ऐश्वर्याच्या या कृत्यावर भडकली होती जया बच्चन, म्हणाली होती, लाज तर राहिलीच नाही….

Bollywood

राज्यसभा खासदार आणि बॉलीवूड अभिनेत्री जया बच्चन सामाजिक मुद्द्यावर अतिशय परखडपणे आपले म्हणणे व्यक्त करते. ज्यामुळे तिने आपली सून ऐश्वर्याला देखील चांगलेच सुनावले होते.

होय जया बच्चनने आजकाल बनणाऱ्या चित्रपटांवर मोठे वक्तव्य केले होते आणि हे वक्तव्य तिने तेव्हा केले होते जेव्हा तिची सून ऐश्वर्या रायचा ऐ दिल है मुश्किल हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

हा चित्रपट पाहिल्यानंतर जया बच्चनने सार्वजनिक व्यासपीठावरून ऐश्वर्यावर नाव न घेता निशाणा साधला होता. चला तर जाणून घेऊया या लेखामधून तुमच्यासाठी काय खास आहे.

ऐश्वर्या रायच्या ऐ दिल है मुश्किल या चित्रपटातील अभिनयावर संपूर्ण बच्चन परिवार नाखूष होता, ज्यामुळे जया बच्चनची सुद्धा नाराजी जगजाहीर झाली होती. वास्तविक ऐश्वर्या रायने ऐ दिल है मुश्किल चित्रपटामध्ये काही बोल्ड सीन दिले होते ज्यामुळे तिच्या सासरचे नाराज झाले होते.

आणि जया बच्चनने एक चित्रपटाच्या कार्यक्रमादरम्यान ऐश्वर्या रायचे नाव न घेता तिच्यावर निशाणा साधला होता. असे मानले जाते कि ऐ दिल है मुश्किल नंतर ऐश्वर्या रायला बोल्ड सीन करण्यास मनाई करण्यात आली होती.

ऐश्वर्या रायवर भडकली होती जया बच्चन

ऐ दिल है मुश्किल प्रदर्शित झाल्यानंतर जया बच्चनने ऐश्वर्या रायचा बोल्ड सीन पाहिला आणि ती खूपच भडकली आणि आजकालच्या चित्रपटांवरच प्रश्न उपस्थित केला.

त्याचबरोबर एका चित्रपटाच्या कार्यक्रमाच्या वेळी जया बच्चन म्हणाली कि आजकालच्या चित्रपटांमध्ये तर जरासुद्धा लाज बाळगली जात नाही.

याशिवाय जया बच्चन हेसुद्धा म्हणाली होती कि पूर्वी दिग्दर्शक आपली फक्त कला सादर करत असत आणि आता यानी चित्रपटांना एक व्यवसाय बनवला आहे आणि ते त्याच आधारावर चित्रपट बनवतात.

बॉलीवूडने पैशांसोबत लग्न केले आहे – जया बच्चन

जया बच्चन पुढे म्हणाली कि बॉलीवूडने पैशांसोबत लग्न केले आहे ज्यामुळे त्यांचे फक्त बॉक्स ऑफिसवरच कलेक्शन पाहायला मिळते. त्याचबरोबर जया बच्चन म्हणाली कि अभिनेत्रींमध्ये जरासुद्धा लाज राहिली नाही, कारण ते छोटे छोटे कपडे घालून आयटम डान्स करतात.

जया बच्चन असेही म्हणाली कि, मुंबईचे लोक चित्रपट बनवतात ज्यामुळे ते पश्चिम संस्कृतिशी प्रभावित आहेत आणि हीच विचारसरणी ते चित्रपटामध्ये सुद्धा घालतात आणि बोल्ड सीन करतात.

खलनायिकेची गरजच नाही – जया बच्चन

जया बच्चन आपले म्हणणे पुढे मांडताना म्हणाली कि पूर्वीच्या चित्रपटांमध्ये खलनायिकेची गरज होती परंतु पण आता हे काम सुद्धा हिरोईन करतात. ज्यामुळे आता खलनायिकेची गरजच राहिली नाही.

त्याचबरोबर जया बच्चन म्हणाली कि आजकाल चित्रपट पाहून ती अस्वस्थ होते आणि तिचे मन करते कि एखाद्या शांत ठिकाणी जावे जेणेकरून या सर्वांपासून दूर राहता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *