मुलीला स्त नाने दूध पाजत असतांना झोपी गेली आई,जेव्हा उठली तेव्हा बाळाची हालत बघून ढस -ढसा रडू लागली …

Letest News

स्त्रिच्या आयुष्यात आई होणे ही खूप सुंदर भावना आहे. परंतु आई होण्याबरोबरच आपल्यावर बर्यािच जबाबदाऱ्या येतात. नवजात शिशु खूप नाजूक असते. अशा परिस्थितीत त्यांची एक ना एक क्षणाला चांगली काळजी घ्यावी लागते.आपली एक लहानशी चूक किंवा बेपर्वाई आपल्या बाळाला महागात पडू शकते. आता उदाहरणार्थ यूकेमध्ये राहणाऱ्या शॅनन मॉंडची ही बातमी बघा. शॅनन केवळ वयाच्या १८ व्या वर्षी आई बनली. ती आपल्या मुलीवर खूप प्रेम करत होती.

सध्या शॅनन २० वर्षांची आहे. अलीकडेच, तिने तिच्या आयुष्यात दोन वर्षांपूर्वी घडलेली घटना इतर पालकांबरोबर शेअर केली आहे. या आईचे दू:ख व तिच्या वाट्याला आलेल्या वेदना ऐकून नक्कीच तुमचे डोळे ओले होतील.वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी गरोदर झाली:- शॅनन सांगते की जेव्हा ती १७ वर्षांची होती तेव्हा तिला तिच्या गरोदरपणाविषयी माहिती देण्यात आली.
इतक्या लहान वयात शॅननला एक आई बनणे सोपे नव्हते. तिला भीती वाटत होती. परंतु तिच्या आईने तिचे पूर्ण समजावून समाधान केले. यानंतर २०१८ मध्ये तिने एका मुलीला जन्म दिला. तिने आपल्या या लाडक्या मुलीचे नाव लीला रे असे ठेवले.

बाळाला छातीशी धरून दूध पाजत असताना झोप लागली – लहान वयातच आई झाल्याने शॅननवर अचानक मोठ्या जबाबदाऱ्या आल्या. जरी त्या पूर्ण करण्यासाठी तिने सगळे प्रयत्न केले, तरी एका अनावधनाने झालेल्या लहानश्या चुकीमुळे तिच्या आयुष्यात मोठे दुःख आले. खरे तर जुलै २०१८ मध्ये जेव्हा शॅनन रात्री आपल्या बाळाला स्तनपान करीत होती तेव्हा तिला अचानक झोप आली.

गुदमरून मुलीचा झाला मृत्यू:- शॅनन आपल्या बाळाला दूध पाजत होती आणि तशीच तिला झोप आली. मग जेव्हा ती सकाळी उठली तेव्हा बाळाचे शरीर थंड आणि ओठ निळे पडले होते. रात्रीच्या वेळी दूध पाजताना झोपी गेल्यामुळे नवजात मुलगी गुदमरून गेली. तिला श्वास घेता आला नाही आणि तिने या लहान वयात जगाला निरोप दिला.

बाळाला स्तनपान करताना झोपू नका, छोट्याशा चुकांमुळे मुलीला गमावल्याचे दुःख शॅननच्या हृदयात अजूनही ताजे आहे. तेव्हापासून लोकांनी मुलीच्या मृत्यूबद्दल टोमणे मारायला सुरुवात केली. लोक तिला बेबी किलर म्हणत असत.या गोष्टीचा तिला खूप मनस्ताप झाला. आता या घटनेला दोन वर्षे झाली, पण शॅननने आपली ही गोष्ट सर्वांसोबत शेअर केली आहे. ही बातमी सांगणे आणि इतर पालकांना सतर्क करणे हा तिचा हेतू आहे.

अशी चूक करू नका, शॅननने सर्वांना आपल्या बाळाला स्तनपान करताना झोपू नका अशी विनंती केली आहे. हा अपघात कधीही आणि कोणाबरोबरही होऊ शकतो. म्हणून जोपर्यंत आपण आपल्या बाळाला दूध पाजत असता, तोपर्यंत आपण जागे रहा.याशिवाय उर्वरित वेळेत झोपत असताना काळजी घ्या की आपण अशा स्थितीत नाही की बाळाला कोणत्याही अवस्थेमध्ये कधी गुदमरल्यासारखे होईल. कृपया ही माहिती जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा.

 

Dnyaneshwar Harak

Dnyaneshwar Harak is the Founder and editor of Hrk media Previously, he's worked in multiple news media organisationsh as journalists main focus on real news and true voice on people .

http://hrkmedia.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *