Breaking News

ह्या कारणामुळे तुटले होते ‘शाहिद कपूर’ आणि ‘करीनाचे’ नाते सं-बंध, बहीण करिश्माने केला खु-लासा…

सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये खूप कलाकारांचे फॅमिली प्लॅनिंग सुरू आहे. या यादीमध्ये अनुष्का शर्मा अमृता राव आणि करीना कपूर या सारख्या प्रसिद्ध अभिनेत्रींचा समावेश आहे. करीना कपूरविषयी बोलायचे झाले, तर ती सध्या दुसऱ्यांदा गरोदर आहे आणि सध्या तिने तिच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे व ती घरी परत आली आहे.

तुमच्या माहितीसाठी करीना गेल्या २८ दिवसांपासून आपले पती सैफ आणि मुलगा तैमूरसोबत दिल्लीच्या पतौडी पॅलेसमध्ये होती पण आता ती मुंबईला परत आली आहे. आज आम्ही या लेखात तुमच्यासाठी करीनाच्या पुढील चित्रपटाची नव्हे तर तिच्या आणि शाहिदच्या प्रेमप्रकरणाबद्दल काही न ऐकलेल्या गोष्टी तुमच्या समोर आणार आहोत.

हे तुम्हाला माहीतच आहे, की शाहिद कपूर आणि करीना कपूर ह्यांच्यात अनेक वर्षे प्रेमसंबंध होते. हे प्रेम अगदी लग्नापर्यंत देखील पोहोचले होते. पण त्यांच्या प्रेमकहाणीचा अंत मात्र खूप वाईट झाला. तुम्हाला माहीत असेलच, की शाहिद-करीनाची प्रेमकहाणी ही इंडस्ट्रीमधील सगळ्यात प्रसिद्ध अशी लव्ह स्टोरी होती.

या दोघांना ऑनस्क्रीन तसेच ऑफस्क्रीन बघणे लोकांना खूप आवडायचे. सूत्रांकडून असे समजते, की या दोघांची प्रेमकहाणी “फिदा” चित्रपटाच्या सेटवरुन सुरू झाली आणि ३ वर्षे झाल्यावर २००७ मध्ये जेव्हा “जब वी मेट” हा चित्रपट आला तेव्हा त्यांच्या नात्याबद्दल खूप मोठे वादळ निर्माण झाले.

पण आता या दोघांचे नाते संपून १२ वर्षे उलटली आहेत. परंतु या ब्रेकअपमागचे एक नवीन कारण समोर आले आहे. सगळे प्रकरण काय आहे ते आपण जाणून घेऊया. करीना आणि शाहिद यामधील नात्याचा शेवट होण्याचे हे खरे कारण आहे.

करीना बबिता आणि करिश्मा:- शाहिद आणि करीनाच्या नात्याचा शेवट होण्याची अनेक कारणे दिली गेली होती. काही मीडियाच्या सूत्रांनी सांगितले, की दोघांचे ब्रेकअप होण्याचे कारण शाहिदचे दुसरे प्रेम-प्रकरण. तर काही रिपोर्ट्समध्ये असे म्हटले गेले की, करीना आणि शाहिदचे नाते करीनाच्या परिवारामुळे मोडले आहे.

खरच, करिनाची आई बबिता कपूर आणि करिनाची बहीण करिश्मा कपूर ह्यांचा ह्या गोष्टीला विरोध होता. असे समजते की बबिता आणि करिश्मा या माय-लेकीला शाहिद नको होता, त्यांचा शाहीदवर विश्वास नव्हता. त्याचबरोबर असेही बोलले जाते, की करिश्माला शाहिद आणि करीनाचे प्रेमसंबंध पूर्वीपासूनच मान्य नव्हते.

ब्रेकअपसाठी शेवटचा फोन शाहिदने केला असे म्हटले जाते. पण करीनाने त्या दिवसांत परत स्वत:ला सावरण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. या नाते सुरू झाले २००४ साली व त्या काळात मिडिया मध्ये त्यांच्या नात्याची खूपच जोरदार चर्चा सुरु होती.

या दोघांनी आपल्यामधील नात्याची कबुली खूप वेळा मिडियासमोर देताना पाहिले गेले होते. दोघांनीही आपल्यामधील नाते व्यक्त करण्यात लाज बाळगली नाही. पण २००७ च्या काळात त्यांच्या नात्यात कटुता आली व नाते दुरावले. असे समजते, की २००६ मध्ये “जब वी मेट” या चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते, तेव्हा दोघांचे नाते उत्तम होते.

पण चित्रीकरण संपले व नात्यात दुरावा निर्माण झाला. या चित्रपटाशी निगडीत असलेल्या लोकांच्या सांगण्यानुसार शूटिंगच्या अंतिम टप्प्यात दोघांमधील संवाद कमी होत गेला व शेवटच्या दृश्याच्या चित्रीकरणाच्या वेळी दोघेही वेगवेगळ्या ठिकाणाहून आले. आम्ही तुम्हाला सांगतो की दोघांनी ३६ चायना टाऊन, चूप चुपके आणि जब वी मेटमध्ये एकमेकांबरोबर काम केले आहे व त्यांचे हे चित्रपट चांगले सुपरहिट ठरले होते.

शाहिद व करीनाचे नाते संपण्यामागचे एक कारण म्हणजे शाहिद आणि अमृता:- सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता राव हीसुद्धा शाहिद-करीनाचे नाते तुटण्याचे एक कारण असल्याचे मानले जाते. मिळालेल्या माहितीनुसार “विवाह” फिल्मच्या चित्रीकरणाच्या दरम्यान अमृता आणि शाहिद एकमेकांच्या खूप जवळ आले होते.

यामुळे करीना खूप रागावली. करीना आणि शाहिद या दोघांमध्ये मोठे भांडण झाले होते. शेवटी दोघांचेही संबंध संपले. यानंतरच सैफच्या बरोबरची करीनाची जवळीक वाढत गेली, व ते दोघे विवाह बंधनात २०१२ साली अडकले. शाहिद कपूरनेही झाले गेले सगळे विसरून २०१५ मध्ये मीरा राजपूतशी विवाह केला.

 

About Dnyaneshwar Harak

Dnyaneshwar Harak is the Founder and editor of Hrk media Previously, he's worked in multiple news media organisationsh as journalists main focus on real news and true voice on people .

Check Also

तमन्ना भाटिया ने घातला असा ड्रेस की त्यानंतर सर्व काही दिसू लागले ,बघणाऱ्यांनी देखील सोडली नाही संधी , बघा व्हिडीओ ..

तमन्ना भाटिया ही अभिनेत्री तुम्हा सर्वांना माहिती आहे. या अभिनेत्रीने आतापर्यंत साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *