कोणतेही घर बनविण्याआधी त्या घराचा पाया किंवा पहिली वीट योग्य वेळेला आणि योग्य जागी ठेवली गेली पाहिजे. त्यामुळे त्या घरावर कोणत्याही वाईट गोष्टींचा प्रभाव पडू नये आणि त्या घराचा पाया हा त्या घरासाठी आनंद घेऊन येईल. त्याचबरोबर, घरातील वस्तु योग्य ठिकाणी व योग्य दिशेला ठेवल्या तर घरावर त्याचा चांगला प्रभाव पडतो. कोणती वस्तु कोणत्या दिशेला ठेवली पाहिजे ह्याचा उल्लेख वास्तुशास्त्रामध्ये केला गेला आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी खाली दिलेल्या गोष्टीं ठेवताना दिशेकडे खास लक्ष दिले गेले पाहिजे आणि त्या वस्तु योग्य दिशेला असणे, हे सगळ्यात उत्तम असते.
घराचा मुख्य दरवाजा- कोणतेही घर बनविताना त्या घराचा मुख्य दरवाजा बनविण्याकडे जास्त लक्ष दिले जाते आणि वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही घराचा मुख्य दरवाजा फक्त पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असला पाहिजे आणि दरवाजाचा आकार छोटा नसावा. त्याचबरोबर दरवाजावर स्वस्तिकचे चिन्ह असणे हे देखील शुभ असते.
तुळशीचे रोप किंवा झाड- साधारण सगळ्या घरांमध्ये तुळशीचे रोप असते आणि त्या झाडाची लोक रोज पूजा करतात. त्याच तुळशीच्या रोपाचा उल्लेख करताना वास्तुशास्त्रामध्ये असे सांगितले आहे, की हे तुळशीचे रोप ठेवण्याचे उत्तम स्थान हे मुख्य दरवाजाच्या जवळ असते आणि हे रोप नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवले पाहिजे. त्याचबरोबर जे लोक आपल्या घरात हे रोप लावतात त्यांनी रोज याची पुजा आणि त्याला पाणी अर्पण केले पाहिजे.
आरसा कोणत्या स्थानी लावावा- प्रत्येक घरात एक आरसा जरूर असतो आणि वास्तुशास्त्रानुसार आरसा घराच्या केवळ पूर्व किंवा उत्तर भिंतींवर लावणे योग्य मानले जाते. आरशासाठी घराची दक्षिण दिशा चुकीची मानली जाते.
घरात अंधार होऊ देऊ नका- संध्याकाळच्या वेळी घरातील कोणत्याही खोलीत अंधार नसावा आणि काही कालावधीसाठी संध्याकाळंच्या वेळी घरातील प्रत्येक खोलीतील दिवा लावून ठेवला पाहिजे. खोलीत अंधार करू नये. असे केल्यामुळे घरात प्रकाश सतत राहातो व प्रकाशामुळे सकारात्मक ऊर्जा जाणवते.
किती खिडक्या असल्या पाहिजेत- घर बनविताना लोक घराच्या खिडक्यांकडे जास्त लक्ष देत नाहीत, परंतु, घरातील खिडक्यासुद्धा वास्तुशास्त्रानुसार घरावर परिणाम करतात. खिडक्यांशी निगडीत वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही फक्त एक खिडकी असू नये आणि घरातील खिडक्यांची संख्या २, ४, ६, ८ आणि १० एवढी असली पाहिजे.
तिजोरीचे तोंड- प्रत्येक घरात तिजोरी असतेच आणि त्या तिजोरीत लोक पैसे जरूर ठेवतात. असे म्हटले जाते, जर तिजोरीचे तोंड पूर्व दिशेला असेल तर ते धनासाठी उत्तम मानले जाते व घरात खूप धन येते. त्याचबरोबर रोज तिजोरीची पुजा उदबत्तीने केली गेली पाहिजे आणि तिजोरीवर माता लक्ष्मीची तसबीर लावली पाहिजे.