ज्या लोकांच्या हातावर असते ‘X’ आणि ‘M’ ची अशी खू न, ते असतात जन्मातच भाग्यशाली. झूम करून पहा …

Letest News

समुद्रशास्त्राच्या म्हणण्यानुसार आपण आता तुमच्या बाबतीतल्या व्यक्तीमत्वाची एक खास उकल करणार आहोत. आणि ही उकल अवलंबून आहे ती म्हणजे तुमच्या तळहातांवरील रेषांनी बनवलेल्या आकारांवर. ज्यांच्या तळहातांवर एम अथवा एक्स यांसारख्या अल्फाबेटांचा आकारा तयारा झालेला आहे .

त्यांच्या नशीबात आणि त्यांच्या व्यक्तिमत्वात असलेले काही खास गुण असतात ज्या गुणांवर त्यांची स्वत:ची पारख तर ठरतेच याखेरीज त्यांना स्वत:च्या जिवनातील अनेक योग्य गोष्टींचा उलगडा होण्यास मदत होते. अशा रेखा अर्थात हस्तरेखा जर तुमच्या हातावर असतील तर तुमच्याइतके नशीबवान तुम्हीच असालं.

अशा व्यक्तींना त्यांच्या आयुष्यातील सुरूवातीच्या महत्वाच्या काळात फार प्रचंड संघर्ष करावा लागतो. परंतु पुढे जाऊन त्यांच्या संघर्षाला उचीत असं यश त्यांना हमखास मिळतं. ज्या यशावर पोहोचल्यानंतर समृद्धी आणि आर्थिक भरभराट अगदी खुप प्रमाणात त्यांच्या पदरात येतो. सहसा पाहिलं तर या लोकांची ही नशीबाची रेषा २१ व्या वर्षानंतर खुलल्या जाते.

अशा प्रकारच्या व्यक्तिरेखांमधे एखाद्याला प्रसंगाला तोंड द्यायची क्षमता भरभरून असते, ते माघार घेत नाहीत. याच क्षमतेमुळे त्यांच्यामधे निर्णय घेऊन इतरांना योग्य दिशा दाखवण्याची कुवत निर्माण झालेली असते. यांच नेतृत्व अगदी कुशल आणि भन्नाट असतं.

मुळात तळहातावर असणारे हे एक्स आणि एम फॅक्टर या लोकांना अधिक प्रेमळ आणि फार भावनिक बनवतात. यांच्यामधे प्रेमात समर्पन आणि खरेपणाची भावना कायम तेवत असल्याने प्रेमात हे कधीही कोणाला दुखावत नाहीत. त्यांच्या या काही खास गुणांमुळे इतर लोक त्यांच्या सानिध्यात स्वत:ला सकारात्मक भुमिकेत पाहू लागतात.

मुळात एक्स आणि एम यांसारख्या रेषांचा आकार तळहातांवर जन्माने घेऊन येणारे काहीस संमिश्र प्रकारच्या जिवणाची आखणी करून आलेले असतात. तुम्ही अशा प्रकारच्या लोकांकडून जेव्हा एखाद्या कामाची अपेक्षा करता तेव्हा हे लोक कायम तितक्याच विश्वासाने आपलं काम पुर्ण करण्यास प्राधान्य देतात.

कामात सच्चेपणा हा कायम यांच्या रक्तात भिनलेली गोष्ट समजावा. तळहातांवर जेव्हा एक्स ही रेषा असते तेव्हा त्यांच्यातल्या काही गुणांवर नक्कीच त्यांच्या सहवासातले सहकारी अगदी भारून जातील अशा काही यांच्यातील खुबी आहेत.

यांना प्रसिद्धी अगदी भरभरून मिळते. याखेरीज महत्वाचं म्हणजे, हे लोक फार यशस्वी होऊन दाखवतात. एक्स अक्षर असणारे लोक फार मोठी स्वप्ने पाहण्याच धाडस करतात आणि ते पुर्ण करण्याची जिद्दही बाळगतात. एक्स अक्षर तळहातांवर घेऊन बाळगणारे दिसायला फार सुंदर आणि आकर्षक ठरतात.

सौंदर्य यांच्यात फार सहज पहायला मिळतं. याखेरीज अनेकदा असे लोक हे मोठ्या आणि ताकदीच्या पदांवर कार्यरत होतात. यांच्यामधील “सिक्स्थ सेन्स” हा अगदी प्रचंड वेगाने काम करताना पहायला मिळतो. हे लोक मनाने हळवे असतात ते प्रेमात फार योग्यरित्या यशस्वी होतात. त्यांचा कल वाद निर्माण करण्यापेक्षा वाद मिटवण्याकडे जास्त असतो.

तर मुळात या अशा काही गोष्टी आहेत ज्या एक्स आणि एम यांसारख्या रेषांचा आकार तळहातांवर घेऊन आलेले असतात. आता हे सर्व माहित झाल्यावर आपसूकच तुम्हीदेखील आपल्या तळहातांच्या या खुणा तपासणार यात काही वादच नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Dnyaneshwar Harak

Dnyaneshwar Harak is the Founder and editor of Hrk media Previously, he's worked in multiple news media organisationsh as journalists main focus on real news and true voice on people .

http://hrkmedia.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *