प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट पाहून अखिल भारतीय सिंगल संघटनेचे सदस्य म्हणाले, तू आमच्यापैकी…बघा फोटो

Bollywood Entertenment

आज जगभरात 14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जात आहे. अगदी तरुणांपासून जेष्ठांपर्यंत हा ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा होत आहे. समोरासमोर तर काहीजण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रियजनांना या खास दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

असे म्हणतात की, हा दिवस आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी जगभरात साजरा केला जातो. आता या दिवशी कला विश्वातील कलाकार कसे मागे राहतील. एक कलाकार देखील या दिवसाचा पुरेपूर आनंद लुटत आहेत.

नुकताच आता उत्कृष्ट सूत्रसंचालिका, कवयत्री आणि मराठमोळी सुंदर अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने देखील आज व्हॅलेंटाईन डे निमित्त चाहत्यांसाठी जबरदस्त पोस्ट केली आहे.  इतकच नाही, तर तिच्या चाहत्यांनी देखील तिच्या या पोस्टवर भरभरून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव करत तिला प्रतिसाद दिला आहे.

 

 

अभिनेत्री प्राजक्ता माळी, मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील तिच्या कामासाठी प्रसिद्ध आहे ही एक खरी फॅशनिस्टा आहे जी फॅशन स्टेटमेंट करण्याची एकही संधी कधीही सोडत नाही. प्राजक्ता तिच्या बो’ल्ड आणि बॉ’सी लूकसाठी प्रसिद्धी मिळवण्यासाठी ओळखली जाते.

तिचा प्रत्येक लूक चाहत्यांना आवडतो आणि तो लूक नवीन ट्रेंडमध्ये देखील येतो. मराठी मालिकांमधून आपली ओळख निर्माण करणारी प्राजक्ता माळी आज प्रत्येकाच्या हृदयावर राज्य करण्यासाठी यशस्वी झाली आहे.

ती चित्रपटांमध्ये असो किंवा मालिकांमध्ये तिला दिलेली भूमिका अगदी चोखपणे पार पाडते. प्रेक्षकांनी देखील अभिनेत्रीला जणू काही डोक्यावरच घेतल आहे. प्राजक्ता माळी सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.

अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांसाठी आयुष्यातील किस्से तसेच तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ तसेच चित्रपट याबद्दल माहिती देत असते. चाहते देखील तिच्या नवीन पोस्टची वाट पाहत असतात. आता ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त अभिनेत्रीने लाल रंगाच्या साडीमधील जबरदस्त फोटो शेअर केले आहेत.

 

 

ज्यावर आता चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्स भडिमार केला जात आहे. प्राजक्ता माळीने हे फोटो शेअर करत एक कॅप्शन देखील लिहिले आहे. खरं तर, या कॅप्शन मुळेच सर्वत्र तिच्या या पोस्टची चर्चा रंगली आहे. इतकंच नाही, तर युजर्सने तिच्या या कॅप्शनवर एक मजेशीर कमेंट देखील केली आहे.

अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “तुम्ही स्वतःचेच व्हॅलेंटाइन व्हा, हाच झोन पुढेही सुरू राहील. अखिल भारतीय सिंगल संघटनेचे सदस्य तुम्ही एकटे नाही मीही तुमच्यामध्ये सहभागी आहे.” यानंतर प्राजक्ताने लिहिले की, “मला हे स्वातंत्र्य आवडते.

असो मित्रांनो प्रेम करा, कारण प्रेम ही एकमेव अशी गोष्ट आहे की ज्यावर आपण सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे.” तसेच अभिनेत्रीने यासोबत हसलेले इमोजी देखील शेअर केले आहेत. अभिनेत्रीच्या या कॅप्शनवर युजरने मजेशीर कमेंट केले आहेत.

अभिनेत्री सिंगल असल्याचे पाहताच युजर्स देखील म्हणत आहेत की, “असं असेल तर मला सिंगल राहायला आवडेल.” तसेच काही युजर्स म्हणत आहेत की, “तू अजूनही सिंगल कशी? तुझं सिंगल सेनेत स्वागत! आमच्या दुःखात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद! तू आमच्यापैकीच एक आहेस?

युजर्सने अशा प्रकारच्या तिच्या या पोस्टवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. नुकताच आता अभिनेत्रीने ‘प्राजक्तराज’ साथीच्या नावाचा ज्वेलरी ब्रँड सुरू केला आहे. एकंदरीत तिने मनोरंजन विश्वासोबतच आता व्यावसायिक क्षेत्रात देखील आपला हात आजमावण्यास सुरुवात केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *