बंगळुरूचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक सध्या आयपीएल २०२२ मध्ये फॉर्ममध्ये आहे. त्याची कामगिरी पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. प्रत्येकजण त्याच्या या पराक्रमाचे कौतुक करत आहे, परंतु त्याच्यासाठी हे कधीच सोपे नव्हते. जेव्हा आपल्याच लोकांची फसवणूक केली होती.
त्याचा जिवलग मित्र आणि त्याच्या पहिल्या पत्नीने त्याचा विश्वासघा-त केला होता. यामुळे तो इतका अ-स्वस्थ झाला होता की, तो आ-त्मह-त्या करण्याचा विचार करत होता.
2007 मध्ये दिनेशने त्याची बालपणीची मैत्रीण निकिता वंजारासोबत लग्न केले होते. काही वर्षांनी निकिताचे कार्तिकचा मित्र आणि सहकारी मुरली विजयसोबत अफेअर सुरू झाले. ती मुरलीच्या मुलाची आई होणार होती.
ही गोष्ट कार्तिक वगळता तामिळनाडूच्या सर्व खेळाडूंना माहीत होती. अचानक एक दिवस निकिताने कार्तिकला हे सत्य सांगितले आणि घ-टस्फो-ट घेण्यास सांगितले.
2012 मध्ये निकिताने कार्तिकपासून घ-टस्फो-ट घेतला आणि मुरली विजयसोबत लग्न केले. मुरलीने आयपीएलमध्ये चेन्नईसाठी चमकदार कामगिरी केली. त्याचवेळी कार्तिकची कामगिरी सातत्याने घसरू लागली. त्याला संघातून वगळण्यात आले. खराब फॉर्ममुळे त्याच्याकडून तामिळनाडू संघाचे कर्णधारपद हिसकावून मुरली विजयकडे देण्यात आले.
कार्तिक डिप्रेशनमध्ये गेला. तो आपल्या जीवनाने इतका अ-स्वस्थ झाला की, त्याने आ-त्मह-त्या करण्याचा विचार सुरू केला. नंतर दीपिकाच्या आगमनाने सर्व काही बदलले. दिनेश कार्तिकने 2015 मध्ये दीपिका पल्लीकलसोबत लग्न केले. दीपिकाने गेल्या वर्षी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे.
तुम्हाला काय वाटते कार्तिक च्या पहिल्या पत्नीने आणि त्याच्या मित्राने फसवले हे बरोबर केलं होत का? या धोक्यामुळे तो पूर्णपणे खचून गेला होता.पण कसा तरी स्वतःला सावरून त्याने त्याचा करिअरकडे लक्ष दिल आणि आता तो एक चांगला क्रिकेटर बनला आहे. हा लेख वाचून तुम्हाला काय वाटते? हे आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा.