हिंदू ध-र्मामध्ये माता लक्ष्मी देवीला संपत्तीची देवी मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीने माता लक्ष्मी आणि कुबेर यांचे मनापासून स्मरण केल्यास आणि त्यांच्या नावाची पुजा केल्यास, महालक्ष्मी त्यांच्या आयुष्यात आनंद आणि भरभराट करते. याशिवाय तुम्ही ब्रह्मवैवर्त पुराण वाचल्यास त्यामध्ये अशा बर्याच गोष्टी सापडतील ज्या केल्याने तुमचे नशीबच चमकेल.
अनेकदा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याच्या नादात काही लोक माता लक्ष्मीला दु:ख पोहचवतात. यामुळे माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर नाराज होते आणि त्याच्या बदल्यात त्या व्यक्तीला कमी धन प्राप्त व्हावे यासाठी शा प देते. इतकेच नाही तर याचा परिणाम आपल्या घरातील मुलांना आणि लोकांनाही सहन करावा लागू शकतो.
आज आम्ही तुम्हाला अशा ८ सवयीबद्दल सांगणार आहोत ज्या माता लक्ष्मीला जराही आवडत नाहीत. म्हणून जर तुम्हाला यापैकी कोणतीही सवय असेल तर आजच ती सवय सोडून द्या. तर चला पाहूया त्या ८ सवयी कोणत्या आहेत.
या सवयीमुळे माता लक्ष्मी नाराज होते:- १) पूजेच्या वेळी तुम्ही बऱ्याचदा पाहिले असेल की पुष्कळ लोक देवाच्या मूर्ती व उपासनेचे साहित्य जमिनीवर ठेवतात. जरी पृथ्वीला खूप पवित्र मानले जात असले तरी पण पूजेशी सं-बंधित असलेल्या वस्तू आणि मूर्ती जमिनीवर ठेवू नका. जर तुम्हाला ती मूर्ती जमिनीवर ठेवायचीच असेल तर प्रथम जमिनीवर स्वच्छ पाट किंवा स्वच्छ कपडा अंथरा.
२) आपल्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगू इच्छीतो की मावळता सूर्य आणि चंद्र पाहणे अशुभ मानले जाते. म्हणूनच असे केल्याने केवळ माणसाचे आ-रोग्यच बिघडू शकत नाही तर त्याच्या घरात पैशाचीही कमतरता भासू शकते.
३) रविवारी चुकुनही काचेच्या भांड्यात अन्न खाऊ नका. काचेचे भांडे रविवारच्या दिवशी अशुभ मानले जाते तसेच ते आपल्या कुटूंबाच्या प्रगती आणि सन्मानास इजा पोहोचवू शकते.
४) जेव्हा आपण बाहेरून घरी परत येता तेव्हा आपले पाय शुद्ध आणि स्वच्छ पाण्याने धुवा. कारण असे केल्याने बाहेरील सर्व वाईट शक्ती धूळ नष्ट होतील आणि तुमच्या घरात प्रवेश करणार नाहीत.
५) शा-रीरिक सं-बंध बनवणे ही सर्वांची महत्वाची गरज आहे. परंतु दिवस मावळताना किंवा दिवसा दरम्यान शा-रीरिक सं-बंध करणे अशुभ मानले जाते. असे केल्याने माता लक्ष्मी देवी नाराज होते. त्यामुळे कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
६) बर्याच मुलांना मुलींना किंवा महिलांना पाहण्याची सवय असते. परंतु आपल्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगू इच्छीतो की कोणत्याही व्यक्तीने चुकुनही परक्या स्त्री कडे पाहू नये. ध-र्मग्रंथानुसार अशा पुरुषांना राक्षस मानले जाते. अशा व्यक्तींवर माता लक्ष्मी कधीही संपत्तीचा साठा येऊ देत नाही.
७) मुलींना घराची लक्ष्मी समजली जाते अशा परीस्थित जर घरात मुलीने किंवा स्त्रीने अशांतता पसरवल्यास किंवा भांडन केल्यास तेथे गरीबी येते आणि पैशांची कमतरता भासू लागते.
८) वडिलधाऱ्या माणसांचा देवा समान आदर केला पाहिजे. परंतु ज्या घरात वृद्ध व्यक्तींचा महिला किंवा पाहुण्यांचा अपमान केला जातो तेथे माता लक्ष्मी देवी कधीही संपत्तीची भरभराट होण्यासाठी आशीर्वाद देत नाहीत.