नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण बघतो आपल्या आसपासच्या बर्याच लोकांना चष्मा लागलेला असतो. आताच्या इंटरनेटच्या दुनियेत तर लहान लहान मुलांना देखील चष्मा असतो. या कोरोना महामारीच्या दिवसात शाळा बंद आहेत, ऑनलाइन शाळा सुरू असल्यामुळे मोबाइल किंवा लॅपटॉप हा अनिवार्य आहे. त्यामुळे खूप कमी वयात मुलांना चष्मा लावावा लागतो आहे. त्याचबरोबर बाहेर जाता येत नसल्यामुळे सतत मोबाइलवर गेम खेळणे, टीव्हीवर निरनिराळे कार्यक्रम पहाणे, याशिवाय काही पर्याय राहिला नाहीये. तसेच मोठ्या माणसांना सतत कम्प्युटरवर काम आणि मोबाइलचा खूपच वापर यामुळे चष्मा लागतो आहे. त्यांच्या डोळ्यावर ताण येतो आहे. तर असा चष्मा कायमस्वरूपी निघून जाण्यासाठी मी आज तुमच्यासाठी घरगुती नैसर्गिक उपाय घेऊन आले आहे.
हा उपाय लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चालू शकेल. यासाठी आपल्याला लागणार आहेत विड्याची पाने. यालाच आपण “नागलीची पाने” असेही म्हणतो. दुसरी वस्तु आपल्याला लागणार आहे ती म्हणजे मीठ. मित्रांनो, विड्याच्या पानांवर काही रसायन किंवा किटाणू असतील म्हणूनच आपण ही पाने मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायची आहेत. पाने ताटलीत घेऊन त्यावर मीठ टाकायचे आहे व पाणी टाकून आपल्याला ते पाने १० मिनिटे पाण्यात बुडवून ठेवायची आहेत. त्यामुळे जंतु असतील तर निघून जातील. १० मिनिटे झालेली आहेत. आता मी ही पाने स्वछ पाण्याने धुवून घेते आहे. आता आपल्याला याची देठे हाताने काढून घ्यायची आहेत. आता ही पाने तुकडे करून घ्यायचे आहेत, चांगली चुरुन घ्यायची आहे. ज्यामुळे आपल्याला २ ते ३ थेंब याचा रस काढून घेता येईल. आता हा पानांचा चुरा आपण कॉटन कपड्यामध्ये ठेवून घेणार आहोत. पाणी न घालता हा रस काढायचा आहे. याची पुरचुंडी करून ती बाउल मध्ये पिळून घेऊन रस काढायचा आहे. हा मी दाखवते आहे त्याप्रमाणे रस काढून घ्या. हा रस नाकाच्या बाजूने डोळ्यांमध्ये २-२ थेंब टाकायचे आहेत. असे केल्यामुळे तुमच्या डोळ्यांचा चष्मा लवकर निघून जाईल. जास्त त्रास असेल तर १५ दिवसातून २ वेळा हा उपाय करायचा आहे. कमी त्रास असेल तर ८ दिवसात १ वेळेला या रसाचा प्रयोग करायचा आहे. हा उपाय तुम्ही नक्की करून बघा व कमेन्ट बॉक्स मध्ये आम्हाला कळवा.