हिंदू धर्मातील सर्व विवाहित महिला त्यांच्या पायात जोडवी घालतात. आपल्या धर्मात दोन्ही पायांच्या मधल्या बोटात म्हणजे दोन नंबरच्या बोटात जोडवी घालण्याचा रिवाज आहे.
स्त्रियांचा शृंगार हा कपाळावरील टिकली किंवा कुंकू पासून ते पायातील जोडव्यांपर्यंत आहे. म्हणजे जोडवी हे स्त्रियांचे अंतिम प्रेम. महिलांच्या कपाळावर सोन्याची टिकली आणि पायात चांदीची जोडवी परिधान करण्याचे कारण म्हणजे त्यांच्यावर सूर्य आणि चंद्र या दोघांची कृपादृष्टी आयुष्यभर राहावी.
पण हे तुम्हाला माहित नसेल की ही जोडवी पतिच्या दारिद्र्याचे कारण देखील असू शकतात. होय, हे अगदी सत्य आहे की जोडवीदेखील पतिच्या दारिद्र्याचे कारण बनु शकतात.
स्त्रिया ही जोडवी का घालतात:- हिंदू धर्मामध्ये विवाहित भारतीय स्त्रिया जोडवी घालतात. जोडवी ही फक्त विवाहित महिलेचे नव्हे तर त्यामागे असलेल्या वैज्ञानिक वस्तुस्थितीचे प्रतिक आहे. वेदांनुसार अशी मान्यता आहे, की जोडवी जर दोन्ही पायात परिधान केली, तर स्त्रियांची मासिक पाळी नियमित होते. खरे तर, भारतातील शहरी भागात ही प्रथा कमी झाली आहे. परंतु अजूनही ग्रामीण भागात त्याचे महत्त्व टिकून आहे.
जोडवी हे नेहमी उजव्या आणि डाव्या पायाच्या दुसऱ्या बोटात परिधान केले जाते. हे गर्भाशयाचे नियंत्रण देखील करते. चांदीचे एक चांगले मार्गदर्शक असल्याने जोडवी पृथ्वीची ध्रुवीय उर्जा सुधारतात आणि शरीरात त्याचे संक्रमण करतात, ज्यामुळे संपूर्ण शरीर ताजेतवाने होते.
भारतीय परंपरेप्रमाणे प्रत्येक स्त्री लग्नानंतर तिच्या पायामध्ये जोडवी घालते. येथे हे देखील लक्षात घेतले पाहिजे की फक्त विवाहित स्त्रियाच जोडवी परिधान करतात. कुमारी मुलींनी जोडवी घालू नयेत.
जोडवी घालण्यामागे विश्वास असा आहे की यामुळे स्त्रियांची नियमितपणे मासिक पाळी येते. याशिवाय जोडवी घातल्यामुळे महिलांना गरोदर असताना कोणतीही अडचण येत नाही. पण फारच थोड्या लोकांना हे माहीत आहे, की जर पत्नीने आपल्या पायाची जोडवी व्यवस्थित घातली नाहीत तर जोडवी तिच्या पतिच्या दारिद्र्याचे कारण बनू शकतात.
जोडवी पतीच्या दारिद्र्याचे कारण कसे आहे:- आपल्या भारतात हिंदू महिला सोळा शृंगारासाठी प्रसिद्ध आहेत. कपाळावरील टिकलीपासून ते पायात जोडव्यापर्यंत प्रत्येकाचे असे स्वतःचे महत्त्व असते.
पायाच्या अंगठाल्या लागून असलेल्या दुसऱ्या बोटात एक विशेष नस असते जी थेट गर्भाशयाशी जोडली गेलेली असते, व जी गर्भाशयाला नियंत्रित करण्याचे काम करते आणि रक्तदाब संतुलित करते. जोडव्याच्या दाबांमुळे रक्तदाब नियमित आणि नियंत्रित राहतो.
पण, जोडवी ही पतिच्या दारिद्रयाचे कारण ठरू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार जोडवे परिधान करण्याचे कारण हे सूर्य आणि चंद्राचे प्रतिक मानले जाते. अशी मान्यता आहे, की जोडवी पायात घातली, तर सूर्य आणि चंद्र यांची कृपादृष्टी पती आणि पत्नी दोघांवरही राहते. हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की जोडवी हे नेहमीच चांदीची घालावी.
चुकूनही सोन्याचे जोडवे पायात कधीही घालू नका. पायात घातलेली जोडवी कधीही सैल घालू नये. आपले जोडवे दुसर्यान कोणालाही वापरला देऊ नये याची काळजी घ्या. असे करणे म्हणजे पतीच्या दारिद्र्य आणि आजाराचे कारण बनू शकते.