दातामधील किडीवर उपाय: दातांमधील किड आपली सुंदरता कमी करतेच त्याचबरोबर आपल्याला खूप जास्त त्रास देते, वेदना देते. बहुतांशी या समस्या लहान मुलांमध्ये आपल्याला दिसतात, कारण मुले गोळ्या, चॉकलेट जास्त प्रमाणात खातात व तोंड चुळा भरून स्वछ करीत नाहीत. पण आता मात्र ही समस्या साधारण प्रत्येक वयातील व्यक्तिमध्ये आढळून येते. चला तर मग जाणून घेऊया या दातांमधील किडींपासून सुटका आपण कशी मिळवू शकतो व दातांमध्ये किड लागण्याची मुख्य कारणे याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती करून देणार आहोत. पण यासाठी तुम्हाला आमची ही माहिती किंवा लेख शेवटपर्यंत वाचणे जरूरी आहे.
साधारणपणे दातांमधील वेदना लोक सहन करत जातात, पण किड लागल्यामुळे ज्या वेदना होतात, त्या सहन करणे शक्य नसते, अशा वेळी आपल्याला समजत नाही आपण काय केले पाहिजे व काय नाही ज्यामुळे या असह्य वेदना थांबतील. चला आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगतो, ज्यामुळे तुमची ही समस्या दूर होईल. इथे तुम्हाला एक गोष्ट सांगू इछितो, जेव्हा वेदना होतील, तेव्हा प्रथम डॉक्टरशी संपर्क केला पाहिजे., पण जर काही कारणांमुळे तुमचा डॉक्टरशी संपर्क होऊ शकत नसेल, तर हा उपाय अजमावून पाहू शकता.
दातांमध्ये कीड लागण्याची कारणे:
चला तर मग जाणून घेऊया कोणत्या कारणांमुळे दातांमध्ये किड लागते, ज्यामुळे पुढे तुम्ही सावधान राहाल व तुमचे दात स्वस्थ राहातील.
- जास्त गोड खाण्यामुळे दातांमध्ये किड लागते. त्यामुळे जेव्हा तुम्ही गोड पदार्थांचे सेवन कराल, तेव्हा तोंड चांगल्या पद्धतीने स्वछ केले पाहिजे.
- भोजनांनंतर दातांची नियमित सफाई न केल्यामुळे किड लागू शकते. म्हणून, भोजनांतर किंवा काही खाल्ल्यानंतर दातांची नियमित व व्यवस्थित सफाई केली पाहिजे.
- चिकट पदार्थ खाल्यामुळे किड लागू शकते, कारण हे पदार्थ दाताच्या फटीत घुसतात. त्यामुळे अशा पदार्थांचे सेवन वारंवार करता कामा नये व केले तर दातांची सफाई करावी. दात घासावेत.
दातांमध्ये लागलेल्या किडींवर उपाय:
जेव्हा दातांमध्ये किड लागेल, तेव्हा सगळ्यात पहिले डॉक्टरना दाखवले पाहिजे., पण जर किड लागायची सुरुवात झाली असेल, तर घरगुती उपाय करू शकता. चला तर मग आज आम्ही एक असा उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमचे दात स्वस्थ ठेवू शकता.
उपाय: एक चिमटी तुरटी पाऊडरमध्ये एक थेंब लवंगेचे तेल मिसळून पेस्ट तयार करा. ती पेस्ट घेऊन आपल्या दातांवर चांगल्या प्रकारे मालीश करा. असे रोज केल्यामुळे तुमची दाताची समस्या नाहीशी होईल. तसेच रोज दोन वेळा सकाळी व रात्री दात घासणे दातांच्या चांगल्या आरोग्यासाठी जरूरी आहे.