असं म्हटलं जात की माणुस किती श्रीमंत आहे हे बघितल जात नाही तर तो किती माणुसकीचा आहे हे बघितल जात. पण या कलियुगात माणसाला माणुसकीचा माणुस मिळन अवघड झालं आहे. जसे सर्व सामान्य मानसांच्यात होत अगदी तसच बाॅलिवूड इंडस्ट्रीत देखील आहे. काही कलाकार त्यांच्या सुंदर दिसण्यामुळे चर्चेत असतात. तर काही कलाकार त्यांचा विकृत किंवा तापट स्वभावामुळे चर्चेत असतात. अशाच बाॅलिवूड इंडस्ट्रीतील अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या वाईट वागणूकीमुळे चर्चेत आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याबद्दल..
शिल्पा आनंद:- ‘दिल मिल गये’ या मालिकेतील आपल्या निरागस अभिनयाने प्रचंड प्रेक्षकांच्या मनात घर करून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री शिल्पा आनंदला लोकांचे भरभरून प्रेम मिळाले. प्रेक्षकांना शिल्पाच्या सौंदर्याचे वेड लागले होते. पण सेटवर शिल्पाची अतिशय घानेरडी होती. लहानसहान गोष्टींवरून शिल्पाचे कोणाशीही सारखे भांडण होत असल्याचं बोललं जातं. यामुळे तिला काम मिळणे बंद झाले आणि ती बेरोजगार झाली. शिल्पा सध्या इंडस्ट्रीपासून दूर आहे.
अस्मिता सूद:- अभिनेत्री अस्मिता सूदने टीव्ही आणि चित्रपट सृष्टीतील प्रचंड नाव कमावले आहे. 2011 मध्ये अस्मिता सूनने टॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 2016 मध्ये ती ‘फिर भी ना माने बदलमीज दिल’ या हिंदी मालिकेत म्हत्वाची भुमिका साकारताना दिसली होती. तिच्याबद्दल असं म्हटलं जातं की, अस्मिता सेटवरील कर्मचाऱ्यांशी किंवा इतर लोकांशी चांगली वागत नव्हती.
शायनी दोसी:- टीव्ही अभिनेत्री शायनी दोसी अनेकदा तिच्या वागण्यामुळे चर्चेत येत असते. माध्यमातील वृत्तानुसार, शायनी अनेक वेळा तिच्या कॉस्टार्ससोबत वा’द घालत आहे. ‘सरस्वती चंद’ या मालिकेच्या शूटिंगदरम्यान त्याचा जेनिफर विंगेटसोबत प्रचंड वा’द झाला होता. या वागणुकीमुळे आता ती बेरोजगार झाली आहे. तसेच तिचा बाॅलिवूडमधील पत्ता कट होण्याच्या मार्गावर आहे.
अंकिता लोखंडे:- अंकिता लोखंडेने आता दूरचित्रवाणीद्वारे चित्रपटसृष्टीत आपले स्थान पक्के केले असून तिने चाहत्यांच्या मनात एक विशेष स्थान मिळवले आहे. अंकिताने आपल्या करिअरची सुरुवात ‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेमधून केली होती. या मालिकेतील तिच्या पात्राला लोकांनी खूप पसंती दिली. या शोमध्ये तिची कॉस्टार आशा नेगीसोबत वा’द झाला होता.
निया शर्मा:- टेलिव्हिजनची हॉट अभिनेत्री निया शर्माने तिच्या करिअरची सुरुवात ‘काली एक अग्नि परीक्षा’मधून केली होती. त्यानंतर ती ‘खतरों के खिलाडी’मध्येही दिसली. ‘इक हैजार में मेरी बहना’मधली तिची भूमिका प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालणारी होती. ‘जमाई राजा’मध्ये रवी दुबेच्या विरुद्ध नियाने काम केले होते. या सीरियलच्या शूटिंगदरम्यान तिचे रवीसोबत अनेकदा भांडण झाल्याचे म्हटले जाते.