जरी शाहरुख खान आणि गौरी ला त्यांच्या लग्ना नंतरच्या पहिल्या रात्रीची खूप प्रतीक्षा होती, तरीही एका व्यक्तीमुळे त्यांची रात्र काळी पडली होती, ही व्यक्ती इतर कोणीही नसून ती ड्रीम गर्ल हेमा मालिनी होती. ज्यामुळे त्यांची सुंदर रात्र काळी पडली.
लग्नानंतर मुंबईला परतले होते:- शाहरुख आणि गौरी हे वेगवेगळ्या ध-र्मांचे होते. पण शाहरुख खान गौरीसाठी इतका वेडा झाला होता की त्याच्या जिद्दीने आणि प्रेमाची बाजू असल्यामुळे ध-र्म त्यांच्या मध्ये येवू शकला नाही अखेर कुटुंबाला या लग्नाला हो म्हणायला लागले.
यानंतर दोघांनीही मोठ्या वाजत गाजत लग्न केले, पण लग्नानंतर लवकरच किंग खानला मुंबईला परतावे लागले. म्हणून त्याने आपली नवीन नवविवाहित वधूही आपल्याबरोबर आणली. जेव्हा किंग खानने गौरीशी लग्न केले होते तेव्हा तो दिल आशना या चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. ज्याची निर्मिती हेमा मालिनी करत होती.
लग्नानंतर जेव्हा किंग खान आपल्या पत्नी गौरीला मुंबईला घेऊन आला तेव्हा तो एका हॉटेलमध्ये थांबला होता. यानंतर त्याने हेमा मालिनीला फोन केला आणि त्याची पत्नी गौरी आणि तो मुंबईत असल्याची माहिती दिली. त्यानंतर हेमाने शाहरुखला सांगितले की आपण सेटवर यावे आणि थोड्या वेळात ध-र्मेंद्र तिथे पोचतील. फोनवर बोलुन किंग खान ताबडतोब सेटवर पोहोचला गौरी तसीच लग्नाच्या ड्रेस मध्ये होती हे दोघे सेट वर एका खोलीत वाट बघत थांबले होते. ही खोली डासांनी भरलेली होती आणि खूप घाणेरडी होती.
सकाळी 6 वाजता तिथून परत आले:- जेव्हा खूप वेळ वाट बघितल्यावर तेव्हा त्यांना कळले की हेमा आणि ध-र्मेन्दजी थोड्या उशीरा सेटवर येतील. अशा परिस्थितीत किंग खान शू-टिंगवर गेला आणि गौरी त्याच खोलीत थांबली. पूर्ण रात्रभर शु-टींग चालू राहिले जेव्हा शाहरुख सकाळी 6 वाजता गौरीला घ्याला त्या खोलीत परत आला तेव्हा त्याला अतिशय वाईट वाटले कारण गौरींने पूर्ण रात्र खुर्चीवर बसून विचार करण्यात घालवली होती.
आपल्या पत्नीला या अवस्थेत बघून शाहरुखला खूप वाईट वाटले. त्या दिवशी दोघांचे डोळे अश्रूंनी भरुन गेले होते आणि त्याच दिवशी शाहरुखने स्वताचे मोठे करियर बनविण्याचा संकल्प केला होता. दिल्लीत राहणाऱ्या शाहरुखने गौरीला १९८४ मध्ये एका पार्टीमध्ये पहिल्यांदा पाहिलं होतं. तेव्हा तो फक्त १८ वर्षांचा आणि गौरी १४ वर्षांची होती.
त्यानंतर अनेकदा त्याने गौरीशी बोलण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनंतर अखेर त्याने तिचा फोन नंबर मिळवला आणि दोघांमध्ये संवाद सुरू झाला. हळूहळू मैत्री वाढू लागली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात व्हायला फार काळ लागला नाही.
शाहरुख आणि गौरी वेगवेगळ्या धर्माचे असल्यामुळे गौरीच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. गौरीच्या कुटुंबीयांची समजूत घालताना शाहरुखच्या नाकीनऊ आलं होतं. अखेर त्याने गौरीच्या कुटुंबीयांचा होकार मिळवण्यात यश मिळवलं. २५ ऑक्टोबर १९९१ रोजी हिं दू पद्धतीने दोघे विवाह संपन्न झाला.
शाहरुखला यशस्वी करण्यासाठी गौरीनेही खूप परिश्रम घेतले आणि आजही गौरी प्रत्येक पायरीवर आपल्या पतीबरोबर उभी असल्याचे दिसून येत आहे. गौरी ही एक पत्नी आणि स्त्री आहे जिने आपल्या नवऱ्याला मदत करण्याबरोबरच स्वत: चे करियर बनवले. याक्षणी दोघे सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत. या दोघांनाही 2 मुले आणि 1 मुलगी आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात.