नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, सगळ्यांनाच असे वाटत असते की आपण सुंदर दिसावे. सुंदर रहाणे व दिसणे हा सगळ्यांचा अधिकार आहे. कारण वयानुसार किंवा निसर्गाप्रमाणे आपल्या शरीरामध्ये व चेहर्यामध्ये बदल होत असतात. तसेच चेहर्यावर सुरकुत्या पडणे, मुरूमे येणे, काळे डाग पडणे किंवा कोणत्याही प्रकारच्या पुटकुळया येणे अशा समस्या निर्माण होत असतात. त्यासाठी आपण रसायनयुक्त क्रीमचा नेहमीच उपयोग करत असतो. परंतु, रसायनांमुळे दुष्परिणाम तर होतात शिवाय आपला खर्च पण होतो. या सगळ्या समस्यांवर उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुमच्या चेहर्याची सुंदरता टिकून राहील व चेहरा सतेज, तेजस्वी व चमकदार दिसण्यास खूप मदत होईल.
मित्रांनो, याकरिता आपल्याला हवे आहे टोमॅटो, लिंबू, हळद पाऊडर आणि साखर. हे नैसर्गिक व आपल्या रोजच्या वापरात लागणारे पदार्थ आहेत. तसेच हा उपाय स्वस्त व करायला सोपा आहे. टोमॅटोचे २ तुकडे करून घ्या. एका टोमॅटोच्या तुकड्याला हळद लावा. हा हळद लावलेला टोमॅटो आपल्या चेहर्यावर हळुवार पद्धतीने फिरवायचा आहे. मी तुम्हाला इथे हातावर फिरवून दाखवते. हलके मालीश करा. या मसाजमुळे आपल्या चेहर्यावरची त्वचा सुंदर, सतेज होण्यास खूप मदत होईल. याप्रमाणे मधून मधून टोमॅटो हलके दाबा त्यामुळे त्यातील रस हळदीत मिसळेल. या प्रमाणे ५ मिनिटे मालीश केल्यानंतर आपण आपला चेहरा कोमट पाण्याने धुवायचा आहे. हळदीमध्ये अॅंटी-बॅक्टीरियल गुणधर्म असल्यामुळे आपल्या चेहर्याची सुंदरात वाढण्यास खूप मदत होते. आता याला स्क्रब करायचे आहे. ते कसे करायचे आहे ते मी तुम्हाला दाखवते. आता आपण दूसरा टोमॅटोचा तुकडा घ्यायचा आहे. त्या तुकड्यावर आता साखर घाला किंवा टोमॅटो साखरेत बुडवून घ्या. त्यावर आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आहे. पूर्ण रस पिळून घ्या. आपल्याला हयाप्रमाणे चेहरा स्क्रब करायचा आहे. गोलाकार मालीश करायचे आहे. हा मसाज ५ मिनिटे पूर्ण करायचा आहे. हा मसाज केल्यावर चेहरा स्वछ पाण्याने धुवायचा आहे. मित्रांनो, लिंबू व साखरेच्या स्क्रबमुळे तुमच्या चेहर्यावरील मृत त्वचा निघून जाईल. हे बघा माझ्या हातामध्ये किती फरक जाणवतो आहे. तुमच्याकडे जर लग्न असेल, तर हा उपाय तुम्ही लग्नाच्या ८ दिवस अगोदर केला तर तुमचा चेहरा उजळून निघेल, तजेलदार दिसेल.