Breaking News

सप्तपदीचे चार फेरे घेऊन झाल्यावर बाथरूमला गेली नवरी, तिच्या पाठोपाठ पंडित पण गेला, आणि मग जे झाले ते बघून दंग राहिले लोक …

आपल्या वैदिक संस्कृतीनुसार हे सोळा संस्कार जीवनातील सर्वात महत्त्वाचे संस्कार मानले जातात. लग्नसोहळा हा त्यापैकीच एक आहे ज्याशिवाय मानवी जीवन पूर्ण होऊ शकत नाही.

हिंदू ध र्मात लग्न सोहळा हा सोळा संस्कारांपैकी एक मानला जातो. परंतु येथे झालेला लग्न सोहळा पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. तर चला जाणून घेऊया नक्की काय आहे हा प्रकार.

लग्नसमारंभात सप्तपदीचे फेरे हा सोहळा खूप महत्वाचा मानला जातो. हिंदू रितीरिवाजांमध्ये लग्नाच्यावेळी वधू आणि वर हे दोघे सप्तपदीचे ७ फेरे एकत्र मारत असतात.

परंतू मुजफ्फरनगरमध्ये विवाहप्रसंगी असा गोंधळ उडाला आहे की चौथा फेरा झाल्यानंतर वधू परत आलीच नाही. वर आणि त्याचे नातेवाईक यांनी वधूची खूप वेळ वाट पहिली पण वधू परत आलीच नाही. पण जेव्हा या मागचे सत्य काय आहे ते समोर आले तेव्हा त्या सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली.

वास्तविक मुजफ्फरनगर मधील मोहम्मदपूर गुमी येथे राहणार्यात देवेंद्रने एक लाख रुपये देऊन आपले लग्न एका तरुणीसोबत ठरवले होते. त्यांचा विवाह मोदीनगर येथील रहिवासी प्रदीप नावाच्या व्यक्तीमार्फत ठरला होता.

प्रदीपनेच या दोघांच्या लग्नाचा प्रस्ताव आणला होता. त्याने असे सांगितले की असे एक कुटुंब आहे ज्यांना आपल्या मुलीचे लग्न करायचे आहे. मात्र या लग्नाचा मोबदला म्हणून ते एक लाख रुपये मागत आहेत.

प्रदीपचे म्हणणे ऐकल्यानंतर देवेंद्रने लग्नाला होकार दिला. त्याच्याकडे व्हॉट्सअॅबपवर त्या मुलीचा फोटोही होता. मुलाचा फोटो पाहून मुलीने पहिल्या नजरेतच लग्नासाठी होकार दिला होता. हे लग्न परतापूरच्या भूड़बराल गावात करायचे ठरले होते. रविवारी दुपारी देवेंद्र व त्याचे चार नातेवाईक लग्नासाठी भूड़बराल गावातल्या एका मंदिरात गेले.

मोहिउद्दीनपूर बागेच्या जवळ असलेल्या या मंदिरात लग्नाचे विधी सुरू झाले. मुलीच्या बाजूने फक्त तीन लोक आले होते. देवेंद्रने लग्नासाठी आणलेले दागिने मुलीला घालायला दिले.

यानंतर सप्तपदीच्या चार फेऱ्या झाल्या. मुलीच्या नातेवाईकांनी वराकडे म्हणजेच देवेंद्रकडे अगोदर ठरल्याप्रमाणे एक लाख रुपये मागितले. यानंतर बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने ती मुलगी कुठेतरी निघून गेली.

खूप उशीर झाला पण वधू का परत आली नाही तेव्हा तिला शोधण्याचा बहाणा करून तिची मावशी आणि दुसरे काही लोक तिथून निघून गेले. इतकेच नाही तर सगळ्यांना शोधण्याच्या बहाण्याने लग्न लावणारा पंडितही तेथून निघून गेला. आता वराकडुन मिळालेले सर्व दागिने आणि एक लाख रुपयांची रक्कम मुलीच्या नातेवाईकांकडे होती.

पण वधू परत येण्याची काही खात्री वाटत नव्हती. बराच वेळ वाट बघितल्यावर वराचे डोके तापले. त्याच्या लक्षात आले की इथे आपली फसवणूक झाली आहे.

अशा परिस्थितीत वर आणि त्याच्या कुटुंबियांनी परतापूर येथील पोलिस ठाणे गाठले आणि तेथे त क्रार नोंदविली. त्याने पोलिसांना वधूचा फोटो देखील दाखविला. परतापूर येथील निरीक्षक नजीर खान यांनी दिलेल्या माहितीनुसार वराने दिलेल्या मोबाइल क्रमांकाच्या आधारे तपास सुरू केला आहे. पोलिसांना तपासानंतर लवकरच आरोपी सापडेल.

 

About Vishal Harak

Check Also

भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्लाने ब्लॅक ब्रालेट घालून केला से’क्सी डान्स, एक्ट्रेसच्या हॉ’टनेसने चाहत्यांच्या पारा चढला ..

आपल्या सर्वांना माहितीच आहे की, भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल असते. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *