आज आम्ही तुम्हाला त्या बॉलिवूड स्टार्सविषयी सांगणार आहोत ज्यांनी आपला साखरपुडा गाठला होता पण काही कारणास्तव दोघांचे लग्न झाले नव्हते, असे अनेक वेळा पाहिले गेले आहे की जेव्हा दोन लोक एकमेकांना डे ट करतात .
तेव्हा एकमेकांना खूपच आवडत असतात आणि लग्नही करायच असत. पण हळू हळू त्यांना जाणवलं की हे दोघेही एकमेकांसाठी परफेक्ट मॅच नाहीत आणि असेच या स्टार्स बरोबरही असं काहीतर घडलं आहे.
करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन :- २००२ साली करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन एकमेकांना डेट करत होते आणि अभिषेकच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या दोघांच्या साखरपुड्यामुळे हा क्षण आणखी संस्मरणीय झाला पण काही वर्षानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. आजपर्यंत दोघांचे ब्रेकअप कशामुळे झाले हे कुणालाही माहित नाही.
रवीना टंडन आणि अक्षय कुमार :- रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांनी बर्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आणि असेही म्हटले जाते की हे दोघांचा मंदिरात साखरपुडा झाला होता. परंतु या दोघांनीही आपल्या करिअरमुळे हि बातमी बाहेर येऊ दिली नाही, परंतु ‘खिलाडियों का खिलाडी या चित्रपट दरम्यान दोघांचा ब्रेकअप झाला होता. रवीना असे म्हणाली की लग्नानंतर अक्षयला मी चित्रपटांत काम करावं असं वाटत नव्हतं.
संगीता बिजलानी आणि सलमान खान :- सलमानच्या आयुष्यात बर्याच मुली आल्या आहेत आणि त्यापैकी एक संगीता आहे असे मानले जाते की या दोघांचाही साखरपुडा झाला होता. सलमानला संगीता खूप आवडत होती आणि तिच्याशी लग्न करण्याचे स्वप्न पाहत होता. लग्नाची तारीख देखील कन्फर्म झाली होती. परंतु काही कारणास्तव त्या दोघांचा ब्रेकअप झाला.
गौहर खान आणि साजिद खान :- गौहर खान वर्ष 2003 मध्ये चित्रपट निर्माते साजिद खानला डेट करत होती, या दोघांचा साखरपुडा झाला होता, परंतु काही गैरसमजांमुळे त्यांचे लग्न मोडले एका मुलाखतीत साजिदने सांगितले की त्याने कोणाबरोबर तरी लग्न केले आहे.
गुरप्रीत गिल आणि विवेक ओबेरॉय :- चित्रपटांमध्ये करिअर सुरू करण्यापूर्वी विवेकने मॉडेल गुरप्रीत गिलशी लग्न केले, परंतु आयुष्यात व्यस्त राहिल्यामुळे या दोघांचे नाती तुटले आणि अखेर त्यांचे सं बंध तुटले.
बरखा बिष्ट आणि करणसिंग ग्रोव्हर :- करण अनेक अभिनेत्रींशीही संबंधित आहे, त्याने आतापर्यंत तीन विवाहसोहळे केले आहे, पण करणसिंग ग्रोव्हरची पहिला साखरपुडा बरखा बिष्ट सोबत झाला होता. दोघेही 2004 मध्ये “दिल मिल गया” शो दरम्यान भेटले होते. एंगेजमेंट पण झाली होती पण दोन वर्षानंतर दोघेही वेगळे झाले.