प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर तिच्या प्रेग्नेंसीबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होती. आता बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर शनिवारी सोनम कपूर आई झाली आहे. सोनम आणि आनंद आहुजा यांना शनिवारी २० ऑगस्ट रोजी मुलगा झाला. आहुजा-कपूर कुटुंबामध्ये त्यामुळे अतिशय आनंदाचं वातावरण आहे. सोनम कपूर तिच्या फॅशनसेन्समुळे सतत चर्चेत असते. सोनम कपूरने नुकताच एका मुलाला जन्म दिला आहे.
दरम्यान, सोनमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साधारणपणे गरोदरपणात प्रत्येक महिलेची त्वचा कोरडी दिसू लागते. पण या काळात त्वचा सुंदर आणि टवटवीत दिसण्यासाठी सोनम तिच्या आहारात या तिन गोष्टींचा समावेश करत होती. या काळात एकीकडे हार्मो’न्समध्ये बदल होत असतात. त्यामुळे महिलांच्या रंग आणि रूप देखील बदलते.
दुसरीकडे या काळात काही महिलांचे लक्ष केवळ त्यांच्या बाळाकडे व आरोग्यापुरतेच मर्यादित असते. या गोष्टीचे प्रत्येक गर्भवती महिलेच्या केसांवर आणि त्वचेवर होते. नुकतेच अभिनेत्री सोनमने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये अभिनेत्री सोनम कपूरने तिच्या सौदर्यांचे रहस्य तिच्या चाहत्यांना सांगितले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे.
अभिनेत्री सोनम कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने तिचे तीन मोठे ब्युटी सिक्रेट्स सांगितले आहेत. सोनम कपूर आपली त्वचा सुंदर ठेवण्यासाठी सर्वात जास्त पाण्यावर अवलंबून असते. अभिनेत्रीने शेअर केले की ती एका दिवसात किमान चार बाटल्या पाणी पिते. त्यामुळे तिच्या त्वचेवर सुरकुत्या किंवा जास्त कळपट पणा जाणवत नाही.
सोनम पीसीओएसची रुग्ण आहे, त्यामुळे तिला तिच्या आहाराचीही विशेष काळजी घ्यावी लागते. भरपूर वैविध्यपूर्ण आणि हेल्दी फूड खाणारी ही अभिनेत्री सोनम त्वचेसाठी तिच्या आहारात काही गोष्टींची विशेष काळजी घेते. तिने सांगितले की, तिच्या आहारात नक्कीच ओमेगा समृद्ध अन्न आहे. यासाठी ती वेगवेगळ्या प्रकारची फळे, बिया आणि मासे खातात. यासोबत ती वनस्पती तेलाचाही वापर करते.
सोनम कपूरने व्हिडिओमध्ये सांगितले की, तिचे तिसरे ब्युटी सिक्रेट म्हणजे फायबर रिच फूड. तिने सांगितले की, तिच्या आहारात नक्कीच भाज्या आणि फळे असतात. अभिनेत्रीने शेअर केले की गाजर, ब्रोकोली आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेली फळे फायबरसाठी आहारात समाविष्ट केली जाऊ शकतात.
दरम्यान, सोनम कपूरने २०१८ मध्ये मुंबईत उद्योगपती आनंद आहुजाशी विवाह बं’धनात अडकली. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री सोनम आणि आनंदने ते लवकरच पाल होणार असल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. तर आता सोनम कपूर वयाच्या ३७ वर्षी आई झाली आहे.