सतर्क राहा: घरात मुंग्यांचे दिसून येणे देते हे संकेत, यावर त्वरित उपाय करा नाहीतर …..

Astrology

आपण मुंग्यांकडे नेहमीच दुर्लक्ष करत असतो. त्यांना आपल्या पायाखालून चिरडतो आणि आपला समज आहे, की मुंग्या म्हणजे केवळ आपल्याला चावणाऱ्या आणि त्रास देणाऱ्याच असतात. पण हे सत्य नाही. मुंग्या घरात येणे यामागे काही संकेत लपलेले आहेत.

पण आपल्याला ते माहीत नसल्यामुळे समजत नाहीत. जर आपल्या घरात लाल मुंग्या वारंवार दिसल्या किंवा राहात असतील तर ते एक वास्तूदोषाचे कारण असू शकते. तसे तर मुंग्या दोन प्रकारच्या आहेत लाल आणि काळ्या. त्यापैकी लाल मुंग्याना अशुभ मानले जाते आणि काळ्या मुंग्यांना शुभ मानले जाते.

घरात लाल रंगाच्या मुंग्यांचे येणे हा एक अशुभ संकेत देते तर घरात आलेल्या काळ्या मुंग्या हे भाग्य दर्शवितात. लाल मुंग्यांबद्दल असे म्हटले जाते की घरात त्यांची संख्या वाढली तर आपल्यावरचे कर्जही वाढते आणि तेही एक संकट असल्याचे सांगितले जाते.

अशा परिस्थितीत लोक लाल मुंग्या मारण्याचे औषध आणतात आणि सर्व लाल मुंग्या मारतात. पण यामुळे त्यांच्यावर मुंग्यांची हत्या केल्याचा दोष लागतो म्हणजे साध्या सरळ भाषेत म्हणायचे झाले तर एका संकटापासून वाचण्यासाठी दुसरे संकट ओढवून घेणे.

अनेकदा लाल मुंग्या मारण्यासाठी केलेल्या उपायामुळे काळ्या मुंग्याही मारल्या जातात. अशा वेळी, कोणत्याही औषधाने लाल मुंग्या मारु नका. एक सोपा व घरगुती उपाय आहे, तुमच्या घरात लिंबू असेल. फक्त त्याची काही साले काढून लाल मुंग्या जिथे येत असतील त्या जागी ठेवा. असे केल्याने लाल मुंग्या लगेच तिथून पळून जातात.

दुसरा उपाय तमालपत्रांचा तुकडा आहे. त्याचप्रमाणे लवंगा किंवा काळी मिरी देखील वापरली जाऊ शकते. मुंग्यांपासून सुटका करण्यासाठी मीठ अत्यंत उपयोगी आहे. यासाठी लादी किंवा फरशी पुसताना त्या पाण्यात मीठ घाला. असे केल्याने घरात मुंग्या येणार नाहीत.

घरातून मुंग्यांना पळवून लावण्यासाठी तुम्ही लवंगेचा उपयोग करू शकता. लवंग पण अत्यंत फायदेशीर ठरते. यासाठी घराच्या कोपऱ्यांमध्ये, खिडक्यांमध्ये आणि दरवाज्याजवळ लवंग ठेवा. घर मुंग्यांपासून मुक्त करण्यासाठी हळद आणि तुरटीची पावडर एकत्र करुन घरातील कोपऱ्यांमध्ये पसरवून ठेवा.

आपण मुंग्यांमुळे कर्जमुक्त देखील होवू शकता. त्यासाठी एक उपाय आहे की दोन्ही प्रकाराच्या मुंग्यांना कणीक खायला दिल्याने कर्जापासून मुक्ती मिळते. मुंग्यांना साखर मिसळून कणीक खायला टाकल्याने व्यक्ती प्रत्येक बंधनातून मुक्त होतो.

हजारो मुंग्यांना रोज आहार दिल्याने मुंग्या संतुष्ट होतात आणि यामुळे मनुष्य प्रत्येक संकटातून बाहेर पडतो. मुंग्यांना कणीक देण्याने आणि लहान-लहान चिमण्यांना तांदूळ खाऊ घालणारे लोक वैकुंठात जातात असे ही मानले गेले आहे.

तसेच ऋणातून मुक्त होण्यासाठी मुंग्यांना कणीक आणि साखर टाकावी. शेवटी मुंग्यांबद्दल एक शुभ गोष्ट म्हणजे लाल मुंग्या ओळीत जात असताना मुंग्यांच्या तोंडात अंडी असलेले बघणे शुभ असते. याने संपूर्ण दिवस शुभ आणि सुखात जातो.

 

Dnyaneshwar Harak

Dnyaneshwar Harak is the Founder and editor of Hrk media Previously, he's worked in multiple news media organisationsh as journalists main focus on real news and true voice on people .

http://hrkmedia.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *