मोहन जुनेजा मृ’त्यूची बातमी आली :- नुकतेच KGF चॅप्टरमध्ये दिसणारे अभिनेते मोहन जुनेजा यांचे दुःखद नि’धन झालेले आहे. त्यांचे वय 54 वर्ष असे होते. त्यांच्या नि’धनामुळे चित्रपट सृष्टीवर शो’ककळा पसरलेली आहे. त्यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेले होते. त्यांची चित्रपट सृष्टीतील कारकिर्दी खूप चांगली होती. ते कोणतीही भूमिका एकदम मन लावून आणि उत्कृष्ठ पद्धतीने करत होते.
दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनेते आणि कॉमेडियन मोहन जुनेजा यांचे शनिवारी सात मे ला वयाच्या ५४ व्या वर्षी नि’धन झालेले आहे. मोहन हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर बंगळुरू येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी आजाराशी खूप लढण्याचा पर्यंत केला होता. पण काळ आल्यावर कोण रोखू शकते शेवटी ते असफल झाले आणि त्यांचा मृ’त्यू झाला आहे.
मोहनने शंकर नाग यांच्या वॉल पोस्टर या चित्रपटातून पदार्पण केले होते. आपल्या फिल्मी करिअरमध्ये त्यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. अलीकडेच त्यांनी KGF आणि KGF Chapter 2 या कन्नड चित्रपटामध्येही काम केले आहे. मोहनने अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केलेले होते.
तमिळ, तेलुगु आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले:- कन्नड व्यतिरिक्त, मोहन राज हे तमिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपट उद्योगांचा देखील भाग आहेत. मोहन हा कर्नाटकातील तुमकूरचा रहिवासी होता. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत खलनायकाची भूमिका केली आहे.
याशिवाय त्यांनी कॉमेडीमध्येही खूप नाव कमावले आहे. चेल्लाता हा त्याच्या अविस्मरणीय चित्रपटांमध्ये शीर्षस्थानी आहे. मोहनने दर्शन, पुनीत राजकुमार, अंबरीश आणि शिवराजकुमार यांसारख्या अभिनेत्यांसह अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केलेले आहे.
KGF मध्ये मोहन जुनेजा कोणत्या भूमिकेत दिसला होता? :- मोहन जुनेजा हा यश स्टारर चित्रपट ‘KGF Chapter 1’ आणि ‘KGF Chapter 2’ या दोन्ही चित्रपटांमध्ये दिसला होता, जरी दोन्ही चित्रपटांमध्ये त्यांची भूमिका फार मोठी नव्हती. पण त्याने त्याचे काम एकदम उत्कृष्ठ पद्धतीने केलेले होते.
‘केजीएफ’मध्ये मोहन जुनेजा यांनी पत्रकार आनंद इंगलगी यांच्या माहिती देणाऱ्या नागराजूची भूमिका साकारली होती, जो पत्रकाराला रॉकी भाईची कथा सांगत असतो. चित्रपटातील भूमिका छोटी असली तरी कथेतील तो महत्त्वाचा दुवा होता.
KGF 2 च्या निर्मात्यांपैकी एक असलेल्या होमबाले फिल्म्स ने मोहनच्या मृ’त्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. होंबळे फिल्म्सने असे ट्विट केले आहे की, “अभिनेते मोहन जुनेजा यांच्या कुटुंबीय, मित्र आणि शुभचिंतकांना आमच्या मनःपूर्वक शोक असे म्हणाले आहे.