सैफ अली खानला बॉलिवूडमध्ये छोटा नवाब म्हणून ओळखले जाते. आपल्या सर्वांना माहितच आहे की सैफने अभिनेत्री अमृता सिंगशी लग्न केले होते. त्याने हे लग्न सर्वात छुप्या पद्धतीने केले होते. या लग्नामुळे घरातील माणसेही खूप नाराज होती कारण अमृता सैफपेक्षा बरीच मोठी होती.
पण हळू हळू हे प्रकरण मिटले आणि त्याने सुखी आयुष्य जगण्यास सुरवात केली. हिंदू कुटुंबातून आलेल्या अमृताने सैफसोबत लग्न करण्यासाठी इस्लाम ध र्म स्वीकारला होता. सैफ आणि अमृता यांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान अशी दोन मुले आहेत.
मात्र, आता दोघांचाही घटस्फो ट झाला असून सैफने १६ ऑक्टोबर २०१२ रोजी करीना कपूरशी लग्न केले. आज, तिमूर अली खान या दोघांचा एक गोंडस मुलगा आहे. अमृता आणि सैफचा घटस्फो ट झाल्यापासून आतापर्यंत बराच काळ गेला आहे.
पण आजही लोकांना दोघांच्या घटस्फो टाचे खरे कारण माहिती नाही. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की लग्नाच्या इतक्या वर्षानंतर सैफने अमृताशी घटस्फोट घेण्याचा निर्णय का घेतला.
१३ वर्षांनंतर झाला घटस्फो-ट :- सैफने अमृताशी लग्न केले तेव्हा तो २१ वर्षांचा होता. अमृता सैफपेक्षा १३ वर्ष मोठी होती, म्हणजेच तिचे लग्न झाले तेव्हा अमृता ३४ वर्षांची होती. जेव्हा दोघांचे लग्न झाले होते, तेव्हा सैफची कारकीर्दही सुरू झालेली नव्हती आणि अमृता तिच्या कारकीर्दीच्या शिखरावर होती.
आपल्या कुटूंबाच्या विरोधात जाऊन सैफने अमृताशी लग्न केले आणि यामुळे त्यांना अनेक दिवस अमृताच्या घरी राहावे लागले. लग्नाच्या 13 वर्षानंतर सैफ आणि अमृताचा घटस्फो ट झाला. २००४ साली दोघांचा घटस्फो ट झाले.
यामुळे घेतला घटस्फो-ट :- जेव्हा अमृताने सैफशी लग्न केले तेव्हा सैफचे करिअर काही खास नव्हते. आपण असे म्हणू शकता की जेव्हा अमृताने सैफचा हात धरला होता तेव्हा तिची कारकीर्द जवळजवळ बुडून गेली होती. त्यावेळी अमृता सिंग टॉप अभिनेत्री असायची आणि अमिताभ बच्चन, सनी देओल यांसारखे तिचे सौंदर्यवेडे कलाकार होते.
तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर तिने सैफ अली खानशी लग्न केले. लग्नाला 10 वर्षानंतर मुलगी सारा अली खानचा जन्म झाला आणि तोपर्यंत बॉलिवूडमध्ये सैफचे एक नावाजलेले नाव बनले होते. मुलीच्या पालनपोषण करण्यासाठी अमृताने तिचे फिल्मी करिअर संपवले.
हळूहळू वेळ निघून गेला आणि सैफच्या अफेअरची बातमी येऊ लागली. या वृत्तानुसार, अमृता अफेअरच्या बातमीने नाराज झाल्याने दोघांमध्ये भांडण होऊ लागले. भांडणाला कंटाळलेल्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
त्याच वेळी, सैफच्या जवळच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार, अमृता सैफवर वाईट काळात व्यवसाय सुरू करण्यासाठी दबाव आणत होती, पण त्याला व्यवसाय करायचा नव्हता. एवढेच नाही तर अमृताने वाईट काळात सैफची बाजू सोडली होती. अमृताची ही वागणूक पाहून सैफला तिच्यापासून वेगळे होणे चांगले वाटले. मित्रांनो आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल. आपणास आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.