बॉलीवुडचे प्रसिद्ध नायक मिथुन चक्रवर्ती ,पत्नी आणि मुलांसोबत आजही जगत आहे साधारण आयुष्य ….

Bollywood Entertenment

बॉलीवुड सुपरडान्सर मिथुन चक्रवर्ती पत्नी आणि मुलांसोबत अश्या प्रकारचे जगत आहे आज ही जीवन, जाणून व्हाल आश्चर्य चकित!

बॉलीवूडवर अनेक अभिनेत्यांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातुन राज्य केले. अमिताभ बच्चन, राज कपूर, राजेश खन्ना, जितेंद्र, गोविंदा, जॅकी श्रॉफ अशा अनेक सुपरस्टार यांनी आपले जीवन बॉलीवूड साठी खर्च केले.

या सर्वांमध्ये एक नाव देखील आवर्जून घेतले जाते ते म्हणजे मिथुन चक्रवर्ती यांचे. मिथुन चक्रवर्ती यांना दादा देखील म्हटले जाते. यांनी आता पर्यंत बॉलिवूड क्षेत्रात केलेली खूप मोठी कामगिरी केली आहे. अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहेत.

त्यांनी अनेक डान्स शो चे जजिंग देखील केले आहे आणि म्हणूनच मिथुन चक्रवर्ती यांना सुपर डान्सर देखील म्हटले जाते. बॉलीवूडचे सुपरस्टार व डान्स स्टार मिथुन चक्रवर्ती बॉलीवूड चित्रपट सृष्टीतील अशा अभिनेतेपैकी एक आहेत ज्यांचे नाव आजही अगदी मानाने घेतले जाते.

मिथुन चक्रवती यांना तसेच आजच्या पिढीतील स्टार देखील तितकेच मानतात. त्यांचा आदर करतात कारण की मिथुन चक्रवर्ती यांचे व्यक्तिमत्व इतकी प्रभावी आहे की नवीन जनरेशन देखील त्यांच्या प्रेमामध्ये आपोआप पडते.

 

 

विशिष्ट वय गाठल्याने आता आपल्याला मिथुन चक्रवर्ती बॉलीवूड मधील चित्रपटांमध्ये फारसे पाहायला मिळत नाही परंतु जेव्हा मिथुन चक्रवर्ती स्वतःच्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना अनेकजण पाहतात, तेव्हा त्यांच्यावर अनेक चाहते पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करू लागतात.

काही दिवसांपूर्वी मिथुन चक्रवर्ती यांचे काही फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाले होते. त्या फोटोमध्ये व व्हिडिओमध्ये मिथुन चक्रवर्ती आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना आपल्याला दिसत होते.

मिथुन चक्रवर्ती यांच्या व्यक्तीच्या जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास मिथुन हे पत्नी आणि आपल्या चार मुलांसोबत आपले साधारण जीवन जगत आहेत. आपल्या आजूबाजूला असे अनेक स्टार आहेत, ज्यांना प्रसिद्दी मिळाल्यावर ते कुणाचेच राहत नाही.

त्यांचे पाऊले जमिनीवर राहत नाही, अशावेळी ही सुपस्टार स्वतःच्या कुटुंबीयांकडे दुर्लक्ष करतात परंतु याला अपवाद मिथुन चक्रवर्ती ठरलेले आहेत. खूप सारी प्रसिद्धी प्राप्त करून देखील मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या कुटुंबीयांना दूर केले नाही.

उलट मिथुन चक्रवर्ती जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जास्तीत जास्त आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत करण्याचा प्रयत्न करत असतात. कुटुंबाची काळजी घेणे हे त्यांच्या प्रायोरिटी मध्ये सर्वात अधिक दिसून येते. मिथुन चक्रवर्ती यांनी आतापर्यंत दोन लग्न केले आहेत आणि हे दोन्हीही नाते त्यांनी अगदी जोखमीने पार पाडले आहेत.

मिथुन चक्रवर्ती सध्या आपल्या मुलांमुळे चर्चेचा विषय बनलेले आहेत, कारण की यांचे मुले हळूहळू बॉलीवूड चित्रपट इंडस्ट्रीमध्ये सक्रिय होत आहेत. मिथुन चक्रवर्ती यांचा मोठा मुलगा महाअक्षय याने बॉलीवूड क्षेत्रामध्ये पदार्पण केले आहे.

 

 

त्याचबरोबर त्यांची मुलगी दिशानी देखील लवकरच बॉलिवूड क्षेत्रामध्ये पदार्पण करणार आहे म्हणून पुन्हा एकदा मुलांच्या निमित्ताने मिथुन चक्रवर्ती मोठ्या पडद्यासमोर दिसणार यात शंका नाही तसेच यांची मुले देखील आपल्या वडिलांप्रमाणेच या क्षेत्रामध्ये आपले स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करतील असे देखील अनेकांचे म्हणणे आहे.

मिथुन चक्रवर्ती आपल्या कुटुंबीयांसोबत मोठ्या आनंदाने सुखाचे क्षण व्यतीत करत आहेत. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जास्तीत जास्त आपल्या कुठे यासोबत राहण्याचा मिथुन प्रयत्न करत असतात. मिथुन यांना चार मुले असून दोन मुले सध्या बॉलीवूड क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत.

दोन मुले आपले शिक्षण पूर्ण करत आहेत. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की, मिथुन चक्रवर्ती यांनी योगिता बाली सारख्या सुंदर अभिनेत्री सोबत आपले दुसरी विवाह रचले परंतु योगिता सोबत लग्न करण्यापूर्वी मिथुन यांचे नाव श्रीदेवी यांच्यासोबत देखील जोडले गेले होते.

या दोघांच्या चर्चा देखील एकेकाळी बॉलीवूडमध्ये रंगल्या होत्या. इतका मोठा सुपरस्टार आणि डान्सर असून देखील मिथुन चक्रवर्ती कधीही लाईम लाईट मध्ये आले नाहीत. साधी राहणी आणि उच्च विचार हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे गुण आहेत.

म्हणूनच आज ही मिथुन चक्रवर्ती यांना त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर आदर देतो आणि त्यांच्या कार्याचे नेहमी कौतुक करतो. आजही जन माणसांवर मिथुन यांची स्वच्छ प्रतिमा कोरलेली आहे आणि हीच प्रतिमा मिथुन चक्रवर्ती यांच्या यशाचे प्रतीक आहे असे म्हणायला हरकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *