बॉलीवूड चित्रपटाची खरी मजा तेव्हाच येते जेव्हा पडद्यावर दिसणाऱ्या हिरो आणि हिरोईनमध्ये दम असेल. जर दोघांच्यामधील केमिस्ट्री बकवास असेल तर दर्शकांना काही खास मजा येत नाही.
अशामध्ये बॉलीवूडमध्ये काही अशा जोड्या देखील झाल्या ज्यांना दर्शकांनी एकत्र खूपच पसंत केले. ह्या जोड्या जेव्हा एकत्र एका पडद्यावर येत होत्या त्यावेळी दर्शक अक्षरशः वेडे व्हायचे. याचा परिणाम हा झाला कि डायरेक्टर आणि प्रोड्यूसरने या जोड्यांना सर्वात जास्त वेळा आपल्या चित्रपटामध्ये सामील केले.
शाहरुख़ खान आणि जूही चावला
शाहरुख़ खान आणि जूही चावला खूप चांगले मित्र आहेत. एक काळ असा होता कि दोघांनी जवळजवळ ८ चित्रपट एकत्र केले होते. डुप्लीकेट, राजू बन गया जेंटलमैन, भूतनाथ, वन टू का फोर, रामजाने, डर, यस बॉस आणि फिर भी दिल हैं हिन्दुस्तानी हे त्यांचे चित्रपट आहेत. या सर्व चित्रपटांमध्ये त्यांची केमिस्ट्री खूपच जबरदस्त होती.
सलमान खान आणि करिश्मा कपूर
सलमान खान आणि करिश्मा कपूर ने आपल्या करियरच्या सुरवातीला प्रेमी कडी नावाच्या चित्रपटामधून सर्वात प्रथम एकत्र काम केले होते. लोकांना यांची जोडी खूपच पसंत आली. अशामध्ये यानी एकत्र आणखी ८ चित्रपटांमध्ये काम केले जे पुढील प्रमाणे आहेत. जीत, जुड़वा, बीवी नंबर 1, चल मेरे भाई, दुल्हन हम ले जाएंगे, निश्चय, अंदाज़ अपना अपना आणि जाग्रति
गोविंदा आणि करिश्मा कपूर
९० च्या दशकामधील सर्वात पॉपुलर जोड्यांमध्ये गोविंदा आणि करिश्मा कपूरचे नाव टॉपमध्ये येत होते. दोघांनी आपल्या फिल्मी करियरमध्ये ११ चित्रपट एकत्र केले. यामध्ये दुलारा, कूली नंबर 1, राजा बाबू, साजन चले ससुराल, जब जब प्यार हुआ, हीरो नंबर १, खुद्दार, प्रेम शक्ति, शिकारी, हसीना मान जाएगी आणि मुकाबला सामील आहेत.
अनिल कपूर आणि श्रीदेवी
श्रीदेवी अनिल कपूरची भाभी लागते. तथापि असे असूनही दोघांनी ११ एकत्र चित्रपट केले. प्रत्येक वेळी अनिल आणि श्रीदेवीची जोडी जबरदस्त दिसत होती. यांचे एकत्र केलेले चित्रपट आहेत – लाडला, राम अवतार, कर्मा, लम्हें, हीर रांजना, मिस्टर इंडिया, मिस्टर बेचारा, जुदाई, सोने पे सुहागा आणि गुरुदेव.
ऋषि कपूर आणि नीतू सिंह
ऋषि कपूर आणि नीतू सिंह हे खऱ्या आयुष्यामध्ये पती पत्नी आहेत. या जोडीने बॉलीवूडच्या १४ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहेत आणि ते चित्रपट आहेत – धन दौलत, जहरीला इंसान, जिंदा दिल, दो दुनी चार, दुनियां मेरी जेब में, अमर अकबर एंथनी, खेल खेल में, बेशरम, कभी कभी, रफू चक्कर, झूठा कहीं का, लव आज कल, अंजाने में आणि दुसरा आदमी.
अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित
अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित या जोडीने बॉलीवूडमध्ये सर्वात जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. ह्या दोघांनी एकूण १७ चित्रपट एकत्र केले आहेत आणि ते चित्रपट आहेत – परिंदा, हिफाजत, जीवन एक संघर्ष, पुकार, राम लखन, किशन कन्हैया, प्रतिकार, जमाई राजा, दिल तेरा आशिक, खेल, बेटा, जिंदगी का जुआ, राजकुमार, धारावी, तेज़ाब, लज्जा आणि टोटल धमाल.
अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी
बॉलीवूडचा महानायक चित्रपटांची ड्रीम गर्लसोबत अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. नास्तिक, बाघबान, साधू संत, बाबुल, बुद्धा होगा तेरा बाप, त्रिशूल, वीर जारा, कौसौटी, देश प्रेमी, दो दुनी पांच, नसीब, अँधा कानून, शोले, सट्टे पे सत्ता आणि गंगा हे त्यापैकी काही खास चित्रपट आहेत.