डॉ. स्वागत तोडकर यांनी सांगितलेला हा उपाय करा, मग भयंकर सर्दी, कफ यापासून लगेचच मुक्तता मिळेल. नमस्कार मित्रांनो. आमच्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी जर भयंकर सर्दी झाली असेल, छातीत कफ जमा झाला असेल व सकाळी उठल्यावर शिंका येणे, नाक बंद झाल्यासारखे वाटणे असा कितीही जुना सर्दीचा त्रास असेल, तर त्यापासून सुटका करणारा व लगेचच फायदा करणारा असा घरगुती व नैसर्गिक उपाय मी घेऊन आले आहे. हा उपाय डॉक्टर स्वागत तोडकर सर यांनी सांगितला आहे, तो उपाय आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा एक छोटासा प्रयत्न मी करीत आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे सुंठ. सुंठ म्हणजेच कोरडे झालेले आले. ही तुम्हाला आपल्या मसाल्याच्या डब्यात मिळेल किंवा किराणा दुकानात मिळू शकते.
त्याचप्रमाणे दुसरी वस्तु आहे ती म्हणजे गूळ. याचा वापर कशा प्रकारे करायचा ते मी सांगणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर जरूर करा. माझी माहिती शेअर आणि लाइक करायला विसरू नका. म्हणजे मी नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. तसेच अशा प्रकारचे घरगुती व नैसर्गिक उपाय आपल्या आरोग्यासाठी व सुंदरतेसाठी मी सांगणार आहे. इथे मी गूळ चिरून घेतला आहे. मी इथे सहाण घेतली आहे. ही सुंठ आपल्याला सहाणेवर घासून घ्यायची आहे. थोडे पाणी घेऊन ते सहाणेवर टाका व ती सुंठ घासून घ्या. थोडे थोडे पाणी टाकून याची पेस्ट होईल इतकी सुंठ घासून घ्यायची आहे. आता ही पेस्ट चमच्यामध्ये काढून घ्यायची आहे. कारण आपल्याला समान प्रमाणात यामध्ये गूळ घालायचा आहे. म्हणून मी इथे ५ मिलिचा एक चमचा घेतला आहे. चमचा भरून पेस्ट तयार आहे. ही पेस्ट एका भांड्यात घेऊन तोच चमचा भरून आपल्याला गूळ घ्यायचा आहे. थोडे आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत. मग हे मिश्रण मिक्स करून गरम करून घ्यायचे आहे. गॅसच्या मंद आचेवर हे गरम करायचे आहे, फक्त गूळ विरघळेपर्यंत. जास्त गरम करायचे नाही. आता हे गरम झाले आहे. गॅस बंद करा. मिश्रण थोडे थंड करा. एका वाटीत सूती कपडा घेऊन हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे. त्याचा रस काढून घ्यायचा आहे. मी जसा काढते आहे तसा. आता आपले हे औषध तयार झाले आहे. दोन्ही नाकांच्या नाकपूड्यांमध्ये २ थेंब टाकायचे आहेत व १० ते १५ मिनिटे झोपून राहायचे आहे.
असे केल्यामुळे तुमची सर्दी कितीही जुनी असो, भयंकर असो ती पुर्णपणे बरी होण्यास मदत होणार आहे. पण तुम्हाला याचा त्रास झाला, फरक जाणवला नाही तर पुन्हा अर्ध्या तासाने थेंब टाकायचे आहेत. हा उपाय नक्की करून बघा. तुम्हाला फायदा लगेच दिसून येईल.