आपल्या सर्वांना कर्णधार महेंद्रसिंह धोनी माहितीच आहे. महेंद्रसिंह धोनीने आतापर्यंत क्रिकेट क्षेत्रामध्ये जी अतुलनीय कामगिरी केलेली आहे, त्याबद्दल सर्वांना माहितीच आहे. त्यांनी आपल्या चाहत्यांना कधीच नाराज केली नाही.
वेगवेगळ्या पदावर काम करत असताना त्यांनी नेहमी क्रिकेटचा आलेख कसा वर चढेल याचाच विचार केलेला आहे आणि म्हणूनच अनेक क्रिकेटर आले अन् गेले तरी महेंद्रसिंह धोनी हा अनेकांच्या हृद्यात आज देखील वास्तव्य करत आहे.
महेंद्रसिंह धोनी यांनी आतापर्यंत वेगवेगळे क्रिकेटचे सामने केलेले आहेत. राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळ खेळलेला आहे. उत्कृष्ट कामगिरीमुळे वेगवेगळे पदक देखील महेंद्रसिंह धोनीने भूषवलेले आहे.
परंतु आज आम्ही तुम्हाला महेंद्रसिंह धोनी बद्दल सांगणार नाही तर त्याची लाडकी मुलगी जीवा बद्दल सांगणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे बाप आणि मुलीचे नाते हे अतूट असते. प्रत्येक मुलीचा पहिला हिरो हा बापच असतो.
असेच काहीतरी समीकरण हे महेंद्रसिंह धोनी आणि त्याची मुलगी जीवा यांच्या बाबतीत पाहायला मिळते. महेंद्रसिंह धोनी हा अनेकदा आपल्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो आणि हे फोटो अनेकदा लोकांना पसंतीस देखील येत असतात.
म्हणूनच आज आम्ही तुम्हाला महेंद्रसिंह धोनीच्या जीवाभावाची असलेली लाडकी मुलगी जीवाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. महेंद्रसिंह याची मुलगी दिसायला अत्यंत गोंडस आणि सुंदर आहे.
या मुलीचे नाव आहे जीवा धोनी जीवा देशातील प्रसिद्ध चेहऱ्यांमधील एक महत्त्वाचा चेहरा मानला जातो. ही जीवा आपल्या वडिलांची अत्यंत लाडकी मुलगी आहे. प्रत्येक सामन्याआधी महेंद्रसिंह धोनी आपल्या मुलीसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करत असतो.
जीवा महेंद्रसिंह धोनीच्या आयुष्यात आल्यानंतर महेंद्रसिंह धोनीचा आलेख हा उंचावत जात आहे आणि म्हणूनच जीवा आणि महेंद्रसिंह धोनी यांचे नाते हे आगळे- वेगळे आहे. अनेकदा वेगवेगळ्या मुलाखतीमध्ये महेंद्रसिंह धोनी यांनी या गोष्टीचा उल्लेख देखील केलेला आहे.
जीवा धोनीचा जन्म 6 फेब्रुवारी 2015 ला गुडगाव येथे झाला. जीवा अगदी कमी वयातच इंटरनेटवर कीड सेलिब्रिटी बनली. जेव्हा जीवाचा जन्म झाला तेव्हा एम एस धोनी भारतीय आणि ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप सामन्याची तयारी करत होता म्हणूनच जेव्हा जीवाचा जन्म झाला.
तेव्हा त्याला प्रत्यक्ष आपल्या पत्नीसोबत थांबता आले नाही. जीवाचा जन्म झाल्यावर तब्बल 2 महिन्यानंतर पहिल्यांदा एम एस धोनीने आपल्या बाळाला पाहिले होते. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, धोनी ने 2010 मध्ये साक्षी सिंह रावत सोबत लग्न केले होते.
जीवा धोनी वेल्हम गर्ल्स स्कूल, डेहरादून आणि जवाहर विद्या मंदिर, रांची येथे आपल्या शिक्षणाचे धडे गिरवत आहे. जीवा हल्ली आजोबा पानसिंह आणि आजी देवकी देवी, आई साक्षी यांच्यासोबत आनंदाने राहत आहे.
जीवा ही दिसायला अत्यंत सुंदर आणि मनमोहक आहे. तिच्या सौंदर्याचे कौतुक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर होत असते. अनेकदा महेंद्रसिंह धोनी आणि साक्षी आपल्या मुलीचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात.
यामुळे जीवाचा सोशल मीडियावर एक चाहता वर्ग निर्माण झालेला आहे, असे म्हणायला हरकत नाही. एकदा तर शास्त्रीय नृत्य करत असताना केलेला व्हिडिओ हा जिवाचा अतिशय सुंदर व्हिडिओ मानला गेला होता.
या व्हिडियो मध्ये तिने पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. या व्हिडिओमध्ये ती एका परी सारखी दिसत होती. महेंद्रसिंह धोनी आणि साक्षी यांची लाडकी मुलगी जीवा ही आज पाचव्या वर्षात पदार्पण करत आहे. आज तिचा वाढदिवस आहे.
तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे अनेक संदेश पत्र वेगवेगळ्या स्तरातून येत आहे. ती पाचव्या वर्षात पदार्पण करत असल्याने आई वडील अत्यंत खूष दिसत आहेत तसेच तिचा हसरा एक फोटो देखील इंस्टाग्राम वर पोस्ट करण्यात आलेला आहे.
तुम्हाला जाणून नवल वाटेल की, आई-वडिलांनी इंस्टाग्राम वर जीवाचे एक पेज देखील उघडलेले आहे. या पेजवर तिचे 1.5 मिलियन फॉलोवर्स आहेत. हे पेज तिचे आई वडील हँडल करतात.