध्ये टाकायचे आहे. हयानंतर शेवटचा व चौथा घटक आपण घेणार आहोत तो म्हणजे मध. मधाला आयुर्वेदामध्ये संपूर्ण आहाराचा दर्जा देण्यात आला आहे. मधामध्ये अॅंटी-बायोटीक गुणधर्म असतात त्यामुळे घशातील जंतुसंसर्ग कमी होतो. तसेच, घशातील खवखव, घसा दुखणे व खोकला हयापासून आराम मिळतो. तर असा हा गुणकारी मध आपल्याला एक चमचा घ्यायचा आहे. आता हे चारही घटक आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत व एकजीव झाल्यानंतर आपले हे खोकल्यावरचे औषध तयार झाले आहे. ह्या औषधामुळे शरीरातील ऑक्सीजनची लेवल १०० टक्के राहील. कधीही तुमची ऑक्सीजनची लेव्हल कमी होणार नाही. तर एका व्यक्तीसाठी हे औषध तयार झाले आहे. एकाच वेळी थोडे थोडे हे औषध चाटून खायचे आहे ज्यामुळे या औषधाचा घशात थर तयार होईल व जंतुसंसर्ग दूर होईल. अर्धा तास पाणी किंवा काही खाऊ नये. असा हा उपाय तुम्हाला दिवसातून ३ वेळा करायचा आहे. तुमचा खोकला बरा होईल. तुमच्या घशासंबंधी सर्व समस्या दूर होतील. चला तर मग आजच्या पुरते इतकेच. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह.

About Gayatri Dheringe

MBA , Management Gayatri is Content Writers she Have experience more than 2 year + in Content Writing

Check Also

मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईकचा झाला घ’टस्फो’ट

नमस्कार मित्रांनो अभिनेत्री मानसी नाईक ही मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनेत्री मानसी नाईकचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *