लग्न झाल्यानंतर दोनच दिवसांनी नवरीने माहेरी जाण्याचा आग्रह धरला, तेव्हा नवरा पण तिच्यासोबत तिच्या माहेरी जाण्यास तयार झाला. पण निघताना नवऱ्याला असे वाटले की काहीतरी चूकते आहे, परंतु तोपर्यंत त्याला जीवे मारण्याची योजना तयार करण्यात आली होती.
आणि दुसर्या्च दिवशी लोकांना त्या व्यक्तीचे प्रेत झाडावर लटकलेले आढळले. वास्तविक त्याने एका दरोडेखोर असलेल्या मुलींबरोबर लग्न केले होते. रतलाम जिल्ह्यातील सैलाना गावाजवळ एका युवकाचा मृतदेह सापडल्याच्या या घटनेत पोलिसांनी एका दरोडेखोरांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे.
यापूर्वी या दरोडेखोरांनी, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या भागातील मुलींशी अनेक ठिकाणी खोटे विवाह केले होते. महेंद्र मोतीलाल कलाल हे सात दिवसांपूर्वी सैलाना येथे मृत अवस्थेत सापडले होते. सुरुवातीच्या तपासादरम्यान असे आढळून आले की या युवकाची हत्या त्याची पत्नी मीनाक्षी हिने केली होती, जिच्याबरोबर महेंद्रचे दोन दिवसांपूर्वीच लग्न झाले होते.
महेंद्रच्या हत्येनंतर आरोपी मीनाक्षी तिच्या टोळीसह फरार झाली होती. महेंद्र आणि मीनाक्षीचा विवाह मॅरेज ब्युरोच्या मार्फत झाला होता. मीनाक्षीच्या खोट्या भावाने लग्नासाठी अडीच लाख रुपये घेतले होते, त्यानंतर दोघांनी लग्न केले आणि कुटुंबाचीसुद्धा परवानगी घेतली.
लग्नाला दोनच दिवस झाल्यानंतर, मीनाक्षीचे नातेवाईक म्हणून आलेल्या चार जणांनी महेंद्रला त्यांच्या गाडीत बसवले आणि त्याला आपल्याबरोबर घेऊन गेले. आणि दुसर्या च दिवशी महेंद्रचा मृत देह झाडावर लटकलेला आढळला.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आपली गुप्तचर यंत्रणा आणि सायबर सेल यांच्या मदतीने तपास सुरू केला. या दरम्यान आरोपी मीनाक्षीच्या वडिलांचे लोकेशन इंदूरच्या बडोली गावात पोलिसांना सापडले.
पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन मीनाक्षीला अटक केली:- तीन वर्षांपूर्वी पहिल्या पतीला सोडल्यानंतर ती आपल्या पालकांसमवेत राहत असल्याचे मीनाक्षीने पोलिसांना सांगितले. या दरम्यान मीनाक्षीची तिच्या कुटुंबातील सदस्यांशीही भांडणे झाली आणि त्यांच्यापासून ती वेगळी राहू लागली.
या दरम्यान,मीनाक्षीची ओळख पुष्पेंद्र दुबे नावाच्या तरूणाशी झाली जो तिचा बनावट भाऊ म्हणून सगळ्यांना गंडे घालत होता. मीनाक्षीने पोलिसांना सांगितले की तिला लग्नासाठी दहा हजार रुपये मिळतात. मीनाक्षीने आतापर्यंत राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमधील अनेक ठिकाणी खोटे लग्न केले असल्याचे कबूल केले.
तिने या दरम्यान ८ महिन्यांत सहा लग्ने केली होती. २ जुलै रोजी रात्री सारिका उर्फ संगीता नावाची एक महिला आणि गजेंद्र म्हणून आलेला एक तरुण महेंद्रच्या घरी पोहोचली आणि कुटुंबातील सदस्य आजारी असल्याचे सांगून मीनाक्षीला घेऊन जाऊ लागले. पण महेंद्रला काहीतरी संशयास्पद वाटले आणि त्याने सुद्धा स्वत: त्यांच्याबरोबर जाण्याचा आग्रह धरला.
त्यानंतर सर्वजण महेंद्रसोबत इंदूरला रवाना झाले. जाताना महेंद्रला त्याच्यासोबत झालेल्या फसवणूकीची कल्पना आली होती. प्रत्येकाने या प्र करणाबद्दल महेंद्रशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि त्यांची भांडणे सुरू झाली. यानंतर महेंद्रला गाडीतून खाली ढकलले व आपल्या साथीदारांसह मीनाक्षीने तिथून पलायन केले.
आपल्या झालेल्या फसवणूकीने नै राश्य येऊन महेंद्रने काही अंतरावर झाडावर लटकून आत्महत्या केली. यापूर्वी या युवकाला ठार मारून झाडावर टांगण्यात आले असावे असा पोलिसांना सं शय होता, परंतु घटनेच्या ठिकाणी खाली दगड लावल्यामुळे आत्महत्येची पुष्टी झाली.
राजस्थानातील बांसवाडा येथून या घटनेची सुरूवात झाल्यामुळे रतलाम पोलिसांनी आरोपी मीनाक्षीला बांसवाडा पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. तेथे मीनाक्षी आणि मॅरेज ब्युरोचे संचालक मुकेश जोशी यांच्याविरूद्ध कल म ५ व ३६५ अन्वये गु न्हा दा खल करण्यात आला आहे.