अक्षय कुमार फिल्म इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. गेली दोन दशके तो बॉलीवूडमध्ये काम करत आहे. त्याने आपल्या करियरमध्ये अनेक टॉप अभिनेत्रींसोबत काम केले आहे.
परंतु तुम्हाला माहिती का कि अक्षय कुमारची पहिली हिरोईन कोण होती? अक्षय कुमारच्या पहिल्या अभिनेत्रीचे नाव होते शांतीप्रिया. अक्षय कुमार ने अभिनेत्री शांतीप्रिया सोबत आपला पहिला चित्रपट सौगंध मधून डेब्यू केला होता.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि सध्या शांतीप्रिया कशी दिसते आणि कुठे आहे. शांतीप्रियाने सुद्धा अक्षय कुमार सारखेच सौगंध या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. सर्वात विशेष गोष्ट हि आहे कि सौगंध चित्रपट फ्लॉप झाल्यानंतरहि शांतीप्रियाने फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणे नाही सोडले.
हिंदी चित्रपटामध्ये काम करण्याबरोबरच शांतीप्रियाने तमिळ आणि तेलगु भाषेच्या चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. ती साउथच्या चित्रपटामधील खूपच लोकप्रिय अभिनेत्री होती.
परंतु इतक्या सर्व हिंदी चित्रपटामध्ये काम करूनहि तिचा एकही हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. चित्रपटामध्ये काम करण्याव्यतिरिक्त शांतीप्रियाने माता की चौकी आणि द्वारकाधीश भगवान श्री कृष्ण सारख्या सिरीयलमध्ये देखील काम केले आहे.
आजच्या काळामध्ये शांतीप्रियाला तमिळ चित्रपटामध्ये आणि सिरियल्समध्ये सपोर्टिंग अभिनेत्रीची भूमिका साकारताना पाहू शकतो. हिंदी चित्रपटामध्ये काम करत असताना शांतीप्रियाने सिद्धार्थ रे सोबत लग्न केले.
लग्नाच्या काही वर्षानंतरच तिचा पती सिद्धार्थ रे चे निधन झाले. शांतीप्रियाने १९९९ मध्ये सिद्धार्थ रे सोबत लग्न केले होते. परंतु लग्नाच्या अवघ्या पाच वर्षानंतरच तिच्या पतीचे निधन झाले आणि ती विधवा झाली.
सिद्धार्थ रे ने अनेक हिंदी चित्रपटामध्ये काम केले आहे. सिद्धार्थ रे ने काजोल सोबत बाजीगर चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. शांतीप्रिया बराच काळ चित्रपटापासून दूर होती.
आता तिने हिंदी टीव्ही सिरियल्समधून पुन्हा पदार्पण केले आहे. तसे तर सध्या शांतीप्रिया ऑनस्क्रीन कमीची पाहायला मिळते. पण ती अनेक वेळा ऑफस्क्रीन इव्हेंटमध्ये पाहायला मिळते.
शांतीप्रियाचा पती सिद्धार्थ प्रसिद्ध अभिनेता वी. शांताराम यांचे नातू होते. सिद्धार्थ रेने १९९२ मध्ये वंश चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.
वंश चित्रपटामध्ये काम केल्यानंतर तो तिलक आणि मिलेट्रीराज सारख्या चित्रपटामध्ये देखील पाहायला मिळाला होता.
इतक्या चित्रपटामध्ये काम केल्यानंतरहि त्याला बाजीगर या चित्रपटातील भुमिकेमुळे जास्त प्रसिद्धी मिळाली. बाजीगर चित्रपटामध्ये सिद्धार्थ रे ने काजोलचा मित्र आणि इंस्पेक्टर करण सक्सेनाची भूमिका साकारली होती.
पहिल्या पेक्षा सध्या शांतीप्रियाचा लुक खूपच बदलला आहे पण आजही तिच्या चेहऱ्यावर निरागसता आणि हसू दिसून येते. शांतीप्रिया प्रसिद्ध साउथ इंडियन आणि बॉलीवूड अभिनेत्री भानुप्रियाची बहिण आहे.
शांतीप्रियाने आतापर्यंत फूल और अंगार (१९९३), वीरता (१९९३), इक्के पे इक्का (१९९४), दोस्ती दुश्मनी (१९८६), इंसाफ की पुकार (१९८७), खुदगर्ज (१९८७), कसम वर्दी की (१९८९) आणि भाभी (१९९१) सारख्या बॉलीवूड चित्रपटामध्ये पाहायला मिळाली आहे.