एकेकाळी राजेश खन्नाच्या घरी एसी रिपेअर करण्यासाठी गेले होते इरफान खान.बघा

Bollywood

अभिनेता इरफान खानच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. त्यामुळेच की काय कॅन्सरसारख्या रोगावर मात करुन रुपेरी पडद्यावर कमबॅक करणाऱ्या इरफानची साऱ्यांनाच प्रतीक्षा होती. कॅन्सरवर मात केल्यानंतर इरफाननं शुटिंगला सुरुवात केली तेव्हापासूनच त्याच्या कमबॅक सिनेमाची रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती.

बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता इरफान खानचा चित्रपट इंग्लिश मीडियम 13 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता . चित्रपटाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर बरीच चर्चा बनवली होती आणि आता चित्रपटाविषयी चाहत्यांमध्येही खळबळ उडाली आहे. हा चित्रपट हिंदी माध्यमाचा सिक्वेल असून चाहत्यांना चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. तब्येत खराब असूनही इरफानने केलेले काम प्रशसनीय आहे.

इरफान खान आज कदाचित सुपरस्टार असेल पण तुम्हाला माहिती आहे काय की तो पूर्वी एअर कंडिशनर दुरुस्त करण्याचे काम करत असे. इरफानचा आगामी सिनेमा रिलीज होण्यापूर्वी चला तुम्हाला एक मजेशीर किस्सा सांगू.

आयएमडीबीच्या म्हणण्यानुसार इरफान खानबद्दल एक किस्सा आहे की तो एकदा एअर कंडिशनर ठीक करण्यासाठी एकदा राजेश खन्नाच्या घरी गेला होता. इरफानच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये दोनदा R येते. परंतु आपणास माहित आहे का त्यामागे कोणते अंकशास्त्र नाही. वास्तविक इरफानला त्याच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये दोनदा आर बोलताना येणारा आवाज आवडतो.

यामुळेच इरफानने स्वत: च्या नावाचे स्पेलिंग बदलले आहे. इरफान त्या सितारांपैकी एक आहे ज्यांच्यासाठी त्याचे कार्य आणि प्रतिबद्धता महत्त्वाची आहे. इरफान खानच्या बाबतीत ही कहाणी खूप प्रसिद्ध आहे की त्याने एकदा क्रिस्तोफर नोलनची भूमिका नाकारली कारण तो लंच बॉक्स आणि डी-डेमध्ये काम करत होता.

इरफानच्या अभिनयात एक वेगळीच सहजता आहे. रसिकांना खळखळून हसवणं आणि हसता हसता रसिकांच्या डोळ्यात टचकन पाणी आणण्याची किमया इरफानसारखा समर्थ अभिनेताच करु शकतो. चेहऱ्यावरील हावभाव आणि रुपेरी पडद्यावरील त्याचा सहजसुंदर वावर रसिकांना मोहून टाकतो.

मध्यमवर्गीय मुलांचं परदेशात शिक्षणाचं स्वप्न हा विषय केंद्रस्थानी ठेवून अंग्रेजी मीडियम या सिनेमाची कथा मांडण्यात आलीय. भारतातही चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळू शकतं त्यासाठी परदेशातच जाण्याची गरज नाही हा विषय मांडण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न असल्याचे दिसतं. परदेशातील शिक्षण वाईट नसून देशातील शिक्षणाद्वारे चांगलं करिअर बनू शकतं हे सांगण्याचा प्रयत्न सिनेमातून करण्यात आलाय.

तरुण पीढीच्या आधुनिक मतांचा आदर करत भारतीय मूल्यं समजावण्याचा दिग्दर्शक प्रयत्न करतो. एक गंभीर संदेश हलक्याफुलक्या पद्धतीने मांडताना बाप-लेकीच्या नात्यातील हळूवारपणा भावनिक पैलू सिनेमात दाखवण्यात आलेत. कथेच्या पातळीवर अंग्रेजी मीडियम सिनेमाच्या कथेत काही दम वाटत नाही. अनेक सिनेमाची कथा भटकते. मात्र क्लायमॅक्स सिनेमाला काहीसा सावरतो. ज्यांनी इरफानचा हिंदी मीडियम हा सिनेमा पाहिलाय त्यांना अंग्रेजी मीडियम हा सिनेमा फारसा भावणार नाही त्यामुळेच की चांगली कॉमेडी आणि दमदार अभिनय असूनही सिनेमा फारसा प्रभाव टाकत नाही.

इरफान खान बऱ्याच काळानंतर रुपेरी पडद्यावर परतला आहे. मात्र त्याचा अभिनय आधीसारखाच प्रभावी आणि दमदार आहे. आपल्या अभिनयाने इरफानने साकारलेला चंपक हसवतो रडवतो कधी भावनिक करतो तर कधी रसिकांचं तुफान मनोरंजनही करतो. दीपक डोबरियालनं इरफानचा भाऊ गोपी मोठ्या खुबीने साकारलाय. त्याचा कॉमिक डायमिंग रसिकांची विशेष दाद घेऊन जाते. इरफान आणि गोपी जेव्हा स्क्रीनवर एकत्र दिसतात त्यावेळी रसिकांचं तुफान मनोरंजन होतं.

राधिका मदान हिने तरुच्या भूमिकेला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः इरफान खानसह रुपेरी पडद्यावरील बाप-लेकीची केमिस्ट्री खास वाटते. पंकज त्रिपाठी आणि किकू शारदा यांनीही त्यांच्या वाट्याला आलेल्या छोट्या छोट्या भूमिकेत आपल्या अभिनयाने चारचाँद लावलेत. करीना कपूर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत असून तिने त्याला त्या पद्धतीने न्याय दिलाय. डिंपल कपाडियासुद्धा छोट्याशा भूमिकेतूनही रसिकांवर प्रभाव पाडण्यात यशस्वी होतात. इतर कलाकारांनीही छोट्या छोट्या भूमिकांना पुरेपूर न्याय दिलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *