बॉलीवूड अभिनेता अजय देवगन आपल्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण बॉलीवूड सृष्टीवर आज अधिराज्य गाजवत आहे. अजय देवगनने बनवलेले बहुतेक चित्रपट हिट ठरले आहेत. त्याला बॉलीवूडचा सिंघम म्हणून ओळखले जाते.
आता माझी सटकली या फेमस डायलॉग प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा बाजीराव सिंघम म्हणजेच अभिनेता अजय देवगन ने बॉलीवूड मध्ये अनेक हिट चित्रपट दिले.सध्या अजय बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक व निर्माता म्हणून काम करतो.
अजय देवगन हा हिंदी चित्रपट सृष्टीतील एक अभिनेता मांडला जातो त्याने 1999 साने चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर अजय देवगनने काजोलसोबत ‘हस्टल’ या चित्रपटात काम केले.आतापर्यंत अजय देवगन ने 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
काजोल आणि अजय देवगणची लाडकी मुलगी न्यासा देवगणकडे सौंदर्य आणि स्टाईल स्टेटमेंटच्या बाबतीत कोणतीही तोड नाही. न्यासा तिच्या फॅशन से’न्स आणि ग्लॅमरस स्टाइलने अनेक बड्या अभिनेत्रींशी स्पर्धा करते.
ती अनेकदा तिच्या जबरदस्त पार्टी लुक्समुळे चर्चेचा विषय बनते. न्यासा सोशल मीडियाच्या दुनियेतील एक मोठी स्टार आहे, म्हणूनच न्यासाचे फोटो समोर येताच व्हायरल होतात.
सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये न्यासानं एका मुलाला मिठी मारलेली दिसत आहे. तो मुलगा कोण ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर मिठी मारलेल्या या तरुणाचं नाव आहे ओरहान अवात्रामणि. एक अॅक्टिविस्ट म्हणून त्याची ओळख आहे. अनेक कलाकारांच्या मुलांशी त्याची मैत्री आहे. सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांचाही तो चांगला मित्र आहे.
न्यासा अभ्यासातून वेळ काढून सध्या तिच्या खास मित्रांसमवेत वेळ घालवताना दिसत आहे. यावेळी तिची स्टाईल स्टेटमेंटही पाहण्याजोगी आहे. आपण ज्या ठिकाणी फिरण्यासाठी गेलो आहोत त्या ठिकाणचं वातावरण आणि एकंदर स्थापत्य पाहता तिनं निवडलेले कपड्यांचे रंगही निरखून पाहावेत असेच आहेत.
दरम्यान,अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा देवगन भलेही बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर असली तरी ती सर्वात लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. तिने बॉलिवूडच्या दुनियेत भलेही पाऊल ठेवले नसेल, पण सोशल मीडियावर तिचे फॅन फॉलोअर्स खूप आहेत. मग ती तिच्या आई-वडिलांसोबत बाहेर फिरण्यासाठी असो किंवा एखादा कार्यक्रम असो, ती कॅमेऱ्यासाठी पोझ देते. न्यासा देवगणचे फोटो चाहत्यांना तिच्या सौंदर्याचे वेड लावते.
अजय देवगण हा केवळ एक आदर्श पती म्हणुनच नाही तर एक आदर्श आणि काळजीवाहू पिता म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासा हिच्यावर दोघांचा खास जीव असला तरी म्हणतात ना की लेकीवर सर्वात जास्त प्रेम बापाचंच असतं आणि हीच गोष्ट अजय देवगणला देखील लागू होते. त्यामुळेच तो आपल्या लेकीवर किती प्रेम करतो हे वारंवार दिसून सुद्धा येतं. तो नेहमी न्यासाचा मागे ठामपणे उभा राहतो आणि तिला सपोर्ट करतो.