बॉलिवूड स्टार्स त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत असतात. यासोबतच त्यांच्या अफेअरच्या चर्चांमधून अनेकदा बातम्यांचा बाजारही तापत असतो, त्यात काही कलाकारांच्या बातम्या खऱ्या ठरतात. त्याचबरोबर अनेक स्टार्सचे नातेही चुकीच्या पद्धतीने जोडले गेले आहे, ज्याचा खुलासा त्या सेलिब्रिटींनीच केला आहे.
या यादीत अभिनेत्री रवीना टंडनचे नाव आहे, जिने तिच्याशी संबंधित अफेअर्सबद्दल अनेक मोठे खुलासे केले आहेत. अभिनेत्रीने खुलासा केला की तिचे नाव तिच्या भावाशी जोडले गेले होते, जे ऐकून ती अनेक रात्री झोपू शकली नाही. अनेक वर्षे चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये अभिनेत्री रवीना टंडनच्या नावाचाही समावेश आहे.
रवीनाने अनेक कलाकारांसोबत चित्रपटात काम केले. ज्यामध्ये तिचे नाव अक्षय कुमारसोबत सर्वात जास्त काळ जोडले गेले होते. मात्र, रवीना टंडनने चित्रपट वितरक उद्योगपती अनिल थडानी यांच्याशी गुपचूप लग्न केले.
बॉलिवूडच्या दुनियेत पाऊल ठेवल्यानंतर अभिनेत्री रवीना टंडनने एकापाठोपाठ एक अनेक चित्रपटांमध्ये काम केले, जे खूप चर्चेत होते, इतकेच नाही तर तिने केलेला ‘टिप-टिप बरसा पानी’ हा आयटम नंबर आजही चर्चेत आहे.
पण तुम्हाला माहिती आहे का की तिचे चित्रपट जितके चर्चेत होते तितकीच ती वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असायची. जरी रवीना टंडनचे नाव चित्रपट कारकिर्दीत अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले, परंतु एक वेळ अशी आली जेव्हा तिचे नाव तिच्या खऱ्या भावासोबतही जोडले गेले.
होय, जेव्हा रवीना टंडनचे नाव तिच्या खर्या भावासोबत जोडले गेले तेव्हा तिला या गोष्टीचा खूप त्रास झाला. याचा खुलासा अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.
“एक रुबाबदार, गोरापान मुलगा दररोज रवीनाला सोडण्यासाठी येत आहे, त्यामुळे हा रविना चा बॉयफ्रेंड असण्याची शक्यता आहे.” असे अभिनेत्री रविना टंङन बद्धल लिहिण्यात आले होते. या प्रसंगावर आपण कुणाला आणि काय उत्तर द्यावे, हेच तिला समजत नव्हते. त्या दरम्यान तिची परिस्थिती खूप खराब झाली होती.
मुलाखतीदरम्यान तिने सांगितले की, मला आजही ते दिवस आठवतात, जेव्हा अनेक रात्री मला झोप येत नव्हती. मी नेहमी झोपायला जातेवेळी रडायची. मला दर महिन्याला एक भीती असायची की एखादा पिवळ्या रंगाचा गॉसिप कॉलम माझ्या प्रतिष्ठेला कलंकित करेल.
तो मला, माझी विश्वासार्हता, माझी प्रतिष्ठा, माझ्या आईवडिलांना संकटात टाकेल आणि त्यावेळी मला हे सर्व काय आहे हे वाचून आश्चर्य वाटायचे,” असेही रवीना म्हणाली.
त्यामुळे तिच्यासोबत तिच्या आई-वडिलांनाही त्रासात दिवस काढावे लागले. एकदा तर सर्वांनाच मर्यादा ओलांडली. रविना टंडन म्हणाली की, या गोष्टींवर कोण आणि किती काळ खुलासा देणार?” भावाला बॉयफ्रेंड बोल जात असलेल्या बातम्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत राहील्या.
ज्या पाहून रवीनाला खूप वाईट वाटल. ती म्हणाली – “मला अजूनही त्या रात्री आठवतात, जेव्हा मला झोप येत नव्हती आणि मी झोपण्यासाठी रडायची. या सर्व गोष्टींमध्ये आपण जगलो आहोत. हे पुन्हा पुन्हा कोण समजावणार?