बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर भारतीयाच नाही तर परदेशी लोकांच्या देखील मनात एक स्वत: ची जागा निर्माण केले आहे . तसेच त्यांच्याशी लग्नही केले आहे. प्रियांका चोप्रापासून प्रिती झिंटापर्यंत इंडस्ट्रीत अनेक टॉप अभिनेत्री आहेत, ज्यांनी परदेशी मुलाशी लग्न केले असुन आनंदी जीवन जगत आहेत.
हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या दमदार अभिनयाचा प्रसार केवळ बॉलीवूडमध्येच नाही तर हाॅलिवूड मध्ये देखील प्रसिद्ध मिळवली आहे. त्यामुळे त्यांचे परदेशातही चांगले फॅन फॉलोइंग आहेत. एवढेच नाही तर या कलाकारांनी परदेशीतील मुलांसोबत लग्नही केले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाचा जन्म ३१ जानेवारी १९७५ रोजी झाला. अभिनेत्री असण्यासोबतच प्रीती झिंटा एक बिझनेस वुमन देखील आहे. प्रितीची गणना बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत केली जाते. तिने बॉलिवूडला अनेक ब्लॉ’कबस्टर चित्रपट दिले आहेत. मात्र, प्रीती गेल्या काही काळापासून चित्रपटांपासून दूर आहे.
प्रीती झिंटाने १९९८ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. १९९६मध्ये मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान प्रीती एका दिग्दर्शकाला भेटली होती. या दिग्दर्शकाने तिला चॉकलेट कमर्शियलमध्ये काम करण्याची ऑफर दिली. त्यानंतर प्रीतीने अनेक जाहिरातींमध्ये काम केले. १९९७ मध्ये एका ऑडिशन दरम्यान शेखर कपूरने प्रितीला पाहिले आणि तिला अभिनेत्री बनण्याचा सल्ला दिला.
त्यानंतर प्रीतीने त्यांचा सल्ला पाळला आणि चित्रपटात पदार्पण केले. प्रितीने १९९८मध्ये शाहरुखसोबत ‘दिल से’मधून पदार्पण केले होते. त्यानंतर तिच्या कारकिर्दीला वेग आला. प्रीती झिंटाने २०१६ मध्ये लग्नगाठ बां’धली. वर्षाच्या सुरुवातीला प्रितीने १० वर्षांनी लहान असलेल्या अमेरिकन नागरिक जीन गुडइनफशी लग्न केले.
२९फेब्रुवारी रोजी प्रीती आणि जीन यांनी अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे एका खाजगी समारंभात सात फेरे घेतले. प्रिती झिंटाने आपल्या वैयक्तिक आयुष्यात खूप उदात्त काम केले आहे. प्रीती झिंटाच्या लग्नाला ६ वर्षे झाली आहेत, पण आजपर्यंत तिला स्वतःचे एकही मूल नाही.
तसेच, आज प्रीती झिंटा ३४ मुलींची आई आहे. होय, हे अगदी खरे आहे. २००८ मध्ये प्रीतीने ऋषिकेशमधील ३४ अनाथ मुलींना दत्तक घेतले होते. आणि तेव्हापासून या मुलांना कधीच आईची कमतरता जाणवत नाही आणि त्यांची प्रत्येक गरज वेळेवर पूर्ण करतात.
प्रिती झिंटाने बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक कॉमेडी चित्रपट दिले आहेत. जो खूप सुपरहिट झाला होता. ते चित्रपट पाहून लोकांना आजही खूप आनंद मिळतो. प्रीती झिंटाने ‘दिल चाहता है’, ‘दिल से’, ‘कभी अलविदा ना कहना’ आणि ‘सलाम नमस्ते’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.