भगव्या बिकिनीच्या वादात दीपिका पदुकोणचा डायलॉग व्हायरल, ‘रंगाचा कोणताही ध’र्म नसतो…’

Entertenment

एखादा चित्रपट रिलीज व्हायचं म्हटलं की, प्रेक्षकांचं लक्ष चित्रपटाकडे लागून राहतं. मग तो चित्रपट कसा आहे? त्यामध्ये कोण काम करणार आहे? याचं बरोबर चित्रपटाची स्टोरी काय असेल हे जाणून घेण्यात प्रेक्षकांना फार इंटरेस्ट असतो. चित्रपट रिलीज होण्यापूर्वी या चर्चांना उधाण आलेलं असतं. अनेकदा चित्रपटाच्या कथेवरून चित्रपट गोत्यात येतो. तसेच काही वेळा अनेक चित्रपटांमध्ये इंटरनेट सेन्स आणि कपड्यांमुळे देखील चित्रपटावर आक्षेप घेतला जातो.

नुकताच आता बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ चित्रपट चर्चेत आला आहे. ‘पठाण’ चित्रपटाला सध्या रोल केलं जात आहे, ज्याचं कारण म्हणजे या चित्रपटातील बेशरम रंग हे गाणं. या गाण्यामुळे चित्रपटावर आक्षेप घेतला जात आहे. शाहरूख खानचा हा चित्रपट रिलीज न करण्याची मागणी केली जात आहे. तसच हा चित्रपट रिलीज झाला तरी चालून दिला जाणार नाही असे म्हटले जात आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून टोल केलं जात नाही तर राजकीय नेत्यांच्या माध्यमातून देखील यावर कडव्या प्रतिक्रिया आल्या आहेत. ज्याचं कारण म्हणजे ‘बेशर्म रंग’ या गाण्यात दीपिका पदुकोणने परिधान केलेली बिकिनी. दीपिका पदुकोणने यात भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे ज्यामुळे धर्मवाद निर्माण झाला आहे. हिंदू धर्मात भगव्या रंगाला प्रचंड महत्त्व आहे. परंतु चित्रपटात भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्यामुळे चित्रपटातील अ’श्ली’लता आणि धर्माचा अपमान यामुळे चित्रपटावर आक्षेप घेतला जात आहे.

अशातच आता चित्रपटातील मुख्य अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाचा एक डायलॉग व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. जो एका चाहत्याने शेअर केला आहे, जो रंगाला धर्म नसतो हे दर्शवत आहे. जेव्हापासून दीपिका पदुकोण ‘बेशरम रंग’ गाण्यातून वेगळ्या अंदाजात दिसली आहे. तेव्हापासून तिच्या लुक आणि डान्सचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दीपिकाचा हा नवा रंग तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. यामुळेच एक वर्ग दीपिका, शाहरुख आणि पठाण यांच्यावर निशाणा साधत असताना दुसरा चाहता वर्ग त्यांच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. शाहरुख खान आणि दीपिकाच्या चित्रपटावर ‘बॉयकॉट’ व्हावा, असे चाहत्यांना वाटत नाही. यामुळेच ते अशा गोष्टी सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत, ज्या चित्रपटाचे समर्थन करतात.

सध्या भगव्या बिकिनी बाबतचा वाद वाढत चालला असताना चाहत्यांनी देखील यात हस्तक्षेप करून याबाबत चर्चा सुरू केली आहे. एका चाहत्याने ‘बाजीराव मस्तानी’चा एक डायलॉग शेअर केला आहे. चित्रपटाच्या या भागात प्रियांका चोप्राच्या मुलाचा चेहरा दिसतो पण दीपिका जाते. यादरम्यान ती रंगाबाबत आपले म्हणणे मांडते. ”रंगाचा ध’र्म नसतो, पण कधी कधी माणसाचे मन नक्कीच काळे होते,” असे म्हणताना ती दिसत आहे.

दीपिका पुढे म्हणते की, “दुर्गेची मूर्ती सजवताना हिरव्या रंगाच्या बांगड्या, हिरव्या रंगाची चोली घातली जाते. दर्ग्यामध्ये मोठमोठ्या पीर -फकीरांच्या समाधीवर भगव्या रंगाच्या चादर चढवल्या जातात, मग रंग मनात येत नाही का?” असे सवाल करताना दीपिका करत आहे. एकंदरीत चाहत्यांनी तिला या चित्रपटासाठी प्रोत्साहन करण्यासाठी हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दीपिका पदुकोण फिफा विश्वचषक ट्रॉफीचे अनावरण करणार आहे. लिओनेल मेस्सीचा संघ अर्जेंटिना रविवारी अंतिम फेरीत फ्रान्सशी भिडणार आहे. त्यावेळी दीपिका कतारमधील लुसेल आयकॉनिक स्टेडियममध्ये उपस्थित असेल. शाहरुख खान फिफा वर्ल्ड कप फायनल मॅचच्या टेलिकास्ट दरम्यान ‘पठाण’चे प्रमोशन करणार आहे. दीपिका पदुकोणचा चित्रपट ‘पठाण’ 25 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *