Breaking News

चित्रपटशृष्टि मधील ह्या हसीनाची मुलगी आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री, नाव बघूननाही होणार विश्वास …

बॉलिवूड इंडस्ट्रीत असे बरेच लोक आहेत ज्यांनी लोकांच्या मनावर राज्य केले. परंतु जेव्हा हे तारे हे जग सोडून जातात तेव्हा त्यांच्या चाहत्यांना देखील त्यांची खूप आठवण येते.

कोणाचाही यावर विश्वास नसतो की आपला आवडता तारा यापुढे या जगात नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिने आईची भूमिका सलमान खानच्या चित्रपटात केली आणि छोट्या पडद्यावर बरीच प्रसिद्धीही मिळवली.

ज्या अभिनेत्रीबद्दल आपण बोलत आहोत ती म्हणजे रीमा लागू. रीमा लागूने चित्रपटांपासून ते टीव्ही मालिकांपर्यंत बऱ्याच ठिकाणी काम केले आहे. पण गेल्या वर्षी वयाच्या 59 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. पण आजही त्यांचे चाहते त्यांच्यावर प्रेम करतात.

रीमा लागू यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लोकांची मने जिंकली. आपल्या कष्टाच्या जोरावर त्यांनी हे उच्च स्थान मिळवले. हे पद मिळविण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. रीमा यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती आणि तिने अगदी लहान वयातच फिल्मी जगात प्रवेश केला होता. बाल कलाकार म्हणून त्यांनी 9 चित्रपट केले होते.

रिमा लागू याांनी आपल्या करियरची सुरूवात मराठी चित्रपटातून केली होती. कित्येक वर्ष त्यांनी मराठी नाटकात काम केले. त्यानंतर त्यांनी बॉलिवूड व मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.


रिमा यांनी हम साथ साथ है, कुछ कुछ होता है, मैंने प्यार किया व कल हो ना हो यांसारख्या चित्रपटात भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केलंय.

चित्रपटांशिवाय रिमा लागू खऱ्या आयुष्यात मॉर्डन आई होती. चित्रपटात काम करीत असताना त्यांची प्रसिद्ध मराठी अभिनेते विवेक लागू यांच्याशी भेट झाली. त्यानंतर काही वर्षांनंतर रिमा लागू व विवेक लागू यांनी लग्न केलं.

त्यांना एक मुलगी आहे जिचं नाव मृण्मयी आहे. मराठी टीव्ही संकेतस्थळाच्या वृत्तानुसार त्यांनी अभिनयाचा अभ्यासदेखील पूर्ण केलेला नव्हता. रीमा लागू यांची मुलगी मृणमयी ही अभिनेत्री आहे.

चित्रपटांव्यतिरिक्त मृणमयी राठी हिने टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. जरी ती हिंदी चित्रपटांमध्ये अजून दिसली नाही. मृण्मयीने 3 इडियट्स या चित्रपटात आमिर खानला असिस्ट केले होते.

मृण्मयीलाही तिच्या आईप्रमाणेच बॉलिवूडमध्ये बरेच यश मिळवायचे आहे. ती लवकरच बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. मृण्मयी मराठी चित्रपटांमध्ये खूप सक्रिय आहे आणि आता ती टीव्ही शोमध्येही दिसणार आहे.

मृण्मयी खूपच सुंदर दिसते आणि सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव आहे. मृण्मयी काही ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत राहिली आहे. मृण्मयीने निवडक हिंदी आणि मराठी सिनेमांत अभिनय केला आहे.

मुक्काम पोस्ट लंडन सातच्या आत घरात बयो दोघांत तिसरा आता सगळं विसरा या मराठी सिनेमांमध्ये तिने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. बयो या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा झी गौरव पुरस्कार मिळाला आहे. मृण्मयी दिग्दर्शिका म्हणूनही नावारुपास येत आहे.

आमिर खानच्या सत्यमेव जयते राजकुमार हिराणींच्या थ्री इडियट्स आमिर खान स्टारर तलाश या सिनेमांसाठी तिने सहायक दिग्दर्शिका म्हणून काम केले आहे. मृण्मयी स्वतः एक अभिनेत्री असून पडद्यामागेसुद्धा तिचा वावर आहे.

सहायक दिग्दर्शक म्हणून कार्यरत असलेले विनय वायकुळ यांच्यासोबत मृण्मयीचे नुकतेच लग्न झाले आहे. मुंबईत हा लग्नसमारंभ पार पडला होता. विनय वायकुळ यांनी थ्री इडियट्स स्वदेश भाग मिल्खा भाग गजनी हनीमून ट्रॅव्हल्स प्रा. लि. बस एक पल शिखर या सिनेमांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

मृण्यमी आणि विनयला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा द्यायला मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार त्यांच्या लग्नात सहभागी झाले होते. अभिनेते बोमन इराणी अभिनेत्री निर्मिती सावंत रमेश भाटकर विजय पाटकर प्रदीप वेलणकर प्रशांत दामले यांची विशेष उपस्थिती लग्नात होती.

 

About admin

Check Also

भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्लाने ब्लॅक ब्रालेट घालून केला से’क्सी डान्स, एक्ट्रेसच्या हॉ’टनेसने चाहत्यांच्या पारा चढला ..

आपल्या सर्वांना माहितीच आहे की, भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल असते. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *