आपल्यापेक्षा मोठ्यांच्या पाया पडण्यात कधी लाजत नाहीत हे ६ बॉलीवूड कलाकार, यांच्यावर झाले आहेत चांगले संस्कार

Entertenment

भारतीय लोक पाहुण्यांना नेहमीच भगवंताचा दर्जा देतात. आपले संस्कार आपल्याला नेहमीच हे शिकवतात कि वडीलधाऱ्यांचा नेहमी आदर आणि मान सन्मान केला पाहिजे. भारतीय संस्कृतीमध्ये आपल्यापेक्षा मोठ्यांना रिस्पेक्ट देण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे त्यांचे पाया पडणे.

तथापि अनेक लोकं पाया पडण्यात खूप लाजत असतात. खासकरून श्रीमंत आणि प्रसिद्धी मिळवलेल्या लोकांचे असे विचार असतात. परंतु आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या त्या कलाकारांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्यासाठी श्रीमंती आणि प्रसिद्धीच्या अगोदर संस्कृती येते.

अक्षय कुमार

अक्षय कुमार बॉलीवूडच्या यशस्वी कलाकारांपैकी एक आहे. दरवर्षी त्याचे तीन ते चार चित्रपट येत असतात आणि हे सर्वच चित्रपट हिट होतात. तो आज भारतातील टॉप अ‍ॅक्टर्समध्ये सामील आहे. मात्र तरीही हि सफलता आणि प्रसिद्ध अक्षयच्या डोक्यावर चढलेली नाही. तो आपल्या भारतीय संस्कृतीचा खूप सन्मान करतो.

हेच कारण आहे जेव्हा कधी तो आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीशी किंवा अ‍ॅक्टरशी भेटतो त्यावेळी त्यांचा पाया पडण्यास कधीही विसरत नाही. अक्षय गोवा येथे झालेल्या ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये अमिताभ बच्चन यांच्या पायाला स्पर्श करताना दिसला होता.

रणवीर सिंह

रणवीर बॉलीवूडमधील बिनधास्त अभिनेता आहे. त्याचा फॅशन सेन्स भलेही थोडा विचित्र असेल परंतु तो एक खूपच चांगला माणूस आहे. रणवीर जेव्हा आपल्या फॅन्सला भेटतो त्यावेळी त्यांचाशी खूप विनम्रपणे वागतो. रणवीरची भेट जेव्हा कधी आपल्यापेक्षा मोठ्या अभिनेत्याशी होते त्यावेळी तो त्यांचे पाया पडण्यास कधीही विसरत नाही. एकदा तर तो अ‍ॅवॉर्ड फंक्शन मध्येच अमिताभ बच्चन यांच्या पाया पडला होता.

रणबीर कपूर

रणवीर दिसायला खूपच हँडसम आहे. त्याच्याजवळ पैसा आणि प्रसिद्धीची काही कमी नाही. बॉलीवूडमध्ये त्याची इमेज एक प्लेबॉय वाली आहे. मात्र तरीही रणबीर कपूर आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या व्यक्तींचा नेहमी सन्मान करत असतो आणि काहीही संकोच न करता तो त्यांचे पाया पडतो.

सलमान खान

सलमान खान बॉलीवूडमधील नंबर १ चा सुपरस्टार आहे. परंतु त्याच्या या पोजीशनने त्याला कधीही घमंडी आणि गर्विष्ठ नाही बनवले. खासकरून जेव्हा गोष्ट सिनियर अ‍ॅक्टर्सची येते त्यावेळी सलमान त्यांच्यासोबत नेहमीच आदराने वागतो. याचे उदाहरण आपण फोटोमध्ये पाहू शकतो. हेच कारण आहे कि लोक भाईजानला खूपच पसंत करतात.

कपिल शर्मा

कपिल शर्मा एका मध्यमवर्गीय कुटुंबाशी बिलाँग करतो. त्याला आपल्या संस्काराची खूप वेल्यु आहे. हेच कारण आहे ज्यामुळे तो आज भारतातील एक नंबरचा कॉमेडियन बनून देखील आपल्या शोमध्ये येणाऱ्या प्रत्येक सीनियर अ‍ॅक्टरच्या पाया पडतो.

शाहरुख खान

बॉलीवूडमध्ये किंग म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान सुद्धा सर्वांच्यासोबत विनम्रतेने वागत असतो. या फोटोमध्ये आपण पाहू शकता कि तो कसे ममता बॅनर्जी यांच्या पायाला स्पर्श करत आहे.

याशिवाय शाहरुख़ला अमिताभ बच्चन सहित अनेक सिनियर व्यक्तींच्या पाया पडताना पाहिले गेले आहे. असेही ऐकण्यात आले आहे कि जेव्हा कधी शाहरुखच्या घरी पाहुणे येतात त्यावेळी तो त्यांना सोडण्यासाठी कारपर्यंत देखील जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *