टीव्ही इंडस्ट्रीमध्ये टीव्ही क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या एकता कपूरने अनेक हि’ट मालिका दिल्या आहेत. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये पडद्यावर दिसणार्या मालिकांमधील अभिनेते-अभिनेत्रींचे नाव जेवढे आहे, तेवढेच पडद्याआडून काम करणाऱ्या सर्व मालिकांच्या निर्मात्या एकता कपूरचेही नाव आहे.
हिंदी टीव्ही मालिकांच्या जगावर राज्य करणारी डेली सोप क्वीन एकता कपूरला प्रत्येकजण ओळखतो. 7 जून 1975 रोजी मुंबईत जन्मलेली एकता प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता जितेंद्र यांची मुलगी आहे. डेली सोप क्वीन एकताने केवळ छोट्या पडद्यावरच आपली मोहोर उमटवली नाही तर बॉलीवूडमध्ये देखील अप्रतिम कामगिरी केली आहे.
एकता कपूरबद्दल असे म्हटले जाते की, जे लोक तिच्याशी पंगा घेतात ते इंडस्ट्रीत टिकू शकत नाहीत. मात्र, तुम्हाला माहित आहे का की त्याच्यासोबत सर्व टीव्ही स्टार्सनी भांडण केले आहे. ही आहे त्या टीव्ही कलाकारांची संपूर्ण यादी…
रोनित रॉय :- खूप कमी वेळात आपल्या अभिनयाच्या जोरावर रोनित रॉयने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान मिळवले होतो.सोनी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या अदालत या शोमधून त्याची घरोघरी ओळख झाली. रोनित रॉयने एकता कपूरच्या “क्योंकी सास भी कभी बहू थी” आणि “कसौटी जिंदगी में” या शोमध्ये एकत्र काम केले. परंतु, रोनितने एकता कपूरची मालिका सोडली होती, पण तेव्हापासून रोनित पुन्हा छोट्या पडद्यावर झळकला नाही.
प्राची देसाई :- सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अभिनेत्री प्राची देसाई हिने छोट्या पडद्यावरील ‘कसम से’ या मालिकेत काम केले. तिने या मालिकेत सुनेची भुमिका साकारली होती. परंतु, या मालिकेत दरम्यान प्राची आणि एकता कपूरमध्ये कशावरून तरी बाचाबाची झाली. यानंतर प्राची देसाईने आजतागायत छोट्या पडद्यावर पाऊल ठेवले नाही.
राजीव खंडेलवाल ;- टेबल नंबर 21 या चित्रपटातून प्रसिद्धी झाल्याच्या नंतर राजीव आणि एकता यांच्या मैत्रीची चर्चा मनोरंजन विश्वात धुमाकूळ घालत होती. परंतु, राजीवने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, एकता कपूरच्या मदतीशिवाय मी छोट्या पडद्यावरील मालिकेत काम करू शकतो.
त्यानंतरएकेकाळी अगदी जिवाभावाची मैत्री असणारे राजीव खंडेलवाल आणि एकता कपूर यांच्या वाद झाले आणि पुन्हा कधीच राजीव पडद्यावरील कोणत्याही शोमध्ये दिसलेला नाही.
पुलकित सम्राट “क्यूंकी सास भी कभी बहू थी” या शोमधून पुलकित सम्राट याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. मात्र, पुलकित फार काळ काम करू शकला नाही. या शोदरम्यान पुलकितने एकतावर तिच्या फीबाबत अनेक गंभीर आरोप केले होते, त्यानंतर तिला शोमधून काढून टाकण्यात आले होते.
एजाज खान :- एकता कपूरच्या अनेक शो मध्ये काम करणारा एजाज खानने प्रत्येक घराघरात पोहोचून एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. परंतु, एकताची सर्वात चांगली मैत्रीण असलेली त्याची पत्नी अनिता हिच्यामुळे त्यांच्यात खटके उडाले. त्यानंतर एजाजनेही एकता कपूरशी कधीही संपर्क साधला नाही. आणि या दोघांमध्ये अंतर कायम वाढत गेले. त्यांचे भांडण आजतागायत मिटलेले नाही.