रविना टंडन आणि शाहरुख जरी एकमेकांचे नातेवाईक नसले तरीही त्यांच्यामध्ये जवळचे नातेबंध आहे .त्यांचे नेहमी एकमेकांच्या घरी याने जाणे असतेच ,परंतु अलीकडेच ते एका शो मध्ये समोर समोर आले तेव्हा ते जे तिने सांगितले त्याबाबद्दल आज आज जाणून घेऊयात .
रवीना टंडन ही 90 च्या दशकाची एक सुपरहि ट अभिनेत्री होती. तिने एकापेक्षा एक जबरदस्त चित्रपटांत काम केले आहे. रवीना टंडन त्या काळातल्या जवळजवळ प्रत्येक प्रसिद्ध अभिनेत्याबरोबर चित्रपटांमध्ये दिसली. पण त्यापैकी रवीना आणि शाहरुखच्या जोडीला प्रेक्षकांनी सर्वात जास्त पसंती दिली होती.सध्या रवीना टंडन चित्रपटांपासून दूर आहे. पण टीव्ही इंडस्ट्रीच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांशी जोडली गेली आहे.
अलीकडेच रवीना टंडनने ‘लव्ह लाफ लाइव्ह’ कार्यक्रममध्ये आली होती, जिथे तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी सं बंधित अनेक रहस्ये उघड केली. रवीना म्हणाली की तिचे आणि शाहरुखचे सं बंध आजही तितकेतच घट्ट आहेत जितके की पूर्वी चित्रपटात काम करताना होते. रवीना म्हणाली- जेव्हा जेव्हा शाहरुख माझ्या नवऱ्याला भेटतो तेव्हा तो नेहमीच माझ्या सुगंधाचे कौतुक करतो. शाहरुख माझ्या नवऱ्याला सांगतो की तुझ्याकडे पत्नीच्या रुपात उत्तम सुगंधित अभिनेत्री आहे.
रवीनाने हेही सांगितले की जेव्हा मी आणि शाहरुख चित्रपटात एकत्र काम करत होतो, तेव्हा सुद्धा तो मला सांगायचा की तुझा सुगंध खूप चांगला आहे. आजही जेव्हा शाहरुख आणि मी भेटतो, तो माझ्याकडे येतो आणि माझा सुगंध घेण्यास सुरवात करतो.
रवीना टंडनने शाहरुख खानबरोबर जादू, पहला नाशा, जमाना दिवाना आणि ये लम्हे जुदाई अशा चित्रपटांमध्ये काम केले. या चित्रपटांमध्ये रवीना टंडनच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. इतकेच नाही तर लोकांना शाहरुख आणि रविनाची जोडी मोठ्या पडद्यावर खूप आवडली होती.