वास्तुशास्त्र माणसाच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी आणण्यासाठी बनवले गेले आहे वास्तुशास्त्रातील योग्य नियमांनुसार काम किंवा घरात घडणार्या कोणत्याही गोष्टीची योग्य दिशा दिली जाते म्हणून वास्तुशास्त्र मनुष्याच्या जीवनात विशेष स्थान निभावते. जर आपल्याकडे वास्तुशास्त्राचे ज्ञान नसल्यास आपल्या घरात त्रास उद्भवू शकतो कारण घरातला आरसा देखील संकटाचे कारण बनू शकतो.
असे बरेच लोक आहेत ज्यांनी आरशा योग्य दिशेने ठेवला आहे परंतु वास्तु शास्त्राची माहिती नसल्यामुळे बरेच लोक आरसा कोठेही ठेवतात तुम्हाला आरसा योग्य दिशेने ठेवणे फार महत्वाचे आहे कारण वास्तुच्या म्हणण्यानुसार जर तुमच्या घरातला आरसा जर योग्य दिशेने ठेवला नसेल तर तुम्हाला अडचण होऊ शकते आज या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला वास्तुशस्त्राशी स-बंधित काही टिप्स देणार आहोत तर चला मग जाणून घेऊया.
जर आपल्याला आपल्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचा त्रा स किंवा अडथळा नको असेल तर त्यासाठी आपण आपल्या घरातील आरश्याची दिशा उत्तरेच्या भिंतीकडे वळवावी जर तुमचा आरसा गोलाकार असेल तर तो खूप शुभ आहे. काचेचा आकार छोटा किंवा मोठा असला तरी तो नीट असणे फार गरजेचे आहे त्याला कोठेही दरार आलेली नसू नये.
घरात सुख व शांतता हवी असेल तर घरात कोणत्याही चुकीच्या ठिकाणी आरसा कधीही ठेवू नका असे केल्याने कुटूंबाच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होईल वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी जर आपण कपड्याने आरसा झाकून झोपत असाल तर असे केल्याने आपल्या घरात कधीही कोणत्याही गोष्टीची वाईट छाया येणार नाही.
अशा प्रकारे घरात आरसा लावा:- घरात आरसा ठेवण्यासाठी उत्तम दिशा उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशेने मानली जाते. या दिशेने आरसा ठेवल्यास घरात आनंद आणि समृद्धी येते. बेडरूममध्ये दरवाजासमोर आरसा ठेवणे शुभ मानले जाते. घरातल्या आरशामध्ये शुभ गोष्टींचे प्रतिबिंब बघणे चांगले.
आरसा आकारात मोठा असावा परंतु वजनाने हलका असावा. घराच्या तिजोरी किंवा कपाटासमोर ठेवलेला आरसा शुभ मानला जातो यामुळे घरात संपत्ती वाढते. ड्रॉईंग रूममध्ये आरसा लावून शुभ परिणाम मिळू शकता. आरसा कोठूनही तुटलेला नये. तसेच तो कायम स्वच्छ असणे खूप महत्वाचे आहे.
आरसा लावताना या गोष्टी लक्षात ठेवा:- बेडरूममध्ये कोणताही आरसा ठेवताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. खोलीत आरसा अशा प्रकारे ठेवा की झोपताना आपल्या शरीराचा कोणताही भाग त्यात दिसणार नाही. कारण यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
खोली लहान असल्याने आरसा आपल्या पलंगासमोर ठेवला असेल तर रात्री झोपताना त्या आरशाला कपड्याने झाकून ठेवा. यामुळे नकारात्मक परिणाम होणार नाही. घरात दक्षिण आणि पश्चिम दिशेने आरसा असणे अशुभ मानले जाते. तसेच खोलीतील दाराच्या आत आरसा नसल्याचे सुनिश्चित करा.
आरसा खोलीच्या भिंतींवर समोरासमोर ठेवू नये. यामुळे घरात ताण येऊ शकतो. घरात प्रवेश करण्याच्या मार्गावर आरसा ठेवू नये. यामुळे सकारात्मक उर्जा घराबाहेर जाते. घरातला आरसा जास्त उंच किंवा जास्त छोटा असू नये. यामुळे आरोग्याचा त्रास होतो.