रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे दोघेही 14 एप्रिल रोजी विवाहबद्ध झाले आहे. दोघांचे लग्न परिवार आणि मित्र परिवाराच्या संमतीनेआणि आशिर्वा-दाने झाले आहे. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा विवाह १४ एप्रिल रोजी झाला. दोघांच्या लग्नाची चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट बघत होते आणि शेवटी त्यांची इच्छा पूर्ण झाली . 5 वर्षांच्या नात्यानंतर हे जोडपे पती-पत्नी बनले आहे. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. चाहत्यांपासून मोठमोठ्या सेलिब्रेटीं पर्यंत सर्व रणबीर आणि आलियाला शुभेच्छा देत आहेत. लग्नात दोघांनी ऑफ-व्हाइट आउटफिट परिधान केले होते, दोघांचा रॉयल लुक खूप छान दिसत होता लग्नांतर प्रत्येक जोडपे हनीमूनला जातात. तसेच प्रत्येक सेलिब्रिटी पण ब्रेक घेऊन हनीमूनला जातात.
हनिमूनला कुठे जाणार :- तर मग रणबीर आणि आलियाच्या लग्नाचा प्रसंग येतो, मग सगळ्यांनाच त्यांच्या हनिमूनला कुठे जात हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे. रिपोर्टनुसार दोघेही त्यांच्या आवडत्या जागी जाण्याची योजना बनवलेली आहे असे समजले आहे. या जागेवर दोघे आधी जाऊ आले आहे आणि एकमेकांसोबत रोमँटिक वेळ घालवला आहे. पण तेव्हा ते दोघे बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड होते. आणि ती जागा दक्षिण आफ्रिका आहे. तिथे दोघांनी नवीन वर्ष साजरे केले होते. दोघानी पूर्वीप्रमाणे इथे सफारीचा आनंद घेणार आहे.
चला तर बघू मग ही गोष्ट किती खरी आहे.दोघे हनीमून ला गेले तर नक्की काय आहे हे कळून जाईल.तसे, असे देखील होऊ शकते की दोघेही हनीमूनला जाणार नाहीत. कारण काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की दोघांकडे अजून खूप काम आहे आणि आपापले प्रोजेक्ट पूर्ण केल्यानंतरच दोघे हनिमूनला जाणार आहेत.
आलियाने स्वतः लग्नाचे फोटो शेअर केले होते. फोटो शेअर करताना आलियाने लिहिले की, “आज, आमच्या कुटुंबात आणि आमच्या दोघांमध्ये, घरी, जे आमचे आवडते ठिकाण आहे – बाल्कनी जिथे आम्ही आमची ५ वर्षे नात्यात घालवली आणि आज आम्ही लग्न केले आहे.
आलियाने असेही लिहिले आहे की, “आता आम्ही एकत्र आणखी आठवणी बनवण्यास उत्सुक आहोत ज्यात खूप प्रेम, हसणे, आरामदायी शांतता, चित्रपट रात्री, मूर्ख मारामारी, वाईन डेट्स आणि चायनीज खाणे इतके असतील. इतके प्रेम आणि आनंद दिल्याबद्दल आमच्या या विशेष क्षणाबद्दल अजून विशेष बनवले आहे. या सर्वांनी आमचा क्षण अधिक खास बनवला.
तुम्हाला आलीय आणि रणबीर यांची जोडी आवडते का? हा लेख वाचल्यानंतर काय वाटते आलीया आणि रणबीर हनीमूनला कुठे जातील? आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा.