मृगया या चित्रपटातून १९७६ मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरवात करणाऱ्या मिथुन चक्रवर्तीला देशातील सुपरस्टार मानले जाते. त्यांना आतासुद्धा अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम करताना आपण पाहत असतो.
असे म्हणतात, की काळाप्रमाणे मिथुन चक्रवर्तीचा अभिनय अधिक अधिक उत्तम होत चालला आहे. एक वेळ अशी होती, कि जेव्हा मिथुन चक्रवर्ती बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक मानले जात होते.
मिथुन चक्रवर्ती जितके अधिक आपल्या बॉलीवूड कारकिर्दीत चर्चेमध्ये राहिले तितकेच ते वैयक्तिक आयुष्यात देखील चर्चेमध्ये राहिले. त्यांच्याबद्दल असे म्हटले जाते कि त्यांनी आपल्या आयुष्यात तीन लग्न केली आहेत. अभिनेता मिथुन चक्रवर्तीने श्रीदेवी बरोबरच्या लग्नाबद्दल बातम्या देखील समोर आल्या होत्या.
मिथुन चक्रवर्तीने केली आहेत तीन लग्न:मिथुन चक्रवर्ती बॉलीवूड इंडस्ट्रीमधील पहिले असे अभिनेते आहेत ज्यांच्या चित्रपटाचे बजेट कमी असून देखील त्यांच्या चित्रपटांनी करोडोंचा धंदा केला आहे. मिथुन चक्रवर्तीचे बालपणीचे नाव गौरांग चक्रवर्ती असे होते. पण ते नाव त्यांनी बॉलीवूडमध्ये आल्यानंतर बदलले होते. १६ जून १९५० रोजी जन्मलेले मिथुन चक्रवर्ती आजसुद्धा बर्या्च चित्रपटांमध्ये काम करत आहेत. पण बॉलीवूडच्या या सूप्रसिद्ध डिस्को डांसरचे वैयक्तिक आयुष्य कायमच चर्चेत राहिले आहे.
मिथुन चक्रवर्तीनी दोन लग्न केली होती. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव हेलेना ल्यूक आहे. हेलेना ७० च्या दशकामधील फॅशन जगतामध्ये खूप प्रसिद्ध होती.
लग्नाच्या काही वर्षानंतरच त्यांचा घटस्फो ट झाला. बॉलीवूड अभिनेत्री हेलेनाने चार चित्रपट केल्यानंतर बॉलीवूड इंडस्ट्रीतून काढता पाय घेतला. मिथुनची पहिली पत्नी हेलेना ल्यूकने १९८० मध्ये बॉलीवूड चित्रपट “जुदाई” मधून पदार्पण केले होते.
यानंतर ती “साथ साथ” आणि “एक नया रिश्ता” या चित्रपटांमध्ये दिसली होती. त्यांच्या घटस्फोटाचे मुख्य कारण होते अभिनेत्री योगिता बालीबरोबरचे प्रेमप्रकरण. हेलेनाशी घटस्फो टानंतर मिथुनने योगिता बालीसोबत लग्न केले.
जसे कि तुम्हाला माहिती आहे कि दुबईच्या हॉटेलमध्ये बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीचे निधन झाले होते. तिच्या अंत्यदर्शनासाठी संपूर्ण बॉलीवूड पोहोचले होते, पण मिथुन चक्रवर्तीला कोणीही कुठेही पाहिले नाही आणि त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
मिथुनने श्रीदेवीबरोबर पण अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. एक काळ असा होता कि मिथुन चक्रवर्ती आणि श्रीदेवीच्या प्रेमप्रकरणाची चर्चा उघडपणे केली जात होती.
असे सुद्धा म्हटले जाते कि मिथुन आणि श्रीदेवीने गुपचुप लग्न केले होते. पण हि गोष्ट आतापर्यंत स्पष्ट झाली नाही कि त्यांनी खरच लग्न केले होते की नव्हते.
श्रीदेवी आणि मिथुनने “वतन के रखवाले”, “जाग उठा इंसान”, “वक्त की आवाज” आणि “गुरु” सारख्या चित्रपटांमध्ये एकमेकांसोबत काम केले आहे. एक वेळ अशी होती कि ह्या दोघांची जोडी त्यांचे प्रेमप्रकरण व लग्नाच्या बातमीमुळे चर्चेमध्ये होती.
भले ती बातमी खरी ठरली नाही पण श्रीदेवीला आजही मिथुनची तिसरी पत्नी म्हणून मानले जाते. असे म्हटले जाते कि १९८५ मध्ये अभिनेता मिथुन चक्रवर्तीने श्रीदेवीसोबत लग्न केले होते.