बॉलीवूड अभिनेत्रींचे नवनवीन किस्से आपण रोजच्या जीवनात ऐकत असतो आणि त्यांची फॅशन कोणापासूनच लपून राहत नाही, या फॅशनमुळे कधी कधी त्या इतक्या पुढे जातात की, ते त्यांना खूप जास्त महागात पडते आणि त्या तरीही ही फॅशन फॉलो करत असतांना दिसतात, याने तुम्हालाही लाज वाटेल.
अशीच एक वाईट घटना बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्यासोबत झालेली आहे. प्रियांकाला तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे अनेकवेळा प्रेक्षकांनी ट्रोल केलेले आहे. प्रियांका चोप्रा मिस वर्ल्ड 2000 स्पर्धेची विजेती आहे आणि ती भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकीही एक आहे.
भारत सरकारने 2016 मध्ये तिला पद्मश्री देऊन गौरविले सुद्धा आहे. 2018 मध्ये अमेरिकन अभिनेता निक जॉन्ससोबतच्या तिच्या लग्नाचीही खूप जास्त चर्चा झाली होती. हा विवाह त्यांनी भारतातील राजस्थानमधील जोधपूर शहरामध्ये केला आहे . हा संपूर्ण विवाह हिंदू संस्कृतीनुसार झाला होता, परंतु त्यानंतर त्या दोघांनी ख्रिश्चन धर्मानुसार परत लग्न केले आहे.
प्रियांका चोप्रा जेव्हा जेव्हा अवॉर्ड शोमध्ये दिसली तेव्हा तेव्हा ती तिच्या ड्रेसमुळे खूप जास्त चर्चेचा विषय बनते आणि पुन्हा एकदा ती एका अवॉर्ड शोमध्ये ब्लॅक बॉडीकॉन स्टाइलच्या ड्रेसमध्ये दिसली आहे. ड्रेसला एका बाजूला वरपर्यंत कट होता आणि त्या कटला जाळी लावलेली होती, त्यामुळे तिच्या शरीराचा बराचसा भाग स्पष्ट
पणे दिसत होता. जेव्हा ती इकडे-तिकडे जात येत होती तेव्हा लोक तिच्याकडे एकटक पाहत होते आणि जेव्हा प्रियांकाला याची माहिती मिळाली तेव्हा ती तिचा तो भाग लपवताना सुद्धा दिसली आहे.
अभिनेत्री प्रियांका चोप्राचे सर्व फोटो सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल झाले आहे आणि ही काही पहिलीच वेळ नाही जेव्हा अशा प्रकारचा ड्रेस परिधान केल्याने अनेकदा चर्चेचा विषय झाला आहे, परंतु ती अशा पोस्ट करत असते, ज्यामुळे लोक तिचे वेडे होतात. तिला, पण त्याचवेळी तिला खूप ट्रोलही व्हावे लागते.