“तू फक्त कपडे घाल आणि लवकर ये…”, रोहित शेट्टी कँटरीनावर संतापला…बघा काय झाले पुढे

Uncategorized

कँटरीना कैफ रोहित शेट्टीला सेटवर अनेक बाबींबद्दल सतत काही ना काही प्रश्न विचारत असल्यामुळे दिग्दर्शक रोहित शेट्टी तिच्यावर चांगलाच भडकल्याचे वृत्त समोर आले आहे. कँटरीनाच्या या सततच्या प्रश्नांमुळे आपल्याला बराच म-नस्ताप झाला असल्याचे रोहितने म्हंटले आहे. सूर्यवंशी या चित्रपटाच्या शु-टींग दरम्यान सेटवर काम करत असताना आलेल्या अनुभवांबद्दल एका मुलाखतीमध्ये बोलताना रोहित म्हणाला.

रोहित शेट्टी दिग्दर्शित अॅक्शन सीनचा भरणा असलेला सूर्यवंशी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या सिम्बा या चित्रपटाप्रमाणेच हा चित्रपट देखील पोलिसांवर आधारित असणार आहे. या चित्रपटामध्ये तब्बल ९ वर्षानंतर कँटरीना आणि अक्षय एकत्र काम करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

तर कँटरीना पहिल्यांदाच दिग्दर्शक रोहित शेट्टी सोबत काम करणार आहे. याचसंदर्भात नुकतेच एका मुलाखतीमध्ये रोहित शेट्टीने कँटरीनावरच राग जगजाहीर केला. रोहितने केलेल्या या वक्तव्याची चर्चा सध्या सोशल मिडियावर चांगलीच रंगली आहे.

रोहितचा चित्रपटमध्ये ड्रामा, अॅक्शन, स्टं-ट, गाड्या, रंगेबीरंगी असा भरणा असलेला चित्रपट असतो हे सर्वांना चांगलेच माहित झाले आहे. रोहित शेट्टीच्या चित्रपटांचा एक आराखडा ठरलेला असतो तो दिग्दर्शक करण जोहरप्रमाणे मोठ-मोठे सेट, भरजरीत कपडे यावर जास्त भर देत नाही. परंतु ह्यावेळी कँटरीन मात्र रोहितसोबत काम करताना आपल्या कपड्यांच्या बाबतीत विशेष काळजी घेताना दिसली. कँटरीनाच्या याच वागण्यामुळे मला खूप कंटाळा यायचा आणि त्यामुळे चीडचीड व्हायची असे रोहितनं म्हंटले आहे.

रोहित काय म्हणाला :-  शु टींगदरम्यानचा एक किस्सा सांगताना रोहितने कँटरीनाच्या सततच्या प्रश्न विचारण्यावर नाराजी व्यक्त करत म्हणाला कि, ती या चित्रपटामध्ये एका डॉक्टरची भूमिका करत आहे. तिला या चित्रपटातील एका सीनसाठी सलवार कमीज घालण्यास सांगितले होते.

त्यावर कँटरीना सारखी प्रश्न विचारू लागली कि, हे योग्य दिसेल का?, सलवार कमीज कसं वाटेल ते? आणि मला जास्त विचार करण्यात जरासुद्धा रस नाही. आणि एका ठराविक वेळेनंतर मी उत्तर देत बसत नाही.

या प्रश्नांनंतर तिने पुन्हा मला प्रश्न विचारला कि, करड्या रंगाचा सलवार कमीज चांगला दिसेल का? यावर मला सं ताप अनावर झाला नी मी जोरात म्हणालो, अगं बाई तो सलवार कमीज आहे आणि तू एका डॉक्टरच्या भूमिकेत आहेस. तो कोणत्या रंगाचा आहे याने काही फरक पडत नाही.

तू तो घाल आणि सेटवर लवकर ये. या सर्व गोष्टींचा खुलासा रोहितने नो फिल्टर नेहा या कार्यक्रमामध्ये बोलताना केला. सूर्यवंशी हा चित्रपट मध्यवर्गीयांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट असून त्यामध्ये जरी कपड्यांना महत्व असले तरी कोणता रंग असावा याचा विचार करण्याची काही गरज नाही असे रोहितला वाटते.

तिने हे कसे दिसेल? ते कसे दिसे? रंग चांगला दिसेल का? असे प्रश्न विचारले कि मी तिला तू केवळ कपडे घाल आणि आणि सेटवर ये असे सांगायचो असे रोहित पुढे सांगताना म्हणाला.

कँटरीनाची निवड कशी करण्यात आली? :-  कँटरीनाची निवड कशी करण्यात आली? या प्रश्नावर उत्तर देताना रोहित म्हणाला कि, या भूमिकेसाठी मला तीच योग्य वाटत होती. हे सगळे अचानक घडले. कँटरीनालाहि माझ्यासोबत काम करायचे होते. त्यामुळे तिची निवड करण्यात आली. या चित्रपटासाठी तिचे वय आणि कथेला ती साजेशी असल्यामुळे मी तिला चित्रपटामध्ये घेतले.

बॉलीवूडमध्ये सूर्यवंशी या चित्रपटाची खूप चर्चा होताना दिसत आहे. रोहित शेट्टी त्याच्या सर्व चित्रपटांच्या शेवटी आपल्या आगामी चित्रपटाची माहिती देत असतो. सिम्बा चित्रपटाच्या शेवटी रोहितने सूर्यवंशी चित्रपटाची घोषणा केली होती. त्यामध्ये सिंघमची भूमिका साकारणारा अजय अक्षयसोबत फोनवर संवाद साधताना दाखवण्यात आला होता.

त्यामुळे रोहितच्या सूर्यवंशी चित्रपटामध्ये अजय, अक्षय आणि रणवीर हे तीन दिग्गज अभिनेते दिसणार असा अंदाज लावण्यात आला होता. हा चित्रपट २७ मार्च रोजी रिलीज करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *