भारतीय क्रिकेट टीमचा फास्टर बॉलर मोहम्मद शमी जो भारताचा दुसरा असा बॉलर आहे ज्यानी वर्ल्ड कपमध्ये हॅटट्रिक केली होती. ३० वर्षाचा असणाऱ्या मोहम्मद शमीची प्रोफेशनल जीवन खूप चांगली आहे.
शमीने भारतासाठी ४९ टेस्ट मध्ये १८० आणि ७७ वन डे मध्ये १४४ आणि ११ टी २० मध्ये १२ व्हीकेट घेतल्यामुळे तो भारतीय टीमचा महत्त्वाचा बॉलर आहे.
त्याने IPL च्या ४९ सामन्यांमध्ये ४० व्हीकेट घेतल्या. पण त्याच्या प्रायव्हेट जीवनात बऱ्याच अडचणी आहेत. दोन वर्षांपूर्वी त्याला प्रेमात धो का मिळाला होता. त्याची पत्नी हसीन जहां ने शमीवर खूप आ रोप केले होते.
हसीनने शमीवर मॅच फिक्सिंगचा आरोप केला होता, तसेच त्याच्यावर इतर महिलांशी प्रेमसं बंध असल्याचाही आरोप केला होता. एवढे करूनही ती थांबली नाही तर तिने शमीच्या भावावरही बला-त्काराचा आरोप केला ज्यानंतर दोघेही वेगळे झाले. हसीन कोलकातामध्ये मॉ डेलिं ग करत होती आणि हसीन आयपीएलमध्ये चीअरलीडर होती.
जेव्हा २०१२ मध्ये कोलकातामध्ये आयपीएलचा सामना होता तेव्हा हसीन शमीला भेटली होती. हळूहळू त्यांच्यात जवळकी वाढत गेली. आणि २०१४ मध्ये दोघांनी लग्न केले. हसीनचे हे दुसरे लग्न होते आणि तिने हे शमीपासून लपवून ठेवले होते.
शमीने स्वत: ही बातमी मीडियाला दिली. तो म्हणाला, कि “जेव्हा मला हसीनच्या पहिल्या लग्नाची आणि मुलींची माहिती मिळाली तेव्हा मी त्यांना एकत्र ठेवण्याविषयी बोललो, पण हसीन यासाठी तयार नव्हती.” हसीनच्या पहिल्या पतीचे नाव एस. के सैफुद्दीन आहे.
आणि दोघांनी २००२ साली कुटुंबविरूद्ध लग्न केले होते. त्या दोघांना मुली आहेत पण २०१० मध्ये दोघांनी घटस्फो ट घेतला. हसीन आणि शमीला पण एक मुलगी आहे. तिचे नाव आयरा असे आहे.
जर शमी बद्दल बोलायचे झाले तर शमी सतत सोशल मीडियावर बॉ लिंग प्रॅ क्टिसचे व्हिडीओ शेयर करत असतो. आणि त्यामुळे त्यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीं सारख्या बऱ्याच साथीदारांना त्याने प्रभावित केले आहे. आणि त्यांनी शमीचे कौतुक देखील केले आहे.