बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि गौरी खान यांची मुलगी सुहाना खानने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले नाही. तरीही ती खूप लोकप्रिय आहे. सुहाना खान तिच्या स्टाईल आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. सुहाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे, ती झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे.
चित्रपट रिलीज होण्यापूर्वी सुहाना खानची बदललेली स्टाइल पाहायला मिळाली, ज्यामुळे ती चर्चेत आहे. शाहरुख खानची पत्नी गौरी खान ‘कॉफी विथ करण 7’ मध्ये दिसणार असल्याची घोषणा झाल्यापासून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता गौरी खान स्पेशलचा प्रोमोही रिलीज झाला आहे. ‘कॉफी विथ करण 7’ चा हा नवीन प्रोमो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
गौरी खान करण जोहरच्या शोमध्ये महीप कपूर आणि चंकी पांडेची पत्नी भावना पांडेसोबत दिसणार आहे. ‘कॉफी विथ करण 7’ मध्ये गौरी खानची एक झलक प्रोमोमध्ये दिसत आहे. कॉफी विथ करण 7 च्या प्रोमोमध्ये, जेव्हा करण जोहरने गौरी खानला विचारले की, ती मुलगी सुहाना खानला कोणत्या डेटिंग टिप्स देऊ इच्छित आहे. यावर गौरी खान म्हणते की, सुहानाने कधीही दोन मुलांना एकत्र डेट करू नये.
हे ऐकून सगळे हसायला लागतात. सुहाना खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. झोया अख्तरच्या ‘द आर्चिज’ या चित्रपटातून ती फिल्मी दुनियेत पदार्पण करत आहे. या चित्रपटात बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर देखील दिसणार आहे. बॉलिवूडमध्ये अनेकदा ‘नेपोटिझम’ची चर्चा होते. ‘स्टार किड्स’ आपापल्या परीने स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तर्कवितर्क लावत आहेत.
मात्र शाहरुख खानची पत्नी गौरी खानने आपल्या करिअरमधील सर्वात मोठी समस्या ‘शाहरुख खानची पत्नी’ असणं हीच सांगितली आहे. ऐकायला विचित्र वाटेल पण गौरी खानने कॉफी विथ करणच्या एका भागात हे सांगितले आहे. करण जोहरच्या या शोमध्ये गौरी खान पती शाहरुख खानच्या सर्वात वाईट सवयींचा खुलासा करताना दिसणार आहे. करण जोहर म्हणतो की, शाहरुख खान जेव्हाही त्याच्या घरी पार्टी करतो.
तेव्हा तो उत्तम होस्टची भूमिका करतो. तो पाहुण्यांना त्यांच्या गाडीपर्यंत सोडतो. हे ऐकून गौरी खान म्हणते की, शाहरुखची ही सवय लोकांसाठी अनमोल असली तरी ती यामुळे अस्वस्थ होते. गौरी खान म्हणते की, शाहरुख नेहमी पाहुण्यांना त्याच्या कारमध्ये सोडतो. ‘कधीकधी मला असे वाटते की तो घराबाहेर पार्ट्यांमध्ये जास्त वेळ घालवतो. मग लोक त्याला पार्टीत शोधू लागतात.
आमची पार्टी घरी न होता रस्त्यावर होत आहे असे मला वाटते. शाहरुखसोबतच्या तिच्या प्रेमकथेला ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ असे नाव द्यायचे आहे, कारण त्यांच्या प्रेमाची आणि लग्नाची कथा सारखीच आहे, असेही गौरी खानने खुलासा केला. त्याचबरोबर गौरी खान लवकरच तिचा नवीन शो ‘ड्रीम होम्स विथ गौरी खान’ घेऊन येत आहे. या शोमध्ये ती स्वत: डिझाईन केलेली सेलिब्रिटींची घरे दाखवणार आहे आणि सांगणार आहे.
View this post on Instagram