घटना आणि मनुष्य यांचे परस्परांशी खोलवर नाते आहे. घटना ह्या काळाबरोबर मनुष्याच्या जीवनात घडत असतात. यातील बर्याचशा घटना जीवनत आनंद घेऊन येतात, तर बर्याच घटना हसता खेळता परिवार उधव्स्त करतात. आपण नेहमीच आपल्या जीवनात घडणार्या घटनांना मामुली किंवा सामान्य समजून त्याच्याकडे दुर्लक्ष करतो परंतु, यामधील बर्याच घटना आपल्याला आपल्या येणार्या भविष्याविषयी सूचित करत असतात. शास्त्रांमध्ये पण ह्या गोष्टींचे वर्णन बघायला मिळते, की घटना मनुष्याला अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितिसाठी तयार करतात. आजच्या या खास लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशा ४ परिस्थितिंबद्दल किंवा असे म्हणा की घटनांच्या संकेतांबद्दल सांगणार आहोत, ज्या आपल्याला आपल्या येणार्या शुभ काळाचा संकेत देतात.
ह्या घटना कोणत्याही रूपात आपल्या समोर येतात पण वेळेत त्यांना ओळखणे आपल्या हातात असते. घटना कधी आपल्यासाठी शुभ असतात किंवा कधी अशुभ असतात त्याशिवाय या घटना आपल्या जिवनावर त्यांचा प्रभाव टाकतात. चला तर मग जाणून घेऊया चांगले जीवन किंवा उज्ज्वल भविष्य यापूर्वी देवाकडून आपल्याला कोणकोणते संकेत प्राप्त होतात.
चिमणीचे आपल्या घरात घरटे बांधणे: चिमणी किंवा घरात येणारी चिमणी हिला शास्त्रांमध्ये शुभ मानले गेले आहे. असे मानले जाते, की कोणत्याही व्यक्तीच्या घरात जेव्हा चिमणी घरटे बांधते व त्यामध्ये आपल्या पिल्लांना जन्म देते, तर ते घर आनंदाचे खुशीचे प्रतीक मानले जाते. हा संकेत मिळाल्यानांतर काही कालावधीतच आपल्याला शुभ बातम्या मिळू लागतात आणि घरापासून संकटे काही कोस दूर पळून जातात. म्हणून चिमणीने घरात घरटे बांधणे आपल्यासाठी चांगला संकेत मानला जातो.
सकाळी मांजरीची पिल्ले दिसणे: देवाने धरती निर्माण केली व दिवस आणि रात्र बनवले. त्यामध्ये सकाळच्या प्रकाशाला चांगल्या गोष्टींचे प्रतिक मानले जाते तर रात्रीच्या अंधाराला नकारात्मक शक्तींचा निवास मानले गेले आहे. सकाळी उठल्यावर जर आपल्याला काही शुभ बातमी मिळत असेल, तर आपला पूर्ण दिवस आनंदात जातो. तसेच कोणत्याही मनुष्याला सकाळी उठल्यावर मांजरीची पिल्ले दिसली तर तो त्याच्यासाठी व त्याच्या परिवारासाठी शुभ संकेत आहे. जर तुमच्याबरोबर अशी घटना घडली, तर तुमचा चांगला काळ काही पावलांच्या अंतरावर आहे.
मुंग्यांची झुंड (समूह) घरात दिसणे: मुंग्यांचे नाव आले की आपल्याला राग येतो. पण मुंग्या जेवढी मेहनत करतात, तेवढी आपण १०० जन्मात करू शकत नाही. या शिवाय मुंग्या ह्या एकतेचे प्रतिक आहेत, ज्या नेहमी समूह बनवून एका रांगेत चालत राहातात. जर तुमच्या घरात तुम्हाला काळ्या मुंग्या एकत्र दिसल्या तर तो तुमच्यासाठी शुभ संकेत आहे. या संकेताचा अर्थ असा आहे, की खूप लवकर खुशी तुमच्या पायाशी येणार आहे, तुम्हाला धन प्राप्ती होणार आहे.